प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इंदापूर - (मुंबई इलाखा) हा पुणें जिल्हयांतील एक तालुका उ. अ. १७०५४' आणि १८०२०' व पू. रे. ७४०३९' आणि ७५०१०' यांमध्ये बसलेला असून ह्यांचे क्षेत्रफळ ५६७ चौरस मैल आहे. ह्या तालुक्याचें मुख्य ठिकाण इंदापूर शहर. ह्या तालुक्याची लोकसंख्या १९११ साली ७८०५९ होती. वायव्य व मध्यभागी तालुका डोंगराळ आहे. पण नद्यांच्या बाजूला सर्व प्रदेश उघडा व एक सारखा आहे. जमीन खाली फार खोल नसून त्यांत दगड फार असतात. ह्या तालुक्यांत पाऊस फारच कमी म्हणजे सरासरी २० इंच पडतो.

श ह र. - (मुंबई इलाखा) पुणे जिल्हा. इंदापूर तालुक्याचें मुख्य ठिकाण. उ.अ.१८०८' आणि पू.रे.७५०५' पुणें-सोलापूर रस्त्यावर पुण्याच्या आग्नेयीस ८४ मैलांवर आहे. लोकसंख्या (१९११) ६६८८ इ.स. १८७६-७७ च्या भयंकर दुष्काळामुळें लोकसंख्या फार कमी झाली. तालुक्यांतील सर्व कचेऱ्या येथे असून इ.स.१८६५ सालापासून येथे म्युनिसिपालिटी आहे. येथे चांदखान नांवाच्या मुसुलमान फकिराप्रीत्यर्थ नवंबर-दिसेंबर महिन्यांत दरवर्षी उरुस भरतो.

इ.स.१४४८ मधील इंदापुरचा उल्लेख आढळतो. त्यावेळी हा गांव विजापूरचा पहिला बादशहा युसफ अदीलशहा याजकडे होता. चाकणच्या किल्लेदारांने ज्यावेळी बंड केले त्यावेळी त्यानें युसफची मदत मागितली होती व युसफने ६००० घोडेस्वार पाठवून इंदापूरजवळ मुक्काम करण्यास हुकूम केला होता. इ.स.१६४० च्या सुमारास इंदापूर, बारामती ही शहाजीच्या मुलुखास जोडण्यांत आली. इ.स. १७०७ साली अवरंगजेबानें इंदापूर व सुपे शाहूस दिले. इ.स.१७९० साली इंदापूर गांव जुन्नर सरकारच्या परगण्याचें मुख्य ठिकाण होतें, व त्यांचें उत्पन्न १०८९०० रुपयें होते. इ.स.१८२८ पर्यंत हा गांव महत्वाचा होता. परंतु अलीकडे व्यापार बराच खालावला आहे. फक्त ओबडधोबड कापडाचें  विणकाम येथे होते [मुं. गॅ १८. ब्रिग-फेरिस्ता २ ग्रँट डफ. वरिंग]

म रा ठी रा ज्यां ती ल इं दा पू र. - अंबाजीपंत तात्या यांस दावलीराव सोमवंशी सर लष्कर यांनी पाठविलेल्या पत्रांत इंदापूर वगैरे महाल स्वामीनी मुबादला करुन घ्यावयाचें मान्य केलें आहे. असा उल्लेख आहे (रा.खं. ६प.४०). मानाजी केसरकर सर देशमुख यांजकडे इंदापुर परगण्याबद्दल, सरकारचा ऐवज २००० येणें असल्याचा उल्लेख (रा.खं. ६ प. ९४) आहे. पुणे, इंदापुर चाकण वगैरे अफजलखाना आदीपासून ज्याकडे इनाम असतील तसें चालविण्याबद्दल हुकूम (रा.खंड ८ प. ११) आहे. इंदापूरमहालाकडील ५००० होन खजाना करावयास आणावे अशी सन १६७१-७२ मधील आज्ञा (खंड ८ प. २१) आहे. इंदापूरच्या देशमुखीपैकी ३५०० रुपयें राजमंडळाच्या खर्चास येतात असा उल्लेख (रा.खं. ९० प. २७८ मध्ये) आहे. याखेरीज रा.खं. १० मध्यें दोन ठिकाणी खं.१५ मध्यें तीन ठिकाणी किरकोळ उल्लेख आलेले आहेत.

थोरले माधवराव व नाना फडणीस यांच्या अमदानीत या तालुक्याची अत्यंत भरभराट होती. पागेदार व शिलेदार यांच्या खर्चास हा महाल लावून दिलेला असे. १७९४ पासून याला उतरती कळा लागली. १८०२ साली फत्तेसिंग माने नांवाच्या होळकर सरदाराने हा गांव उध्वस्त करुन सोडला. पुढील साली मोठा दुष्काळ पडून लोक गांव सोडून गेले. ब्रिटिश अंमल सुरु झाला तेव्हां प्रथम अहमदनगरच्या कलेक्टराकडे हा तालुका होता पुढें पुणें जिल्ह्यांत याचा समावेश झाला.

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .