प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इथिओपिया - हें आफ्रिकेच्या ईशान्य भागांतील एका प्रांताचे प्राचीन नाव. याच्या उत्तरेस इजिप्त व पूर्वेस तांबडा समुद्र आहे या नावाखाली निरनिराळया काळी वेगवेगळाले भाग येत असत. होमरने इथिओप लोक पूर्वेस व पश्चिमेस मनुष्य वस्तीच्या पलीकडे रहात असें म्हटले आहे. शास्त्रीय ज्ञान वाढल्यानंतर या लोकासंबधी साधारण बरी माहिती मिळूं लागली.

होमरनें उल्लेख केल्यामुळे बऱ्याच ग्रीक शोधकांनी यांच्या संबंधी हकीकत लिहिली आहे. हिरोडोटसच्या मते यांचे एक सरळ केस असलेले आणि दुसरा लोंकरीसारखे केस असलेले असें दोन वंश असून ते अनुक्रमें पूर्वेस व पश्चिमेस रहात. नंतर बऱ्याच जातीची नावें प्रचारात आली. इजिप्शियन शिलालेखांत बरीच माहिती दिली आहे. तीवरुन असें दिसतें की, येथे स्वतंत्र जाती हळू हळू इजिप्शियन अंमलाखाली आल्या. १८ व्या घराण्याच्या वेळी इथिओपिया खाली आल्या. १८ व्या घराण्याच्या वेळी इथिओपिया हा इजिप्तचा प्रांत होता. यावरील सुभेदाराला केशचा राजा ही पदवी असे व तो निग्रो, बैल, सोनें, हस्तिदंत, दुर्मिळ मणी, कातडी व घरगुती कामासाठी लागणारे सामान खंडणी म्हणून देत असे. येथील  लोकांत नेहमी बंडे होत असून ती मोडल्याबद्दल मंदिरें व स्तंभ उभारीत असत. ख्रि. पू. ११ व्या शतकांत इथिओपिआ स्वतंत्र झाला. याची राजधानी नेपाटा (आधुनिक मेरवी) असून तें शहर जेबेलवईल 'पवित्र डोंगर' (सेक्रेड माँउंटन) च्या पायथ्याशी होते. ८ व्या शतकाच्या अर्ध्यांत इथिओपियानें इजिप्त जिंकून घेतलें. ख्रि.पू.६६० च्या सुमारास इजिप्तनें इथिओपियाचें स्वामित्व झुगारुन दिले. इथिओपिया हे पुढे स्वतंत्र राहिले. येथील काही राजांची नावें येणेंप्रमाणः- तिरहाकपुत्र तांडमाने (६६७ - ६५०,) अॅस्पेटी ६३०-६०० पँखारेर (६००-५६०), हसिओत्फ (५६०-५२५), नस्तसेन (५२५-५००) वरील राजांपैकी दुसऱ्या व पांचव्या राजांच्या स्तंभावरुन पहातां या काळी सुध्द राजा निवडण्याची पध्दति होती असें दिसते. गादी रिकामी झाली म्हणजे येथील देव अमॉन हा राजघराण्यांतील एखाद्या पुरुषास निवडीत असे. हाच राजा झाला म्हणजे त्याला 'देवपुत्र' म्हणत. यापूर्वी व नंतर येथील उपाध्याय वर्गाचे बरेंच प्राबल्य असें हर्मिओत्फच्या स्तंभावर राजानें नऊ स्वाऱ्या करुन मेरोईच्या दक्षिणेकडील जातीनां वठणीवर आणलें व कांही मंदिरे बांधली असा मजकूर आहे. शेवटच्या राजाच्या स्तंभावर इथिओपियन राज्यासंबंधी बरीच हकीकत दिली आहे. हा राज्यावर बसल्यानंतर कॅम्बायसीसनें आपल्या इराणी लष्करासह इजिप्त जिंकून इथिओपीयावर सैन्य पाठविले; पंरतु नील नदीमार्गानें पाठविलेल्या आरमाराचा नाश झाला व हिरोडोटसच्या हकीकतीवरुन जमीनीवरील सैन्यांत अन्नाचा दुष्काळ पडून त्याचाहि नाश झाला. त्याचप्रमाणे त्याच्या व त्याच्यापूर्वीच्या राजाच्या वेळेपासून राजधानी मेराई येथे नेण्यांत आली; परंतु नेपात येथील धार्मिक महत्व कायम राहिले. तेथेच राज्याभिषेक होत असून प्रमुख देव  भविष्य सांगत असे. या इथिओपियन राजांनी इजिप्त जिंकण्याचा बिलकूल प्रयत्न केला नाही; पंरतु सुदानमधील जंगली जाती ताब्यांत आणण्याचा त्यांनी बराच यत्न केला. ख्रि. पू. ४ व ५ शतकांतील इतिहासाची कांहीच माहिती नाही. टॉलेमी फिलाडेल्फस याचा समकालीन एर्गमेनीझ यानें नेपाटा येथील उपाध्यायांची कत्तल करुन त्यांची सत्ता नाहीशी केली. त्यापूर्वी त्यांची सत्ता इतकी होती की, त्यांच्या हुकूमावरुन राजास स्वतःचा नाश देखील करुन घ्यावा लागत असे. एर्गमेनीझ राजाने ग्रीक संस्कृतीचा प्रचार इथिओपियांत केला असे डिओडोरस म्हणतो. यानंतर या देशासंबंधी थोडीबहुत माहिती ग्रीक व  लॅटीन लेखकांच्या ग्रंथांत येऊं लागली. कांहीच्या मतें येथे कॅन्डेस नांवाच्या राण्यांची सत्ता होती. त्यांच्यापैकी एका राणीला ख्रि. पू. २२ व २३ त रोमन लोकांशी युध्द करावें लागले. रोमन सेनापतीनें राजधानी व प्रांत सर केला; परंतु ऑगस्टस बादशहानें खंडणी सुध्दां न घेतां सर्व प्रदेश मोकळा केला. स्मृतिस्तंभावरुनसुध्दां येथे फक्त राण्यांचे राज्य असे असें दिसते. राजा व राणी यांच्याकरिता पिरॅमिड उभारीत असत. नेतेकमेननें बऱ्याच इमारती बांधल्या असून तो व त्याची राणी या दोघांचे चित्र ब-याच ठिकाणी आहे. इमारतीवरील चित्रे व विशेषतः स्त्रियांची चित्रे दिसण्यांत बोजड असून त्यांचे चेहरे निग्रोप्रमाणें आहेत व राजपुरुषांच्या अंगावर सोन्याचें पुष्कळ दागिने दाखविले आहेत. इ.स. ४ च्या शतकांत नुबास व अॅबिसिनियन लोकांनी मेराई राष्ट्र धुळीस मिळविले व ६ व्या शतकांत नुबियाचें ख्रिस्ती राज्य या ठिकाणी स्थापन झालें.

इथिओपियनांनी परमार्थसाधनाची कल्पना व संस्कृति ही इजिप्शियन लोकांपासून घेतली. राजांचे लेख चित्रलिपीत लिहिले आहेत. एर्गमेनीसच्या वेळी शिलालेखांत देशी भाषेचा उपयोग करण्यास सुरवात झाली. ही लिपी अद्याप कोणसहि वाचता आली नाही.

आ क्झु मा ई ट रा ज्य - पहिल्या शतकांत (ख्रिस्ती) आक्झुम येथे नवीन राज्य उदयास आलें. या राज्याची माहिती सहा शिलालेखांवरुन लागते एइथेनिस व त्यानंतरचे राजे स्वतःस आक्झुमाइट, होमेराईट, रेडान, इथिओपीयन, सेबीयन, सायली, टिआमो, ब्युगेटी व कासू यांचे अधिपति म्हणवीत. यावरुन त्यांनी दक्षिण अरबस्तानाचा बराच भाग जिंकला असून तो सर्व प्रांत इ.स.३७८ त त्यांच्या हातांतून गेला असावा. १८३३ त रुपेला सांपडलेल्या शिलालेखांत नुबा व कासू या लोकांवर स्वारी केल्याचा उल्लेख आहे. यानंतरचा इतिहास ज्ञात नाही. ६ व्या शतकांत मात्र येथील राजानें दक्षिण अरबस्तानांतील ज्यू राज्य मोडून तो प्रांत आपल्या ताब्यांत आणला, अशी माहिती लागते. या राजाला इथिओपीअन लेखांत कॅलेब, ग्रीक व अरबी कागदपत्रांत एलसबहा ह्या पदव्या लावल्या आहेत, याचा मुलगा अबाहा अथवा अब्राहाम यानें ७ व्या शतकांत पळून आलेल्या महमदाच्या अनुयायांस आश्रय दिला. इ. स. ७०० पर्यंत ग्रीक भाषा होती; परंतु त्यानंतर इथिओपिक अथवा गीझ भाषा पुढें आली. इस्लाम धर्माच्या उदयापासून अॅबिसिनीयाच्या आधुनिक इतिहासापर्यंतच्या काळांत अरबी लेखकांनी कांही थोडया गोष्टी दिल्या आहेत. इथिओपिया व नुब्रिया या प्रांतामध्यें ६८७ साली युध्द झाल्याचा उल्लेख सांपडतो.

अबिसिनीयन इतिहासकारांच्या मतें हे राज्य मेनलक (इबन एल-हकीम) म्हणजे सालोमन व शेवटची राणी यांचा पुत्र, यानें स्थापिलें. अक्झुमाइट अथवा मेनलक घराण्याला उत्तर अॅबिसिनीयांतून जुडीथ या यहुदी राणीनें हांकून दिलें; परंतु लवकरच तेथें एक ख्रिस्ती घराणें स्थापन झाले. १२६८ त या घराण्यांतील राजानें येकूनो अमलाक नांवाच्या (हा जूडिथनें हांकून दिलेल्या राजाचा एक वंशज) राजपुत्राला आपलें राज्य दिले.

इ शि ओ पि क वा ङम य - अबिसिनीयात ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ होण्याच्या सुमारास गीझ अथवा इथिओपिक भाषेचा वाङमयांत उपयोग होऊं लागला. या भाषेंतील हस्तलिखित ग्रंथाची यादी (सुमारें १२०० ग्रंथ) रॉझिनी यांनी १८९९ साली प्रसिध्द केली. यापैकी सर्वांत जास्त संग्रह ब्रिटिश म्युझियममध्यें असून बाकीचा यूरोपांतील मोठाल्या ग्रंथसंग्रहालयांत आहे. कांही हस्तलिखित प्रती अबिसिनीयांत आहे व पुष्कळसें खाजगी दप्तरांतून आहेत. बायबलांतील कांही भागखेरीज बरीच पुस्तकें (१८९३ त ४० पुस्तकें) यूरोपांत प्रसिध्द झाली आहेत.

कालमानानें गीझ वाङमयाचे दोन भाग करतां येतात. पहिला काल ख्रिस्ती मताच्या प्रसारापासून म्हणजे ५ व्या शतकापासून सुरु होतो व ७ व्या शतकांत संपतो. दुसरा काळ मॅलोमनीक घराण्यांच्या कारकीर्दीपासून (१२६८) तो आजतागाईतपर्यंतचा होय. पहिल्या काळांत ग्रीक ग्रंथाची व दुसऱ्यांत अरबी ग्रंथाची भाषांतरे झाली. यांत पहिल्या अथवा दुस-या प्रतीचे सुध्दां ग्रंथकार निर्माण झाले नाहीत. बायबलाच्या भाषांतरामुळे या भाषेंचे पवित्र्य व महत्व आहे. पहिल्या काळांत जुना करार, नवा करार व इतर ख्रिस्ती पारमार्थिक ग्रंथाची रुपांतरे झाली. याशिवाय शेर अतामखबार, केरोलोस व फीजिअलोगस (सृष्टीशास्त्रासंबधी काल्पनिक ग्रंथ) वगैरे पुस्तके झाली. दुसऱ्या काळांत महत्वाचे ग्रंथ म्हटले म्हणजे अबिसिनियाच्या इतिहासासंबंधी होत. सहेफेटे एझेझीनीत (सेक्रेटरी) नांवाच्या एका दरबारी अधिकाऱ्याच्या हाताखाली बरेच लेखक असून तो दर वर्षाची सर्व हकीकत लिहून ठेवी. या माहितीवरुनच सर्व इतिहास लिहिलें आहेत. सर्वांत जुना इतिहास म्हणजे अमदा सिऑन (१३१४-४४) मुसुलमानाविरुध्द युध्दाचा फक्त याच इतिहासकाराची भाषा व पध्दति वाङमयास साजेशी होती.

इतर वाङमयाला वरील इतिहसांपेक्षा लवकर सुरवात झाली. राजा येकुनो अमलाक (१२६८-८३) याच्या वेळेस केब्रा नागासेट नांवाची ऐतिहासिक कादंबरी झाली असावी. यागबीसिआनच्या काळी (१२९४) एथिओपियन वाङमय जागृतीचा आद्य प्रवर्तक अब्बा सलाम याचे ग्रंथ झाले आहेत. शर्सडिंगेल (१५९५) याच्या कारकीर्दीत बरीच ग्रंथरचना झाली. या भाषेंतील काव्यरचना म्हणजे प्रार्थनागीते होत.

कायद्याच्या ग्रंथात 'फादा नागा सेंट' हें फार महत्वाचे पुस्तक असून हे इब्न आसळच्या अरबी कायद्याच्या ग्रंथाचे १६ व्या शतकांतलें रुपातंर असावे. हा ग्रंथ मूळ मुसुलमानी अंमलांतील ख्रिस्ती लोकांसाठी होता. हा ग्रंथ स्वतंत्र ख्रिस्ती राष्ट्राला निरुपयोगी होता, तरी अबिसिनियाला असला ग्रंथ आवश्यक असल्यामुळे हा लोकप्रिय झाला.

या भाषेंत शास्त्रीय वाङमय मुळीच नाही म्हटलें तरी चालेल. ब्रिटिश म्युझियममध्यें फक्त वैद्यकीवर एक ग्रंथ आहे. तत्वज्ञानाचें वाङमय म्हणजे बायबलावरील टीका व इतर कांही पुस्तके होत. याशिवाय पत्रव्यवहार सवासेव नावांचा राष्ट्रकोश वगैरे कांही लिखाण आहे. छापला गेलेला पहिला एथिओपिक ग्रंथ म्हणजे साल्टर (रोम १५१३) होय.

[सं द र्भ ग्रंथ - फ्युमागली - बिब्लिओग्राफिआ एटिओपिका (१८९३) ब्रिटिश म्युझिअम, पॅरिस, आक्सफोर्ड, वार्लिन, फ्रँकपोर्ट वगैरे ग्रंथसंग्रहालयाचे कॅटलॉग रॉसिनी - 'नोट परला स्टोरिआ लेटेरारिया अॅब्रिसिना' रेडि काँटी डेला आर. अकॅड. डी लिन्सी. (१८९९ मध्यें) ए.ब्रि]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .