प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इथिल अल्कहल - (एथिल आल्काहोल) इथिल अल्ल क, उ प्रउ यास व्यवहारांत मद्यार्क (स्पिरिट्स् ऑफ वाइन) असें म्हणतात हा पदार्थ फार प्राचीन काळापासून पाश्चात्यांस व भारतीयांस माहित आहे. लाव्हाझिए यानें याची जातिपरीक्षा (क्कलिटेटिव्ह) निश्चित केली व सॉसुरे यानें प्रथम याची परिमाण (क्कान्टिोटिव्ह) परीक्षा ठरविली.

सृष्टीमध्ये हा अल्कहल जरी अल्पप्रमाणांत आढळतो तरी त्याची व्याप्ति पुष्कळ आहे हा अल्कहल कित्येक फळांत आढळतो. तसेंच दगडी कोळशाच्या डांबरात हाडाच्या तेलांत, लांकडाच्या पातन विधीनें (डिस्टिलेशन) काढलेल्या अर्कोत बिस्कुटें, पाव (ब्रेड) वगैरेमध्यें व मधुमेह झालेल्या माणसाच्या मूत्रात देखील असतो.

संयोगीकरणः - इथिल अल्कहल हा संयोगीकरणाने (सिथेसिस) पुढील रीतीनी तयार करतां येतोः- (१) कर्ब आणि उज्ज (हायड्रोजन) यांचा संयोग करुन दारिलीन (अॅसिटायलीन) क२उ२ तयार होतो. दारिलीन क२उ२ वर नवजात (नॅसंट) उज्जची क्रिया केली म्हणजे त्याचें रुपातरं इथिलिन क (एथायलीन) मध्यें होते. इशिलिन क वर तीव्र गंधकाम्लाची उ गप्र क्रिया केली म्हणजे त्यापासून इथिल उज्ज गंधाकित कगप्र (एथिल हायड्रोजन सल्फेट) तयार होतो. याचें पातन (डिस्टिलेशन) केले म्हणजे क२उ५प्रउ इथिल अल्कहल तयार होतो. ही रीत फॅरॅडे यानें शोधून काढिली व इ. स. १८५५ मध्यें बथेंलॉट यानें तीस पुष्टि दिली.

(२) इथिलीन वायु क उद् अदाम्ल (हायड्र आयोडिक अॅसिड) बरोबर उष्ण केला म्हणजे इथिल अदिद क२उ२द हा संयुक्त पदार्थ तयार होतो. त्यांचे पृथक्करण पालाश उत्प्राणिद (पा प्रउ) नें केले म्हणजे इथिल अल्कहल क२उ२प्रउ तयार होतो. या रासायनिक क्रिया खालील समीकरणांत दाखविल्या आहेत.

(१)  इथिलीन        उद्-अदाम्ल          =    इथिल     अदिद
      क४       +   उद                           क
इथिल अदिद        पालाश उत्पाणिद          इथिल अल्काहल पा.अ.
उ द            +   पा प्रउ                  =    कप्रउ        पाद
या क्रियेत इथिल अदिदापासून इथिल अल्कहल तयार होतो यावरुन इथिल अल्कहलाची सारणी कउ३ कउ२ प्रउ अशी साधार सारणी आहे हें ठरते.

(३) पाण्याच्या सांन्निध्यांत सिंधुमेला (अम्लर्गेम) च्या प्रायोज्जिदाचा (आल्डिहाइड) योग केला म्हणजे नवजात (नॅसेट) उज्ज उद्भूत होतो. तो प्रायोज्जिदाशी क२उ४ प्र संयुक्त होऊन त्यांचे रूपांतर इथिल अल्कहलांत क२उ५प्रउ होतें जसें-

    प्रायोज्जिद     उज्ज    इथिल अल्कहल
    क प्र      उ२ = क प्र = कप्रउ

परंतु या केवळ शास्त्रीय रीती आहेत. व्यवहारांत शर्करायुक्त पदार्थावर विपाकक्रिया (फरमेन्टेशन) करुन हा अल्कहल तयार करितात ज्यांत साखरेख अंश आहे असा फळाचा किंवा व वनस्पतीचा रस हवेमध्यें तसाच काही दिवस राहूं दिला तर हलके हलके त्यांत विकृति होत जाते व त्याचा मूळचा गोडपणा नाहीसा होतो. ही विकृति म्हटली म्हणजे साखरेंचे पृथक्करण होऊन तिचे कर्बाम्ल (कर्बद्विप्राणिद) व अल्कहज यांत रुपातर होते. ही क्रिया दाखविणारें समीकरण असेः-

    शर्करा    अल्कहल(इथिल( कर्बद्विप्राणिद
    क१२ =२ क २ क प्र

या क्रियेला विपाकक्रिया (फरमेंटेशन) म्हणतात या विषयी जास्त विवरण अन्यत्र केलेले आहे.

द्राक्षशर्करा, इक्षुशर्करा वगैरे केल्यावर मागें राहिलेली काकवी ''बीटपासून साखर केल्यावर राहिलेला गाळ, इत्यादी शर्करायुक्त पदार्थांपासून विपाकक्रियेने अल्कहल (इथिल) हल्ली तयार करितात. फलशर्करा क६उ१२प्र६ आणि इक्षु शर्करा यापासून परंपरेने अल्कहल तयार होतो. तसेंच पिष्टसत्व (स्टार्च) कोम आलेल्या यवाचा (जवाचा) द्रव यांपासूनहि अल्कहल तयार होतो. विपाकक्रिया चांगली चालण्यास द्रवांत त्याच्या एकअष्टमांश वजनाची तरी साखर असावी लागते आणि इतकी साखर असल्यावर त्या द्रवाचा चारपंचमांश भाग अल्कहलांत रुपांतर पावतो. अल्कहलाबरोबर विपाकक्रियेंत दुसरेहि पदार्थ तयार होतात. विपाकक्रिया चांगली चालण्याकरितां फलशर्करेशिवाय नत्रयुक्त पदार्थ द्रवांत असले पाहिजेत. हे पदार्थ फळाच्या दाबून काढलेल्या रसांत जात्याच असतात. यामुळें त्या रसाची विपाकक्रिया चांगली व ताबडतोब होतें.

अल्कहल काढण्याच्या कामी जे पदार्थ वापरण्यांत येतात ते व त्यांपासून अल्कहलकरिता द्रव तयार करण्याची कृतिः - अल्कहलाकरिता द्राक्षे सफर्चंद, अनासपाती, केळी, वगैरे बहुतेक गोड फळे चालतात. वरील रसभरित व गोड फळांचा रस काढून कांही वेळ ठेवला म्हणजे त्या रसांतल्या द्रव्यांत विपाकक्रिया सुरु होते. फळांच्या सालीवर विपाकक्रिया घडवून आणणारे अति सूक्ष्म जंतू असतात. यांस इंग्रजीत यीस्ट म्हणतात. मराठीत किण्व किंवा विपाकजंतु म्हणतात. फळांचा रस काढताना हे जंतू रसांत जातात व तेथे त्यांची वाढ झपाटयानें होतें. हे जंतू गोलकांप्रमाणे असून त्यांस कोणतेहि अवयव नसतात. या विपाक जंतूच्या गोलकांत आपोआप कांही वेळाने एक रेघ दिसू लागते व या रेघेच्या ठिकाणी कांही वेळानें तो गोलक दुभंगून त्याचा प्रत्येक हिस्सा पुन्हां गोल होतो, व वाढत जातो. कांही वेळानें पुन्हां या नवीन गोलकांत रेघ दिसू लागते. अशा तऱ्हेने प्रत्येक गोलकाचे दोन दोन हिस्से होऊन त्यांपासून नवीन गोलक तयार होतात व या किण्वांची किंवा विपाकजंतूची वाढ झपाटयानें होते. कांही विवक्षित बाबतींत या गोलकाला एका बाजूला प्रतिगोलक येतो व तो वाढत जाऊन त्याचा नवीन गोलक तयार होऊन तो मूळ गोलकापासून सुटा होतो. या विपाक जंतूच्या द्वारें फळाच्या रसांतील साखरेचें वर सांगितल्याप्रमाणें रुपातंर होऊन अल्कहल व कर्बाम्ल तयार होतात. विपाकक्रिया सुरु झाली म्हणजे रसाला अल्कहलाची घाण येऊं लागते व कर्बाम्ल वायूचे बुडबुडे रसांतून वर येऊन रसाच्या पृष्ठभागावर फेस येतो. ही विपाकक्रिया पूर्ण झाली म्हणजे तो द्रव अल्कहल काढण्यास तयार झाला.

(२) अल्कहल गहूं, जव, बाजरी, ज्वारी वगैरे एकदल व पिष्ठसत्वमय धान्यांपासूनहि तयार करितात. ही धान्यें पाण्यांत भिजवून जमीनीवर पसरली म्हणजे त्या धान्यांतून मोड येतात. धान्य प्रथम पाण्यांत भिजत घालतात येणेंकरुन कुजकेनासके व हलके दाणे असतील ते वर येतात. त्यांस झाऱ्यानें काढून टाकावें, म्हणजे चांगले व जड दाणे तळी जातात. सर्व दाणे फुगून मऊ होईपर्येत ४०-६० तासपर्यंत भिजत ठेवितात. पहिले पाणी काढून दुसरें नवे पाणी दोन तीन वेळ घालावे. दाणे फुगून दिढीने वजनांत वाढले म्हणजे ते धुऊन ढीग करुन ठेवावेत. पाणी निचरुन गेले म्हणजे ढिगांतील दाणे एक दोन दिवसांत पुनः गरम होतात व एक दोन दिवसांत पुनः कुजून जाड कोम येऊ लागतात. कोम फुटताच अंधार असलेल्या खोल्यांत दाणे सारखे पसरुन वाळत घालावे. याप्रमाणे १२।१४ दिवस वाळत ठेवावेत. दररोज एक दोन वेळ खालीवर करीत असावें. यामुळें दाण्यांस सारखे उष्णमान मिळून सर्व दाण्यांस सारखे कोम येतात खोलीचे उष्णमान ६०० किंवा ७०० ठेवावें हवा गरम असेल त्या मानानें कोम येण्याची त्रिच्या १०।१५ दिवसांत पूर्ण होते. अंकुरास पानें येण्यापूर्वीच ही क्रिया  बंद करावी. सरासरी इंचभर लांब कोम फुटून त्यांस डेळकी फुटल्यावर पानें येण्यापूर्वीच दाण्यामध्यें बराच मंड (डायास्टेस) उत्पन्न होतो. नंतर पत्र्यास चाळणीप्रमाणें भोके पाडून त्या पत्र्यावर २ इंच जाड दाण्यांचा थर पसरून हवेच्या गरम प्रवाहांत त्यांस वाळवावे. ही गरम हवा प्रथम ३००-३१० उष्णमानाची असावी. कांही तास या उष्णमानावर वाळवून नंतर हलके हलके उष्णमान वाढवीत वाढवीत  ५८०-५९० उष्णमान करावें व दाणे मधून मधून ढवळावे. नंतर दाणे चाळून त्यांपासून कोबांचे तुकडे वगैरे निराळे करावें. जवापासून शेकडा ८० भाग हे भाजलेले दाणे (यवमांड) तयार होतात. गहुं, रागी वगैरे पासूनहि हे ''यवमांड'' तयार करतां येते. (यवमांड = माल्ट) जवापासून जे ''मांड'' (माल्ट) याप्रमाणे तयार होतें त्यांत त्याच्या वजनाच्या १/५००० मात्र मंड (डायास्टेस) असतें व हे पिष्टसत्वाचें शर्करेत रुपांतर करण्यास पुरेसे होते. ही मांड (माल्ट) करण्याची रीत जवास लागू आहे. इतर धान्यांपासून मांड करण्यास या रीतीत थोडाफार धान्याच्या स्वरुपाप्रमाणें फरक करावा लागेल.

हे मांड तयार झालें म्हणजे त्यांचे पीठ १८०० उष्णामानाच्या गरम पाण्यांत घालून पातळ द्रव करावा, व कांही तास तसाच ठेवावा. म्हणजे त्यांत असलेल्या 'मंड'' (डायास्टेस) नें बहुते पिष्टसत्त्वाचें रुपांतर होऊन त्याची द्राक्षशर्करा होते. नंतर त्यांत थोडे किण्व (यीस्ट) घालून विपाकक्रिया करावी म्हणजे अल्कहल काढण्यास द्रव तयार होतो.

उंसाचा रस, साखर, गूळ काकवी, ताडीचा गूळ वगैरे सारखे पदार्थ असतात त्यांत साखरेचा अंश पुष्कळ असतो. यांपासून साखर तयार करतांना प्रथमतः रसांतला गाळ फुकट जातो. या गाळांत साखर असून ती निराळी करितां येत नाही, त्याचप्रमाणें उंसाच्या रसावरली मळी किंवा राब वगैरे पदार्थांत पाणी घालून पातळ मिश्रण तयार करितात त्यांत किण्व घालून त्याची विपाकक्रिया करितात. उंसाच्या साखरेवर विपाकक्रिया लवकर घडत नाही याकरितां तिचे गंधकाम्लाच्या योगानें द्राक्षशर्करा व फळ शर्करा यांत रुपांतर करवून नंतर तिची विपाकक्रिया करितात.

बटाटे, राताळी किंवा यांसारखे पिष्टसत्त्वयुक्त कंद किसून ते पाण्यांत घातले म्हणजे त्यांतील पिष्टसत्त्व पाण्यांत उतरतें हें निराळे काढून त्यांत ''मांड'' चें पीठ मिसळतात व पाण्यांत घालून त्यांत किण्व घालतात. मांडातील मंड (डायास्टेस) च्या योगानें पिष्ठसत्वाचें रुपांतर होऊन मांड शर्करा (माल्ट शुगर) होते व नंतर या शर्करेवर विपाकक्रिया घडली म्हणजे त्यापासून अल्कहल तयार होतो.

आपल्याकडे मुख्यत्वें मोहाच्या फुलांपासून अल्कहल तयार करतात. या फुलांत साखरेचा अंश बराच असतो व यांत नैसर्गिक ''किण्व' असल्यानें ही फुलें पाण्यांत टाकल्याबरोबर विपाकक्रिया सुरु होते. ही क्रिया हवेच्या मानाप्रमाणे पांच दहा दिवसांत पूर्ण होते.

प्रमाण - फळापासून जी विपाकक्रियेनंतर द्रव तयार होतो. त्यांत शेकडा १०-२० पर्यंत अल्कहलाचें प्रमाण असते, धान्याच्या विपक्क (फर्मेन्टेडलिकर) द्रवांत शेकडा ५-८ असते. शर्करायुक्त द्रवांत व पिष्टसत्वयुक्त पदार्थापासून तयार केलेल्या विपक्क द्रवांत अल्कहलाचें प्रमाण शर्करेच्या प्रमाणावर अवलंबून असतें.

अल्कहल तयार करणेः- या विपक्क झालेल्या द्रवाचें नंतर पातन यंत्रानें पातन करुन सजल असा अल्कहल तयार होतो. या कामी तांब्याची मोठमोठी पातनपात्रें असून ती निरनिराळया प्रकारची असतात. या पातन पात्रास इंग्रजीत पॉटस्टिल असें म्हणतात.

एका पातनयंत्रात एक मोठे पात्र तापक म्हणून असून त्याच्या खाली उष्णता लावतात. तापकावर एक दुसरें भांडे शीर्षासारखे जोडलेलें असते या शीर्षांतून एक नळी काढून ती दुसऱ्या एका शोधक नांवाच्या भांडयास  जोडलेली असते. या शोधकावर पुन्हा एक दुसरा शोधक जोडलेला असतो व त्यांतून एक नळी अनेक वेढे घेऊन शीताकांतून नेऊन ग्राहकांत सोडलेली असते.

तापकांत विपक्क द्रव्य भरुन त्याला विस्तवानें किंवा वाफेनें तापविण्याची व्यवस्था केलेली असते. तापकांतल्या द्रवाची वाफ शीर्षांत जाऊन नळीनें शोधकामध्यें येते. शीर्ष उंच असल्याकारणानें त्यांतून वाफ वर चढत असतांना थोडी थंड होते व त्यामुळे त्यांत असलेल्या पाण्याच्या वाफेच्या बऱ्याचशा भागाचें प्रवाही रुप होतें. शोधकामध्ये वाफ आल्यावर जास्त थंड होते व येथें त्या वाफेंत असणाऱ्या बहुतेक पाण्याचा अंश द्रवरुप होऊन तळाशी जातो व तेथून तो एका नळीनें परत तापकांत नेऊन सोडलेला असतो. शोधकामध्यें जी वाफ शिल्लक रहातें ती त्याच्या डोक्यावरील दुसऱ्या शोधकाभोवती थंड पाणी खेळविलेले असतें तेथें  जाते. येथे वाफेतले अल्कहलाव्यतिरिक्त सर्व पदार्थ द्रवरुप होतात. व त्याबरोबर कांही मद्यार्काचीही वाफ द्रवरूप होते. हा द्रव या वरील शोधकांतून पुन्हा खालील शोधकामध्यें येतो व तेथून तापकांत जातो. वरील शोधकांत जी वाफ राहते ती बहुतेक शुध्द अल्कहलाची असते. या दोन शोधकांमध्ये अल्कहलव्यातिरिक्त बहुतेक सर्व पदार्थ द्रवरुप होऊन निराळे होतात म्हणजे अल्कहलाच्या वाफेचें शोधन होते. म्हणून यांस शोधक असें म्हणतात. इंग्रतीत खालच्याला 'डबलर' म्हणजे द्वित्तशोधक व वरच्याला रेक्टीफायर म्ह० शोधक असे म्हणतात. वरील शोधकांत राहिलेली अल्कहलाची वाफ एका नळीत जाऊन तेथून एका सर्पिल (वेढे असलेल्या) नळीत (वर्म) येते. ही सर्पिल नलिका एका हौदांत असून या हौदाचें पाणी सारखें थंड राहील अशी व्यवस्था केलेली असते. पाण्याच्या शीततेनें अल्कहलाच्या वाफेच्या द्रव होऊन तो तोटीनें ग्राहकांत जमा होतो.

याप्रमाणे विपक्क द्रवाचें या पातनयंत्रांत पातन केले असतां अल्कहल बराच शुध्द असतो. परंतु या प्रकारचें पातन पात्र सर्वत्र ठिकाणी वापरण्यांत येत नाही. सर्वत्र बहुधा सरफोस यंत्राचा अल्कहल तयार करण्यांत उपयोग करितात. यामुळे पाण्याशिवाय दुसऱ्याहि पदार्थाचा अंश अल्कहलांत येतो. याकरिता तो शुध्द करण्याकरितां त्याचें आंशिक पातन (फ्रॅक्शनल डिस्ट्रिलेशन) करावें लागतें. प्रथम जो भाग ग्राहकात येतो त्यांत प्रायोज्जिद, दारन वगैरे बाष्पभावी पदार्थ असतात, यानंतर शुध्द अल्कहल जमतो. यांत शेकडा ९० पर्यंत अल्कहल असतो. यानंतर अखेरीस असरक तैल (फ्युझेल ऑइल) या नांवाचा एक अल्कहल निघतो. हा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी पातनविधि करण्यापूर्वी ताज्या लांकडी कोळशाच्या पुडीतून गाळल्यानें हे तेल त्यांत शोषले जातें. याप्रमाणे गाळून पुनः द्रव्याचे पातन १-२ वेळ केल्यानें बराच शुध्द अल्कहल तयार होतो. यास शुध्द अल्कहल (रेक्टिफाइड स्पिरिट) म्हणतात. विशेष प्रकारची सुधारलेली पातनपात्रे या कामी घेतल्यास एकाच वेळी बराच शुध्द अल्कहल निघतो. तथापि त्यांत पाण्याचा थोडाबहुत अंश राहतो. हा पाण्याचा अंश समूळ काढून टाकून अगदी निर्जल अल्कहल (अॅबसोल्यूट आल्कोहोल) तयार करण्यासाठी आर्द्रताशोधक पदार्थाचा उपयोग करावा लागतो. पालाशकर्बिता (पोटयाशिअम कार्बोनेट) च्या अंगी आर्द्रता शोषून घेण्याचा धर्म असल्यानें तो प्रथम या कामी वापरतात. पालाशकर्बित अल्कहलांतील पाण्यांत विद्रुत होऊन जो द्रव होतो तो अल्कहलाहून जड असल्यानें तळी बसतो व तो अल्कहलांत मिसळत नाही. यामुळें अल्कहल शुध्द करण्यास याचा उपयोग फार होतो. तथापि अल्कहलांत शुध्द करण्यास याचा उपयोग फार होतो. तथापि अल्कहलांत शेकडा ४ किंवा ५ भाग पाणी राहतेंच. हा पाण्याचा अंश काढण्याकरितां भाजलेल्या चुनकळयांचा उपयोग करावा लागतो. भाजलेल्या चुनकळया पातनपात्रांत घालून त्यावर हा अल्कहल ओतावा आणि बराच वेळ त्यास मिश्र होऊं द्यावें म्हणजे चुनकळया पाणी शोषून घेतील नंतर त्या मिश्रणाचें जल तापा (वाटरबाथ) वर पातन करावें ही क्रिया १-२ वेळां केल्यावर अल्कहल पुष्कळ निर्जल होतो. हा पाण्याचा अंश काढण्यासाठी सिंधु धातु (सोडिअम) किंवा भारप्राणीद त्यांत घालून जलतापावर त्याचें पुनः पातन करावें म्हणजे रसायनशास्त्र द्दष्टया पूर्ण निर्जल अल्कहल तयार होतो.

अल्कहलांत पाण्याचा अंश आहे किंवा नाही हें पाहण्याकरितां त्यांत भाजलेल्या मोरचूदाची पूड घालावी. पूर्ण निर्जल असला तर त्या पुडीच्या पांढरेपणांत कांही फरक होणार नाही परंतु पाण्याचा अंश असल्यास त्या पुडीस निळसर झांक येईल. भारप्राणिद (बेरियम आक्साइड) घातल्यास तो विद्रुत होईल व द्रवास पिवळा रंग येईल. उदीन (बेंझीन) घातल्यास गढूळपणा येईल.

ध र्मः - अल्कहल रंगहीन, बाष्पभावी, ज्वालाप्रवाही व द्रवरुपी असतो. यास मधुरसा दारुचा वास येतो. परंतु अगदी शुध्द व निर्जल अल्कहल असल्यास त्यास कोणत्याहि प्रकारचा वास येत नाही-तो निर्गंध असतो. अल्कहलास तिखट व दाहक अशी रुचि असते. याचा उत्क्कथनांक (बायलिंग पाइंट) ७८.३ आहे. हा ०  खाली-१३०.५ ची शीतता होईपर्यंत द्रवरूप राहतो व या शीतमानावर थिजतो. शुध्द स्थितीत १५.६ उष्णमानावर याचें वि. गु. ०.७९४ असतें. ० वर ००८०६२५ असतें.

त्याच्या पृष्ठभागाच्या सांन्निध्यांत बत्ती आली असता तो पेटतो. त्याची ज्वाला निर्धूम, फिकट व निस्तेज, निळसर असते. हवेवर उघडा राहिल्यास हा उडून जातो व त्यावर प्राण वायूचा कांही परिणाम होत नाही.

विपाकक्रियेनें तयार केलेल्या सर्व प्रकारच्या दारुंत अल्कहल हा मुख्य घटक असतो. हा मादक आहे. पुष्कळ प्रमाणांत याचें सेवन केल्यास निशा येते व गुंगी येऊन घातक परिणामहि घडतात.

प्रयोगशाळेत रसायनकार्ये करण्यास याचा दिवा फार उपयोगी पडतो. याच्या ज्वलनापासून फार तीव्र उष्णमान उत्पन्न होते व याच्या ज्योतीत थंड पदार्थ धरल्यास त्यावर काजळी धरत नाही. यांच हवेंत जाळिले म्हणजे फार थोडा प्रकाश पडतो. कारण सर्व अल्कहलाचे रुपातंर होऊन कर्बाम्ल व पाणी हे पदार्थ तयार होतात. अल्कहलाच्या एका अणूचें पूर्ण ज्वलन होण्यास प्राणवायूचे तीन अणु लागतात जसेः-

अल्कहल          प्राण               कर्बद्विप्रांणिद     पाणी
प्र     +  ३प्र      =        ३उ२प्र                ३उप्र

अल्कहलाची वाफ आरक्तोष्ण केलेल्या नळीतून नेली तर तिचें पृथग्भवन होते. उष्णतामानाप्रमाणे उत्पन्न होणारें पदार्थ भिन्न असतात. कमी उष्णमानावर पाणी उ२प्र२ तैलवायु (इथिलीन क२उ४) अनुप वायू (मार्शग्यास) कउ४ कर्ब एक प्राणिद कप्र, व दारिलीन क२उ३ (असिटायलीन) हे तयार होतात. आणि लाल भडक रक्तोष्णमानावर कर्ब असंयुक्त होऊन उज्ज निघतो.

तीव्र गंधकाम्लाप्रमाणें अल्कहलाच्या अंगी आर्द्रता शोषण्याचा धर्म आहे. पाण्यांत मिसळला असतां उष्णता उत्पन्न होते व मिश्रण थोडे मूळच्याहून आकुंचन पावतें.

तोंडाशी दोन फुगे असलेली व वरच्या फुग्यास कांचेचे बुच असलेली लांब नळी घेऊन दोन फुग्याचा जेथें संधि होतो तेथपर्यंत खालच्या फुग्यांत पाणी भरावे; आणि वरचा फुगा अल्कहलानें गच्च भरुन बूच बसवावें व नळी उलटी करावी म्हणजे मिश्रण होऊन द्रव आकुंचित होतील व नळीत रिकामी जागा राहील तींत पाण्यांत विद्रुत असलेल्या हवेचे बुडबुडे चढूं लागतील. पाणी व अल्कहल यांचे जवळ जवळ समान आकारमान असल्यास फार आकुंचन होते. उदाहरणार्थ ० उष्णमानावर ५३.९ मापें अल्कहल आणि ४९८ मापें पाणी मिसळल्यास त्यांचे आकारमान (४९.८ + ५३०९) = १०३.७ न होतां मिश्रणाचें आकारमान फक्त १०० मापें होईल. अल्कहलाच्या अंगी हा पाण्याचे टायी स्नेह आहे म्हणूनच अल्कहलांत उभ्दिज व प्राणिज पदार्थ न कुजता राहूं शकतात, कारण कुजण्याची क्रिया चालण्यास पाणी आवश्यक असतें व तें अल्कहलानें शोषलें जाते.

अल्कहलांत पाणी मिश्रण करुन त्यास नियमित प्रमाणांत पातळ करण्याची रीतः-ही खालील रीत या कामी चांगली व बिनचूक आहे;- आ = तीव्र अल्कहलाचें शेकडा आकारमान अ = सौम्य अल्कहलाचें शेकडा आकारमान तीव्र अल्कहलाचे अ आकामान घेऊन त्यांत पाणी मिळवून आ इतके आकारमान करावें. मिश्रण चांगले मिश्र होऊन मिश्रणाचे आकारमान स्थिर होऊन त्याचें उष्णमान मूळ अल्कहल व पाणी यांच्या उष्णमानाइतके झाल्यावर त्यांत आलेली घट पाणी घालून बरोबर आ आकारमान करावें. उदाहरणार्थ- पातन करुन आलेल्या अल्कहलांत शेकडा ५० शुध्द अल्कहलाचें प्रमाण असून तें शेकडा ३० प्रमाणांत करण्याचें आहे तर शेकडा ५० अल्कहलाचें ३० आकारमान घेऊन त्यांत पाणी घालून ५० आकारमान करावें, चांगले मिश्रण करुन थंड झाल्यावर आलेली घट पाण्यानें भरुन काढावी.

द्रावक धर्म. - अल्कहलांत पुष्कळ पदार्थ विद्रुत होतात. अल्कहलांत दाहक सिंधु व दाहक पालाश शीघ्रविद्राव्य आहेत. त्याचप्रमाणें बहुतेक खनिज अम्लेंहि अल्कहलांत विद्रुत होतात. मूलद्रव्यांपैकी अद (आयोडिन) अल्कहलांत विद्राव्य आहे.

अल्कहलांत पुष्कळ हरिद विद्रुत होतात जसेः-खटहरिद, स्त्रांतहरिद, जशदहरिद, काह्य हरिद, लोहहरिद, (फेरिक क्लोराइड), ताम्रहरिद (क्युप्रिक क्लोराइड), पारदहरिद (मरक्युरिक क्लोराइड), स्वर्णहरिद (ओरिकक्लोराइड) इत्यादी.

अल्कहलांत पुष्कळ वायू तत्काल विद्रुत होतात. उदाहरणार्थः-नत्रसप्राणिद न२प्र किंवा हास्यकारक वायु; कर्बाम्ल, स्फुरित उज्ज (फास्फुरेटेड हैड्रोजन), कबनत्र किंवा कनवायु आणि बहुतेक उत्कर्ब (हायड्रो कार्बन) पाण्यापेक्षा अल्कहलांत जास्त लवकर विद्रुत होतात. १०० मापे अल्कहलांत ७ मापें उज्ज, २५ मापें प्राण, व १३ मापें नत्र विद्रुत होतात. अगदी शुध्द अल्कहलांत स्फुर आणि गंधक हे अल्पाशाने विद्रुत होतात. अम्नवायूहि अल्कहलांत शोषण होतो. दाहकसिंधु किंवा पालाश याप्रमाणे त्यांचे गंधकिद अल्कहलांत  विद्राव्य असतात. परंतु यांचे कर्बित व गंधकित अविद्राव्य असतात तसेंच अल्कचें  कर्बित व गंधाकित हेहि अविद्राव्य असतात.

राळ, बाष्पभावी अस्थिर तेले, उद्भिज अल्कोदे (अल्कलॉइडस) आणि पुष्कळ उद्भिज अम्ले वगैरे सेंद्रिय पदार्थ जे पाण्यांत अविद्राव्य असतात ते अल्कहलांत विद्रुत होतात. सिंधु व पालाश यांचे साबण व अमोनिचा साबण हेहि अल्कहलांत विद्रुत होतात. चरबी व एरंडेल तेल अल्कहलांत विद्राव्य आहेत. परंतु इतर स्थिर तेलें फारच थोडी विद्रुत होतात. औषधी वनस्पति व इतर औषधें यांचें निष्कासन (एक्स्ट्राक्शन) अल्कहलानें करुन तें औषधि कामांत पुष्कळ वापरतात. या अल्कहल निष्कासित औषधि द्रवास इंग्रजीत टिकचर्स असे म्हणतात व मराठीत रंजित अल्कहल किंवा नुसते ''रंजित'' असें म्हणतात.

इथिल अल्कहलावर ज्या पदार्थांची रासायनिक क्रिया होते ते खाली दिले आहेत व त्यापासून उत्पन्न होणारे पदार्थ यांचाहि नांवे दिली आहेत.


इथिलितें अथवा इथ प्राणिदेः - धातूच्या योगें अल्कहलांतील उज्ज निःसार्य करुन जे संयुक्त पदार्थ तयार होतात. त्यांस इथिलितें अथवा इथप्राणिदें म्हणतात. ते उत्प्राणिदांशी समघटक असतात. परंतु फरक इतकाच की उज्जच्या जागी क हा इथिल संयुक्त मूलक निविष्ट झालेला असतो. जसेः-सिंधु उत्प्राणिद धुप्रउ यांतील उ च्याऐवजी क उ इथिल हा संयुक्त मूलक निविष्ट झाला म्हणजे धुप्रक सिंधु इथ प्राणिद हा संयुक्त पदार्थ तयार होतो. शुध्द इथिल अल्कहलावर सिंधु धातूची क्रिया केली म्हणजे कप्रउ यांतील उत्प्राणिल संघातील उज्जच्या परमाणूच्या ऐवजी सिंधूच्या धु परिमाणु जाऊन क प्र धु हा सिंधु इथिलित किंवा सिंधु इथ  प्राणिद हा क्षार तयार होतो. सिंधु इथिलित हा रंगहीन स्फटिक रूप असून आर्द्रतादर्शक (शोषक) आहे. सिंधु इथिलिताचा उपयोग शस्त्रक्रियेंत दाहक या द्दष्टीनें करतात. हा क्षार शुध्द अल्कहलाशी युक्त असला तर त्यास २००० पर्यंत उष्ण केल्याशिवाय त्यांतील अल्कहल उडून जात नाही. अल्कहल उडून गेल्यावर मागें क२उ५ प्रधु हा सिंधु इथिलित पांढऱ्या शुभ्र पुडीच्या रुपानें मागें राहतो. त्यावर पाण्याची क्रिया केली असता ताबडतोब त्याचें पृथक्करण होऊन अल्कहल निराळा होतो जसें-

सिंधु इथिलीत          पाणी     =       अल्कहल          सिंधु उत्प्राणिद
प्रधु           +   उप्रउ             क प्रउ    +  धु प्र उ

पालाश धातूचीहि याचप्रमाणे क्रिया होऊन पालाश इथिलित क२उ५ प्रपा क्षार तयार होतो.

सिंधु उत्प्राणिद किंवा पालाश उत्प्राणिद व इथिल अल्कहल हे अनार्द्र स्थितीत संयुक्त केले म्हणजे सिंधु इथिलित तयार होतो जसें.

सिंधु उत्प्राणिद        इथिल अल्कहल     सिंधुइथिलित     पाणी
धुप्र उ                 +  कप्र उ          =    क प्रधु   +  उप्र

सिंधु व पालाश इथिलितांचा उपयोग धातूंच्या द्रवांतून धातूंस वेगळे काढण्याकडे होतो.

अनार्द्र भार उत्प्रांणिदाची (बॅरिटा) क्रिया शुध्द अल्कहलावर केली म्हणजे क प्रभा-भार इथ प्राणिद हा क्षार तयार होतो. पाण्यांचा नुसता अंश असला तरी याच्या द्रवाचें पृथक्करण होऊन भार इथ उत्प्राणिद वेगळा होतो. भार प्राणिदाचा अल्कहलांत द्रव करून तो उष्ण केला असतां भार इथ प्राणिद द्रवांतून निपात पावतो. कारण उष्ण अल्कहलांत हा क्षार कमी विद्राव्य असतो.

स्फट इथ प्राणिद (क प्र) स्फ२ हा क्षार तयार करण्याकरितां अल्कहलांत स्फट धातु घालून थोडासा अद घालावा व तें मिश्रण उष्ण करावें. या क्रियेमध्यें बहुतकरुन प्रथम स्फ हा स्फट अदिद तयार होत असावा; हा तयार होतांच यावर अल्कहलाची क्रिया होऊन त्याचे पृथक्करण होऊन स्फट इथ प्राणिद व उज्ज अदिद हे तयार होतात. यावर (उज्ज अदिदावर) असंयुक्त स्फटची क्रिया होऊन त्यांतील उज्ज निःसृत होतो व पुनः स्फट अदिद स्फ२ द६ तयार होतो. यांवर पुन: (असंयुक्त) अल्कहलाची क्रिया घडून स्फट इथ प्राणिद तयार होतो. याप्रमाणें अदचा अल्पांश असला तरी हि क्रिया सारखी चालू राहते.

थाल्ल इथ प्राणिद क प्रथा हा रसरुप असून त्याचें विशिष्ट गुरुत्व अतिशय गुरु ३.६८ आहे त्यामुळें हा लक्षांत ठेवण्यासारखा क्षार आहे. या क्षाराचा प्रकाशावर वक्रभिवनाचा व प्रसरणशीलत्वाचा फार परिणाम होतो.

इथिल संयुक्त क्षार- इथिल अल्कहल कांही क्षारांशी नियमित प्रमाणानें संयोग पावतो. जसे खटहरिद (खह२) व अल्कहल मिळून खह + ४क प्रउ ह्या घटनचा पदार्थ खटहरिदापासून तयार होतो. जशदहरिद जह, आणि अल्कहल क प्रउ हेहि याचप्रमाणे संयुक्त होऊन जह  + २ क प्रउ या घटनेचा पदार्थ तयार होतो.

परीक्षा - (1) एखादा पदार्थ अल्कहल (इथिल आहे किंवा नाही हे पहाण्याकरितां परीक्ष्य द्रवांत उद-हराम्ल घालावें आणि नांरिगी (ऑरेंज) रंग येईपर्यंत पालाश द्विक्रुमित पुरेसे घालावें. तुलना करण्याकरितां या मिश्रणाचे दोन भाग करुन परीक्षानळीत घालावेंत. यांपैकी एक भाग उकळी येईपर्यंत कढवावा. परीक्ष्य द्रवांत जर अल्कहलाचें वास्तव्य असेल तर त्या उकळलेल्या द्रवाचा रंग हिरवा होऊन त्यास प्रायोज्जिदा (आल्डिहाइड) चा लाक्षणिक गंध येईल. यांत जी रासायनिक क्रिया होते तरी खाली दाखविली आहेः -

पालाश     द्विकुमित                 उद्-हराम्ल        इथिल अल्कहल
पात्रच्प्र                       +     ८ उह            +   ३ क प्र       =
पालशहरिद             क्रुमहरिद          प्रायोज्जिद              पाणी
२ पाह            +         क्रु ह      +    ३ कप्र        +    उप्र

(२) परंतु बहुधा अल्कहलाचें वास्तव्य पाहण्यासाठी अदपुत्तिकाची परीक्षा पाहतात. ही परीक्षा वरील परीक्षेपेक्षां फारच सूक्ष्म म्हणजे १०००० भाग पाण्यांत एक भाग अल्कहलाचें प्रमाण असल्यास ते सहज ओळखतां येतें. याकरितां परीक्ष्य द्रवांत थोडासा घनअद (आयोडीन) घालून तो उष्ण करावा. आणि नंतर सौम्य दाहक पालाशचा द्रव फार काळजीनें निर्वर्ण होईपर्यंतच घालावा. नंतर कांचकांडीने ते मिश्रण ढवळल्यावर फिक्कट पिवळया रंगाचा स्फटिकरुप अदपुत्तिकाचा निपात खाली बसेल. याला केशरासारखा वास येतो. त्यावरुन तो ओळखितां येईल. यांत होणारी रासयनिक क्रिया अशीः-

अल्कहल             दाहकपालाश         अद         अदपुत्तिक        पालाशपुत्तिकित     पालाशांदिद         पाणी
प्र          +   ६पा प्रउ               द८    =   कउद३                     पाक प्र उ           ५ पाद                ५उप्र

(३) अल्कहलाच्या वाफेंत हवा मिश्र करुन त्या मिश्रणाचें कार्य रजोरुप कृष्ण प्लातिन (प्लातिनम ब्लॅक) वर घडूं दिलें म्हणजे दार्वम्ल उद्भूत होते त्यावरुन अल्लहलाचें अस्तित्व ओळखतां येतें  या क्रियेंत प्लातिन प्राणिलीकरणाला सहायक असतो जसें-

अल्लहल        प्राण           दार्वम्ल        पाणी
प्रउ       + प्रप्र    =   कप्र      उप्र

उपयोगः - जाळण्याच्या कामी अल्कहलाचा उपयोग करण्यापेक्षा कलाकौशल्याच्या कामी इथ्र (ईथर) व हरपुत्तिक (क्लोरोफॉर्म) यांचे उत्पादन करण्यासाठी तसेंच सौगंधिक कारखान्यांत (परफ्यूमरीज) व रंजिते (टिंक्चर्स) निष्कासनें (एकस्ट्राक्ट्स) व दुसरें पुष्कळ पदार्थ तयार करण्याकडे याचा उपयोग होतो. द्रावक या द्दष्टीनें अल्कहलाचा उपयोग प्रयोगशाळेत व औषधालयांत (फार्मसी) फार होतो.

जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांत औद्योगिक कामी वापरण्यांत येणारा अल्कहल यावर जकातीची सूट मिळण्याकरिता त्यांत अशुध्द दार्वल्कहल (बुडस्पिरिट) शेकडा १० प्रमाणांत मिळवून शिवाय त्यांत उत्पलतैल-खनिजतेल (मिनरल ऑईल) राळ वगैरे मिसळतात. यामुळें अल्कहल पिण्यास अयोग्य होतो त्यामुळें तो ज्या कामाकरितां वापरण्याचा त्याकामी निरुपयोगी होत नसून पिण्याच्या दारूवर जी जकात एका ग्यालनला २० शिलिंगप्रमाणे असते तिची सूट मिळते व हा अल्कहल जकातीशिवाय नेतां येती. यांस इंग्रजी नांव ''मेथिलिटेड स्पिरिट' असे आहे.  याचा उपयोग वारनिश देण्याच्या कामी तैल निष्कासन करण्याच्या कामी (एक्स्ट्राकशन) अल्कोदे (अल्कलाईड्स) शुध्दीकरणाच्या कामी वगैरे पुष्कळ धंद्याच्या कामी उपयोगी येतो. बाजारी ''गेथिलेटेड स्पिरिट'' फार अशुध्द असतें.

अल्कहल मापनः – अबकारी खात्याची शुध्द अल्कहलावर जकात असल्यामुळें वरील प्रमाणे विषारी अल्कहलांत व पातन केलेल्या अल्कहलांत शुध्द अल्कहाचें प्रमाण काय आहे हें तत्काळ समजण्यासाठी फार सूक्ष्म साधनें शोधून काढण्यांत आली आहेत. या करितां अल्कहलाचें विशिष्ट गुरुत्व काढण्याच्या दोन रीती आहेत त्या अशा:-
(१)एक कांचेच्या बुचाची हलकी कुपी घेऊन प्रथम तिचे वजन करावें नंतर तींत अल्कहल अंशांकित मापानें मोजून एक ठराविक प्रमाण घालावें व पुन्हा वजन करावें यावरुन एक शतांश घनमात्रा(क्युबिक सेन्टिमिटर) अल्कहलाचें विशिष्ट गुरुत्व काढतां येते, व यावरुन शुध्द अल्कहलाचें प्रमाण ठरवितात.
(२) या रीतीत अल्कहलाचें विशिष्ट गुरुत्व एका सूक्ष्म द्रवगुरुत्वमापकानें (हायड्रॉमिटर) काढतात. आणि निरनिराळया विशिष्ट गुरुत्वाच्या मिश्रणांत शेकडा अल्कहलाचें प्रमाण काय असतें हें काढण्याची कोष्ठकें असतात त्यांवरुन हिशोबाने प्रमाण काढितात. यावेळी उष्णमान अवश्य पाहिलें पाहिजे नाहीतर जास्त कमी उष्णमानानें घनतेंत तात्काळ फरक पडतो. शुध्द अल्कहलाचें वि.गु.००श उष्णमानावर ०.८०६ असतें आणि १५० उष्णमानावर वि.गु.०.७९३ असतें यावरुन हिशोब करुन कोष्ठकें तयार केलेली असतात. ट्राल्स साहेबानें काळजीपूर्वक याची कोष्टकें तयार केली आहेत. त्यांत निरनिराळया घनतेंत असणाऱ्या शुध्द अल्कहलाचें प्रमाण दिलेच असतें. साइक्स साहेबाचें जे द्रवगुरुमापक असतें तें या कामी फार चांगलें असल्याचें तेंच वि.गु. काढण्याच्या कामी वापरतात. 'प्रूफ स्पिरिट'' वर जकात असते. ''प्रूफ स्पिरिट'' कशाला म्हणावें हे पार्लमेंटच्या कायद्यानें ठरलेले आहे. ''ज्या अल्कहल द्रवाचें उष्णमान ५१० असून त्यांचे वजन तितक्याच बाष्पजलाच्या वजनाच्या १२/१३ इतकें असतें त्या अल्कहलास प्रूफ-स्पिरिट म्हणतात.'' या वि. गु. च्या अल्कहलांत वजनानें शेकडा ४९.३ भाग अल्कहल असतो, म्हणजे सरासरी अल्कहल आणि पाणी यांच्या वजनांचे सारखे प्रमाण असतें किंवा मापानें ५७.०९ मापें अल्कहल १०० मापांत असतो.

''प्रूफ स्पिरिट'' हे नांव पडण्याचें कारण असे आहे की वरील पध्दत अस्तित्वांत येण्यापूर्वी परीक्ष्य अल्कहल द्रवाची परीक्षा उडविण्याच्या दारुनें पहात असत. याकरितां पिण्याची दारु अल्कहल द्रवानें ओली करुन पेटवीतात. दारुच्या पुडीनें पेट घेतला तर त्या अल्कहल द्रवास ''ओव्हर प्रुफ'' म्हणजे फाजील तीव्र असें समजतात. आणि जर अल्कहल मात्र जळून जाऊन दारु ओली राहिली तर त्यास अंडर प्रूफ असें समजतात. ०.९२ वि.गु.त्वाचा अल्कहल असला म्हणजे तो दारुस पेटवितो. याहून विशिष्ट गुरुत्व ०.५ प्रमाणें वाढत गेले म्हणजे द.०.०५ वाढीस प्रूफपेक्षा एकेक अंश फाजील तीव्र असें समजतात.

पंरतु ज्या अल्कहलांत इतर पदार्थ मिसळलेले असतात त्यांतील शुध्द अल्कहलाचें प्रमाण द्रवगुरुत्वमापकानें बरोबर समजत नाही. याकरितां अशा अल्कहलाचे पातन करावें लागते. याकरितां अल्कहल (अशुध्द) काळजीपूर्वक मापानें मोजून घेऊन त्यांचे कांच  बकपात्रांत किंवा तापक बाटलींत जलतापावर पातन करितात. हें पात्र व ग्राहक शीतकानें जोडलेले असतें. घेतलेल्या मापाच्या अर्धा हिस्सा सरासरीनें पातन होऊन आला म्हणजे या पातनांत पाणी घालून मूळच्या मापाइतके करावें आणि नंतर वर सांगितल्याप्रमाणे वि.गु. काढून हिशोब करावा.

इथिल क्षार – इ थि ल गं ध का म्ल-(१) गंधकाम्ल उ गप्र यांतील दोन उज्जचे निःसार्य परमाणू आहेत. त्यांपैकी एकच परमाणु इथिल क२उ५ या संयुक्त मूलकाने निःसार्य केला असतां उ.कगप्र या घटनेचा क्षार तयार होतो. यास इथिल गंधकाम्ल किंवा उज्ज इथिल गंधकित म्हणतात. वजनाने समभार इथिल अल्कहल व निर्जल गंधकाम्ल घेऊन हें मिश्रण जलतापावर उष्ण करावें, म्हणजे इथिल उज्ज गंधकित खालील समीकरणानें तयार होतोः-

इथिल अल्कहल   +   गंधकाम्ल   =  इथिल उज्ज गंधाकित   +   पाणी
प्रउ                 उगप्र        गप्र (प्रउ( (प्रक  )       उ प्र

इथिलची अम्ल (उज्ज) गंधकिते अतिशय अस्थिर असतात. ही फाजील (एक्सेस) अल्कहल किंवा पाणी या बरोबर उष्ण केली असता पृथग्भूत होतात. अल्कहलाचा फाजील अंश असल्यास इथ्र (ईथर) तयार होते व पाण्याचा जास्त अंश असल्यास अल्कहल व गंधकाम्ल ही पृथग्भूत होतात. या रासायनिक संयोग वियोगाच्या क्रिया खालील समीकरणानें दाखविल्या आहेत.

(१)     इथिल उज्ज गंधाकित     +  इथिल अल्काहल =       इथ्र         +  गंधकाम्ल
         क उ. गप्र                   कप्रउ                   (क)   २प्र उगप्र
   
    
(२)  इथिल उज्ज गंधाकित   + पाणी =  इथिल अल्कहल  +   गंधकाम्ल
       क उ.गप्र४                उप्र        कप्रउ               उगप्र

अम्ल गंधकितें धातूंच्या अनाम्लांशी संयुक्त होतात व त्यांचे क्षार होतात. हे क्षार स्थिर असतात कारण तें पाण्याबरोबर किंवा अल्काबरोबर उकळले असतां पृथग्भूत होत नाहीत;परंतु अम्लांच्या योगानें यांचे पृथक्करण होऊन इथिल उज्ज गंधकित असंयुक्त होतो

इथिल गंधकाम्ल हा तेलासारखा पदार्थ असून त्याचे धर्म मिथिल उज्ज गंधकितासारखे असतात. धातूंचे इथिल गंधकित पाण्यांत विद्राव्य असून त्यांचे स्फटिक सुलभ होतात. खटइथिल गंधकिताचे सुंदर स्फटिक वर्णहीन असतात. त्यांची घटना ख(क) (गप्र) प्र अशी असतें. हे पाण्यांत विद्राव्य असून हवेंत फुलारतात. भार इथिल गंधकित भा(क)२ (गप्र)२ . प्र पाण्यांत सहज विद्राव्य असून याचे सुंदर स्फटिक असतात. खटइथिल गंधकितावर पालाश कर्बिताची क्रिया केली म्हणजे पालाश इथिल गंधकित पाक२ उ५ गप्र४ हा सहज तयार होतो. हा क्षार निर्जल असून पाण्यांत अतिविद्राव्य असतो. हा हवेंत स्थिर रहातो.

(२) इथिल गंधकित (क)२ गप्र४ हा क्षार गंधकाम्ल उ२ गप्र४ च्या सारणीतील उज्जच्या दोन्ही परमाणूंच्या ऐवजी क२उ५ या संयुक्त मूलकाचे २ परमाणू निविष्ट होऊन तयार होतो. रजत गंधकित व इथिल अदिद हे एकत्र उष्ण केले म्हणजे परस्पर संयोगवियोग होऊन हा क्षार तयार होतो जसें-

रजत गंधकित    + इथिल अदिद     = इथिल गंधकित  +  रजत अदिद
गप्र                २कद              ( क) २ गप्र     २ रद

इथिल गंधाकित हा तेलासारखा असनू सुंगधित असतो. याचें वि.गु.१.१८ असून त्याचा उत्क्कथन बिंदु २०८० आहे. इथिल गंधकित पाण्यांत अविद्राव्य असून सामान्य उष्णमानावर पाण्याच्या योगाने त्याचें पृथक्करण होत नाही. परंतु पाण्याबरोबर उष्ण केला असतां या क्षाराचें पृथक्करण होऊन अल्कहल व इथिल गंधकाम्ल असे पृथग्भूत होतात. पाण्याशिवाय त्यास उष्ण केले असता त्याचें पृथक्करण होऊन इथिलीन क२उ४ व गंधकाम्ल उ२कप्र४ असें पृथक्करण होतें.

(३) इ थि ल न त्रि त क. नप्र३ यास नत्रइथ्र (नायट्रिकइथर) असेंहि म्हणतात. इथिल अल्कहलावर नत्राम्लाचें साक्षात कार्य झाले म्हणजे इथिल नत्रित तयार होतो. या कामी नत्राम्ल रासायनिक  द्दष्टीने शुध्द असेल तें घ्यावें. अणि फार मोठया प्रमाणावर करण्याचें टाळावें. कारण यांत स्फोट होण्याचा संभव असतो. विशिष्ट गुरुत्व १.४० चे शुध्द नत्राम्ल ८० भार घेऊन त्यांत २ भार मौत्रक नत्रिताचे (युरिआ नायट्रेट) घालावे व तें मिश्रण बाष्पतापा (स्टीमबाथ) वर उष्ण करावें. मौत्रकनत्रित घालण्याचा मतलब हा आहे की नत्रसाम्ल (नायट्रसअसिड) चा कांही अंश असंयुक्त असल्यास त्याचें पृथक्करण व्हावें. हें मिश्रण पूर्णपणे थंड झालें म्हणजें त्यांत आणखी १५ भाग मौत्रक नत्रित घालून त्यांत वि.गु.०.८१ चा अल्कहल ६० भार घालावा. या मिश्रणाचे पातन फारच काळजीपूर्वक जलतापावर करुन येणारा पात (डिस्टिलेट) जमा करावा. या पातांत पाणी घालून थोडासा दाहक पालाशचा द्रव घालून सर्व मिश्रण चांगले हलवावें. नंतर स्थिर झाल्यावर तळाशी जो थर निराळा झाला असेल तो काढून घ्यावा नंतर निर्जळ खट हरिदावर कांही वेळ ठेउन त्यांचे जलतापावर पातन करावें. अल्कहल आणि नत्राम्ल यामध्यें जी परस्पर रासयनिक क्रिया घडते ती खालील समीकरणानें दाखविली आहे.

इथिल               अल्कहल    नत्राम्ल              इथिलनत्रित     पाणी
.प्रउ                        +  उनप्र          = क.नप्र     उप्र

मौत्रकाच्या योगाने नत्रसाम्लाचें पृथक्करण होतें तें खालील समीकरणांत दाखविले आलेः-

नत्रसाम्ल     मौत्रक             कर्बहिप्राणिद        नत्र    पाणी
१ उनप्र      कप्र(नउ)        कप्र        न    ३उप्र


सामान्य नत्राम्ल असतें त्यांत नत्रसाम्लाचा थोडा बहुत अंश असतोच. यामुळे नत्रसाम्लाची क्रिया अल्कहलावर होऊन त्याचें प्राणिदीकरण होतें व प्रायोज्जिद व दुसरें त्याचे पदार्थ तयार होतात. या पदार्थांचे नत्राम्लावर कार्य होऊन फारच जोराचें कार्य घडतें एवढेंच नाही तर कधीकधी स्फोटहि होतो. परंतु मौत्रकाचें सांनिध्य असलें म्हणजे नत्रसाम्लाचें कार्य अल्कहलावर होण्याऐवजी मौत्रकावर होतें. आणि यामुळे इथिल नत्रित सुरक्षितपणे तयार होतो.

इथिल नत्रित वर्णहीन मधुरवासाचा रसरुप पदार्थ आहे, याचा उत्क्कथनांक ८६० आहे. त्याचे वि.गु.१५० उष्ण्मानावर १.११२ असतें. इथिलनत्रित बहुतेक पाण्यांत अविद्राव्य असतो. याची ज्वाला पांढरी असते. हा एकदम पुष्कळ उष्णतेवर उष्ण केल्यास त्याचा स्फोट होतो. दाहक पालाश अल्कहलांत विरवून त्याची क्रिया यावर केली असतां त्याचें पालाश नत्रित (पानप्र३) आणि अल्कहल असें रुपातंर होतें.

(४) इ थि ल न त्रा यि तः - इथिल नत्रायित क नप्र हा पदार्थ नत्राम्लाची इथिल अल्कहलावर साक्षात् क्रिया करुन नत्रमूलक नप्र याचें सोज्जिकरण करुन नत्रसमूलकांत नप्र२ रुपांतर केले म्हणजें तयार होतो. हे रुपांतर करण्याकरितां अल्कहलाच्या कांही अंशाचें प्रायोज्जिदांत (आल्डिहाइड) परिवर्तन करावें लागते. शुध्द इथिल नत्रायित करण्याकरितां ५० अंश (क्युबिक सेन्टिमिटर) पाण्यांत २३ ग्राम पालाश नत्रायित विरवून जो द्रव तयार होईल तो २५ क्युबिक सेन्टिमीटर अल्कहलांत मिश्र करुन हें मिश्रण तयार करावें. नंतर २५ क्यु.सें.मि. अल्कहन ५० क्यु.सें.मि पाणी यांच्या थंड मिश्रणात ३७॥ क्यु.सें.मि गंधकाम्ल घालून दुसरें मिश्रण तयार करावें. हें दुसरें मिश्रण थंड झालें म्हणजे त्यात पहिलें पालाश नत्रायिताचें मिश्रण सावकाश थोडे थोडे घालावें. ही योजना तापक बाटलीतच करावी व तिला शीतक लावून ग्राहकास जोडावी. ब्राह्य उष्णता लावण्याची जरुर नाही कारण पालाश नत्रायिताचा द्रव गंधकाम्लाच्या द्रवांत पडूं लागतांच इथिल नत्रायिताचें उद्भुत झालेल्या रासायनिक उष्णतेंने पातन होऊं लागते. ग्राहक बर्फांत ठेऊन थंड केलेला असावा. क्रिया पूर्ण होऊन इथिल नत्रायितांचे पातन होण्याचें बंद झालें म्हणजे त्यांत थोडासा निर्जल पालाशकर्बित घालून हलवावा व पुनः पातन करुन घ्यावा म्हणजे शुध्द होतो. इथिल नत्रायित पाऱ्याप्रमाणें रसरुप असून त्याचा किंचित पिवळट वर्ण असतो. याचा उत्क्कथनांक १६० असून १५०श उष्णमानावर याचें वि.गु.०.९४७ असतें. हा पाण्यांत अविद्राव्य असतो. त्यास सफरचंदासारखा वास असतो. औषधांमध्ये ''सोराखाराचा गोड अर्क'' (स्वीट स्पिरिट ऑफ नायटर) = स्पिरिटस् इथिरिस नायट्रोसि नावांचे जे द्रव्य उपयोगात येतें त्यांतील इथिल नत्रायित हा मुख्य कार्यकारी घटक आहे. इथिल नत्रायित पाण्याच्या संसर्गोत बराच वेळ राहिलें म्हणजे हलके हलके त्याचें पृथक्करण होऊन नत्र एकप्राणिद न२प्र निघूं लागतो. यास अनुकूल परिस्थिति असल्यास स्फोटहि होण्याचा संभव आहे. उज्जगंधीकदाची क्रिया इथिल नत्रायितावर केली असता अम्न (अमोनिया) व अल्कह पृथग्भूत होतात.

(५) इ थि ल ह रि क क. - इथिल हरिद (एथिल क्लोराइड) यास एकहरइथुन (मोनोक्कोर इथेन) असेंहि म्हणतात. कधी कधी उद्हर इथ्र (हायड्रोक्लोरिक इथर) असेंहि म्हणतात. कधी कधी उद्हर इथ्र (हायड्रोक्लोरिक इथर) असेही यास म्हणतात. इथिल हरिद तयार करण्याकरितां जशद हरिदाचा अल्कहलांत (इथिल अल्कहल) द्रव करुन तो तापक बाटलीत (बॉयलिंग फ्लास्क) घालावा व तीवर शीतक उलटा लावावा. हा द्रव उकळूं लागला म्हणजे त्या उकळत्या द्रवातून उध्दराम्ल वायुरुपानें घालवावा. यांत रासयनिक संयोग वियोग होतात ते खाली दाखविले आहेत.-

इथिल अल्कहल        उध्दराम्ल       इथिल हरिद         पाणी
प्रउ           +   उह             =   कह         +  उप्र

तापक बाटलीत वजनानें तीन भार गंधकाम्ल दोन भार इथिल अल्कहल आणि चार भार साधे मीठ यांचे मिश्रण उष्ण करुनहि इथिलहरिद तयार करितां येतो.

कोणत्याही रीतीनें इथिल हरिद तयार केला तरी धुण्याच्या बाटलीत (वॉशबॉटल) थोडेसे कोमट पाणी ठेऊन त्यांतून इथिल हरिदाची वाफ घालवून नंतर ती ग्राहकांत न्यावी. ग्राहक मीठ व बर्फ यांच्या मिश्रणांत ठेऊन चांगले शीत केलेले असावें. इथिल हरिदाचा उत्कथनांक १२.५० असतो, यामुळे यापेक्षा कमी उष्णता असल्याशिवाय याची वाफ थिजून रसरुप होणार नाही. रसरुप इथिल हरिद पातळ, वर्णहिन असून तो अतिशय बाष्पभावी (व्हालटाईल) असतों. त्यास थोडासा लसणीसारखा वास असून नाकास झोंबणारा सुंगधिक वास असतो. हा दहापट पाण्यांत विद्राव्य असतो. तो जाळला असतां त्याच्या ज्वाळेची किनारी हिरवट असते.

(६) इ थि ल अ दि द (कद) यास उदद इथ्र (हायड्रो ऍसिड इथर) असेंहि दुसरें नांव आहे. रक्त स्फुर (रेड फॉस्फोरस) ५ भाग, इथिल अल्कहल ७० भाग आणि १०० भाग अद याचीं एकमेकांवर रासयनिक क्रिया केल्यानें इथिल अदिद तयार होतो. तापकबाटलीत रक्त स्फुर प्रथम घालून त्यावर तो बुडे इतका अल्कहल घालावा. जलताप देऊन या मिश्रणास उकळी आणावी. शिल्लक राहिलेल्या अल्कहलांत अद घालून त्याचा द्रव करावा, आणि तो तापक बाटलीत कांचेच्या नसराळयांतून सावकाश थेंब थेंब पडेल अशी व्यवस्था करावी. रक्त-स्फुर आणि अल्कहल यांचा जो लाल द्रव झालेला असतो त्यावर अदच्या द्रवाचा थेंब पडताच लाल रंग नाहीसा होतो आणि इथिल अदिदाचें पातन होण्यास आरंभ होतो. तो चांगल्या थंड केलेल्या शीतकांतून न्यावा. ग्राहकांत जो पात (डिस्टिलेट) येतो त्यांत अल्कहल व इथिल अदिद यांचे मिश्रण असते. ते शिलज्क राहिलेल्या अदवर टाकतांच अर विद्रुत होतो. नंतर हें मिश्रण तापक बाटलीत पुनः थेंब पाडावे, याप्रमाणे दोन तीन वेळ पुनरावृत्ति केल्यावर अल्कहलाचे इथिल अदिदांत पूर्णपणे रुपांतर होते. यात राहिलेला अल्कहलाचा अंश थोडया पाण्यानें धुऊन काढावा व नंतर खटहरिदावर खह२ बराच वेळ ठेऊन शुध्द करुन घ्यावा.

इथिल अदिदास मधुर वास असून तो वर्णहीन रसरुप असतो. त्याचें वि.गु.१.९३० असतें उत्कथनांक ९३० असतो. पुष्कळ वेळ ठेविला किंवा त्यास प्रकाश दर्शन झालें तर त्यापासून अद असंयुक्त होऊन (ब्युटेन) दधुन पृथग्भूत होतो जसेः-

अदिद                 दधुन                  अद
२कद        =   १०         +    द

इथिल अदिद पाण्यांत ईषत द्राव्य असतो. परंतु अल्कहल व इथ्र अतिविद्राव्य आहे. सेंद्रिय रसायन शास्त्रांत संशोधनाच्या कामी त्रियाकारक (रीएजंट) या नात्यानें याचा वारंवार व महत्वाचा उपयोग होतो, कारण यामुळे दुसऱ्या मूलकाच्या ऐवजी इथिल मूनक क हा मूलक निविष्ट करतां येतो.

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .