प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इटो, हिरोबुमी प्रिन्स, (१८४१ – १९०९) - हा जपानी मुत्सदी १८४१ मध्यें जन्मला. याचा बाप इटोजूझो हा चोशूच्या जमीनदाराचा अश्रित होता, आणि बापानंतर मुलालाहि प्रथम तोच पेशा पत्करावा लागला. चोशुच्या जमीनदाराचें घराणें हे जपानमधील सरदारवर्गापैकी एक बडें घराणें होते. या डैम्यो उर्फ सरदारमंडळीपैकी बरेचसें तत्कालीन सत्ताधीश असलेल्या शोगुनांच्या सत्तेला अत्यंत तीव्र विरोध करणारे होते, आणि विशेषतः १८५४ मध्ये कामोडोर एम. सी. पेरी याच्याबरोबर शोगुनांनी तह केला तेव्हांपासून या दोन पक्षांमध्ये उघड शत्रुत्व सुरु झालें. या कलहांत इटो पूर्णपणे आपल्या मालकाच्या पक्षाचा होत आणि त्यामुळे येदोमध्ये जाऊन तेथील सरकारच्या हालचालीसंबधी गुप्त रीतीनें बातमी काढण्याकरिता पाठविलेल्या मंडळांत त्याचा समावेश करण्यांत आला. या कामगिरीवर असतां इटोचे लक्ष ब्रिटिश व इतर सुधारलेल्या राष्ट्रांच्या लष्करी पध्दतीचा अभ्यास करण्याकडे गेले. हें ज्ञान मिळवल्यावर स्वतःच्या सैन्यांत सुधारणा करुन जुन्या धनुष्यबाणांऐवजी नव्या तोफा, बंदुकाचा उपयोग करण्याबद्दल त्यानें चोशूचें मन वळविले. शिवाय, पाश्चात्य लोकांचा व त्यांच्या विद्याकलांचा पूर्ण परिचय करुन घेण्याकरितां इटो दुसऱ्या दोनतीन तरुण जपान्याबरोबर जपान सोडून लंडनला गेला. त्यावेळी जपान सोडून परदेशी जाणाराला जपानी कायद्यानें फांशीची शिक्षा ठेवलेली होती. तथापि हा कायदा मोडून परदेशी जाण्याचें इटोने धाडस केले. लंडन येथे तो एकच वर्ष होता. इतक्यांत चोशू संस्थानचा अधिपति व शोगून सरकार यांच्यामध्ये उघड सामना होण्याचा प्रसंग उद्भवला. शोगून सरकारनें परराष्ट्रांशी तह करुन त्यांना शिमोनो सेकी आखातांत जहाजांची ने आण करण्याची परवानगी दिली या आखाताचा कांही भाग चोशू संस्थानच्या अमलाखाली असल्यामुळें या संस्थानिकानें परकीयांनां मज्जाव करण्याचें ठरविलें. त्यामुळे परराष्ट्रांबरोबर लढाईचा प्रसंग उद्भवला. ही बातमी इटोला कळतांच जपान व यूरोपियन राष्ट्रे यांच्या लष्करी सामर्थ्योतलें अंतर पूर्ण माहीत असल्यामुळें हा प्रसंग टाळण्याकरिता इटोनें आपल्या मालकाजवळ मध्यस्थी करण्याकरितां जपान सरकारजवळ मुदत मागून घेतली. व त्याकरिता तो ताबडतोब जपानला परत आला. परंतु मध्यस्थीचे त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. कारण चोशूनें इटोचें म्हणणें नाकारलें, आणि लढाईस सुरवात केली त्यांत चोशूच्याच पक्षाचा अखेर पराभव होऊन बराच युध्ददंड भरावा लागला. या एकंदर प्रकरणामुळें इटोविषयी त्याच्याच पक्षाच्या कांही लोकांच्या मनांत फार द्वेष वाढला व त्यांनी इटोचा खून करण्याचा बरेच वेळां प्रयत्न केला, अशाच एका प्रसंगी इटोचे शत्रू त्याचा पाठलाग करीत असता इटो एका चहाच्या दुकानांत शिरला आणि तेथे एका तरुण जपानी स्त्रीनें आपल्या खोलीत त्याला लपवून त्याचा बचाव केला. या आाकस्मिक प्रसंगाने सदर्हू स्त्रियेशी झालेल्या परिचयाचें रुपांतर अखेर प्रीतीत होऊन तिचें पाणिग्रहण इटोनं पुढें केलें. १६६८ मध्यें इटोला हीओगोचा गर्व्हनर नेमण्यांत आले, आणि त्याच्या पुढल्या वर्षी सरकारी जमाखर्चखात्याचा दुय्यम फडणीस झाला.१८७१ मध्यें इबाकुरा याच्याबरोबर एका महत्वाच्या कामाकरितां तो युरोपांत गेला. या सफरींतील राजकारणी हेतू जरी सिध्दीस गेला नाही, तरी तिचा एक महत्वाचा परिणाम असा झाला की, जपान सरकारनें लष्करी आरमार आणि शिक्षणखात्यांत यूरोपीय तज्ज्ञांची नेमणूक करण्यास सुरवात केली.

यूरोपमधून परत आल्यावर इटोनें अनेक वेळा इंजिनियरिंग व खाणी या सरकारी खात्यांचा मुख्य अधिकारी म्हणून काम केले. इ. स.१८८६ मध्यें त्यानें मुख्य प्रधानाची जागा पत्करिली. ही जागा त्याला पुन्हां चार वेळा मिळाली. १८८२ मध्यें त्याला यूरोपमध्यें निरनिराळया प्रकारच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यास पाठविण्यांत आले. यूरोपमध्यें असतांना रशियाचा झार तिसरा अलेक्झांडर याच्या राज्यारोहण समारंभाला हजर राहण्याची संधि इटोला मिळाली. पुन्हां जपानमध्यें परत आल्यावर जपानच्या नवीन राज्यघटनेचा मुसुदा करण्याचे काम त्याच्यावर सोंपविण्यात आले. १८९० मध्यें त्यानें या कामी केलल्या परिश्रमाचें चीज झाले, आणि तेव्हापासून ९ वर्षोनी जपानचे इतर राष्ट्रांबरोबर जुने तह व करारमदार बदलून टाकून यूरोपीय राष्ट्राच्या बरोबरीनें जपानचा दर्जा मान्य करणारे नवे तह अस्तित्वांत आले. शिवाय जपानमध्यें ज्या अनेक प्रकारच्या सुधारण करण्यांत आल्या त्यांत इटोनें प्रमुखपणानें भाग घेतला. लष्करी व आरमारी व्यवस्थेमध्यें इटोनें पूर्ण लक्ष घालून जी सुधारणा केली, त्याचेंच मुख्यतः फळ म्हणून चिनी जपानी युध्दाच्या शेवटी (१८९५) विजयी जपानी राष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून ली हुंग-चंग याच्याबरोबर वाटाघाट करण्याचा मान त्याला मिळाला. तसेंच जपान हें सुधारलेल्या राष्ट्रांमध्ये पहिल्या प्रतीचें राष्ट्र आहे. ही गोष्ट मान्य करणारा १९०२ मधला इंग्लंड व जपान यांच्यामधला मैत्रीचा तह हाहि इटोच्या यशस्वी धोरणाचेंच फळ होय. चीनबरोबरच्या युध्दांत जी अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली त्याबद्दल त्याला जपान सरकारकडून 'मार्क्किस' ही पदवी देण्यांत आली, आणि १८९७ मध्यें व्हिक्टोरिया राणीच्या डायमंड ज्युबिली समारंभाला मिक्याडो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रिन्स अरी सुगावा यांच्याबरोबर हजर राहण्याचा मान इटोला मिळाला. १९०१ मध्यें त्यानें सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्याच वर्षी बिन सरकारी नात्यानें यूरोप आणि युनायटेड स्टेटस यांना त्याला भेट द्यावी लागली, व यावेळी इंग्लंडमध्ये 'जी.सी.बी.' ही पदवी त्याला अर्पण करण्यांत आली. १९०५ मध्ये रुसो-जपानी युध्द संपल्यानंतर इटोला कोरियाचा रेसिडेंट-जनरल  नेमण्यांत आलें आणि या अधिकारावर असतां कोरियामध्यें जपानचें महत्व वाढविण्याकरतां ज्या बऱ्या वाईट गोष्टी करण्यांत आल्या त्यांची जबाबदारी त्याच्यावर आहे. १९०७ मध्यें त्याला प्रिन्स या पदवीचा दर्जा देण्यांत आला, कोरियामधली नोकरी १९०९ जुलैमध्ये सोडून तो परत आला. व जपानांत प्रीव्ही कौन्सिलचा अध्यक्ष बनला, परंतु आक्टोबर २६ रोजी हारबिन येथे गेला असता त्याचा एका कोरियन मारेकऱ्यानें गोळी झाडून प्राण घेतला.

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .