प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इटा जि ल्हा - संयुक्त प्रान्ताच्या आग्रा विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ १७३७ चौ.मै. चतुःसीमा.-उत्तरेस गंगानदी, पश्चिमेस अलीगड, मथुरा व आग्रा. दक्षिणेस आग्रा व मैनपुरी पुर्वेस फरुकाबाद.

गंगाथडीवर तराईचा प्रदेश आहे. ह्या खालील प्रवाहास बर्र्हि गंगा म्हणतात. इतर जिल्हा दोआबचे उंच प्रदेशांत आहे.

नद्या. - कालीनदी ही एक मोठी नदी आहे. लहान नद्याहि येथे आहेत त्या इसन, अरिंद, सेनगर ह्या होत.

श्वा प दें - रानडुकरे, काळवीट, लांडगे, कोल्हे वगैरे. येथील हवा कोरडी व आरोग्यदायक आहे. उन्हाळयांत वावटळें सुटतात. हिवाळयांत अत्यंत थंड असतें. वार्षिक पाऊस सुमारें २९ उंच असतो.

इ ति हा सः- ह्या जिल्ह्याचा पूर्वेतिहास अनिश्चित आहे. काली नदीच्या बाजूंनी असलेल्या उंचवटयावरुन ख्रिस्ती शकाचे सुरवातीस येथे महत्वाची गांवे अस्तित्वांत असावी असें दिसून येतें. अहीर व भार व त्यानंतर रजपूत आले. हा जिल्हा कनौजचे राज्यांत खात्रीनें मोडत असावा. सातव्या शतकांत हुएन संग हा या जिल्ह्यांत आला होता, असा तर्क आहे. बिलसर येथे कुमारगुप्ताचें लेख असलेले दोन स्तंभ सांपडले आहेत. (गुप्त इन्स्किप्शन्स, फ्लीट प्रकाशित, पा.४२)

बौध्दकालीन अवशेष असलेले नुहखेर खेडयाजवळ बरेच उंचवटें आहेत. पतिआली, सरईआघाट व सोरोन ही गांवे फार जुन्या कालापासून अस्तित्वांत आहेत. - मुख्य मुसलमानी इमारती म्हणजे मारहर व सकीत या होत. जेव्हा हें राज्य मुसुलमानांनी काबीज केलें तेव्हा इटा अर्थोत मुसुलमांनाचे ताब्यांत गेला, तरी पण ह्याची व्यवस्था कोईल बियाना अथवा कनोजहूनच पहात असत. त्यावेळी ह्या जिल्ह्याच्या उत्तरभागी असलेले पतिआली शहर मुख्य होतें. ह्या गांवी १२७० मध्यें धियासउद्दीन बलबनची स्वारी आली होती. दिल्ली व जानपुरचे झगडयांत ह्या जिल्ह्यास बराच त्रास पोहोंचला. १४८९ मध्ये बहलोल लोधी हा सकीत येथें मरण पावला. १८ चे शतकांत हा जिल्हा फरुकाबादचे बंगशहा नबाबांचे हाती गेला. नंतर फरुकाबादचा नबाब व अयोध्देचा नबाब ह्यांची जोड मालकी ह्यावर होती. १८०१ -२ साली हा ब्रिटिशांकडे आला तेव्हां त्यांनी ह्या जिल्ह्याचे वेगळे भाग पाडून त्यांची व्यवस्था भोंवतालच्या जिल्ह्याकडे सोंपवून दिली. १८४५ मध्यें ह्यांचा एक वेगळा पोट विभाग पाडण्यात येऊन १८५६ मध्यें एक वेगळा जिल्हा तयार करण्यांत आला. १८५७ सालचें बंडाचे वेळी येथील अधिकारी लोक हा जिल्हा सोडून सुरक्षितपणें आग्रयास जाऊन पोहोचले. कासगंज हाती ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न सिध्दीस गेला नाही. इटाचा राजा दमारसिंग ह्याने ह्या जिल्ह्याचे दक्षिण भागांत स्वातंत्र्य पुकारले. जुलै अखेरीस तर फरुकाबादचे बंडखोर नबाबानें हा बहुतेक जिल्हा आपले ताब्यांत घेतला. पण जनरल ग्रथेट हा दिल्लीहून सैन्य घेऊन आला असता बंडखोर लोक पळून गेले. तेव्हां काक्स याला इटा व अलिगड यांवर 'स्पेशल कमिशनर, नेमण्यांत आलें. कासगंज कांही कांळपर्यंत बंडखोरांचेंच ताब्यांत राहिले. अलिगड जिल्ह्यांत गंगिरी येथे बंडखोराचा पुरा बिमोड करण्यांत आला व कासगंज घेण्यात आले. १८५८ चे जुलैमध्ये सर्वत्र शांतता झाली.

लो क व स्ती - इटा जिल्ह्यांत वस्ती असलेली गांवे १५३८ आहेत. लो.सं.८२९७६० आहे (१९२१) तहसिली चार-इटा, अलिगंज व जलेसर; म्युनिसुपालिट्या असलेली गावें- कासगंज, जलेखर सोरन व इटा (मुख्य ठिकाण) व मारहर (नोटिफाईड एरिआ). शेकडा ८८ लोक हिंदु असून, शेकंडा ११ लोक मुसलमान आहेत. भाषा - पश्चिम हिंदीची व्रज पोटभाषा, ह्या जिल्ह्यांत असणाऱ्या हिंदुंच्या पोटजातीः-चांभार, अहीर, लोध, रजपूत, ब्राह्मण, कच्छी, हाबुरा, नत. ह्या आहेत. मुसलमानांच्या पोट जातीः-शेख, पठाण, फकीर. रजपूत या आहेत.

शे त की. - तराईचे दक्षिण भागाची म्हणजे बुर्ऱ्हि गंगेच्या दक्षिणेकडील भागाची जमीन सुपीक आहे. बुर्ऱ्हि गंगा व काली नदीमधील जमीन साधारण सुपीक आहे. काली नदीच्या दक्षिणेकडील भाग रेताड असून त्यापलीकडील जमीन चांगल्यापैकी सुपीक आहे. धाराबंदी पध्दति संयुक्त प्रान्तांतील इतर भागांप्रमाणेच आहे. महाल, जमीनदारी व पट्टीदारी असे तीन प्रकार आहेत. मुख्य पिकें-गहूं, जव, बाजरी, ज्वारी, मका, व चणे ही होत, इतर पिकें-कापूस, ऊस, नीळ व अफू. गेल्या पन्नास वर्षोत शेतकींत बरीच सुधारणा झाली आहे. गव्हाचें व मक्याचें पीक सर्वोत अधिक होते. 'लोअर गँजीस' कालव्याच्या  फत्तेगड व बेवर शाखा व 'अपर गँजीस' कालव्याच्या कानपूर आणि इटावा शाखा ह्या जिल्ह्यांत आहेत. उच्च भागांत चुनखडी सांपडते.

व्या पा र उ दी म. - मुख्य उद्योगधंदेः- सुती विणकाम, साखर शुध्द करणें, कांच तयार करणें वगैरे आहेत. निर्गत - कापूस, गहूं, जव, कडधान्यें बाजरी, अफू व साखर, आयात -विलायती कापडचोपड, खनिजधातू, व मीठ. यांत व्यापाराची गांवें- कासगंज व जलेसर ही असून सोरोन हे यात्रेचे ठिकाण आहे. ह्या जिल्ह्यांतून कानपूर-अच्छेनेरारेल्वे जाते. १७८३-८४ चा व १८०३ चा हे दोन दुष्काळ लोकांचे बरेच दिवस आठवणीत राहिले तसेच १७३७-३८ चा दुष्काळहि बराच उग्र स्वरुपाचा होता. तदनंतरचा मोठा दुष्काळ म्हणजें १८६०-६१ चा होय.

रा ज्य का र भा र. - जिल्ह्याचा मुख्याधिकारी कलेक्टर असून त्याच्या मदतीस चार डेप्युटीकलेक्टर आहेत. प्रत्येक तहशीलीवर एका तहशीलदाराची नेमणूक असतें. पहिली जमाबंदी जमीनीची मोजणी वगैरे काही न करितां नुसती अंदाजानें ठरविण्यांत आली. खरी जमाबंदी १८६३ व १८७३ च्या दरम्यान करण्यांत आली. १८७९ मध्ये२.९ लाख उत्पन्नाची जलेसर तहशील आग्रा जिल्ह्यांतून ह्या जिल्ह्यांत घेण्यात आली. अगदी नवीन जमाबंदी म्हणजे १९०२ व १९०५ च्या दरम्यान करण्यांत आली. सारावसुली (१९०३-४) १०९३ हजार; एकंदर उत्पन्न (१९०३-०४) १६६७ हजार; सुमारें शेकडा ३ लोकांस लिहितां वाचतां येतें.

त ह शी ल. - (संयुक्त प्रांत) इटा जिल्ह्याच्या मध्यभागी असलेली एक तहसील. ह्यांत इटा-सकीत, सोनहार व मारहर तालुक्यांचा समावेश होतो. क्षेत्रफळ ४८० चौ.मैल लोकसंख्या (१९११) २४६८३०. बहुतेक जमीन सुपीक आहे. शिवाय लोअर गँजीज कालवा व त्याची बेवर शाखा, तसेंच अपर गँजीज कालवा व त्याच्या कानपूर व एटावा शाखा, यामुळें बरेंच पाणी मिळतें.

गां व. - (संयुक्त प्रांत) इटा जिल्ह्याचें व तहसिलीचें मुख्य ठिकाण. कानपूर अच्छनेरा रेल्वेच्या कासंगाव स्टेशनापासून १९ मैल. लो.सं.(१९११) ७१९५. दिल्लीच्या पृथ्वीराजाचा वंशज चव्हाण रजपूत संग्रामसिंग ह्यानें हा गांव १४ व्या शतकांत स्थापिला म्हणतात. ह्याच्या वंशजाकडे भोवतालचा प्रदेश बंडाच्या सालापावेतो होता. पण त्यासाली धमारसिंगाने बंड पुकारलें. म्युनिसिपालिटीची स्थापना १८६५ साली झाली. येथे एक सरकारी जिल्हा शाळा व मिशनशाळा आहे.  येथे अमेरिकन प्रेसविटेरियन मिशनची शाखा आहे.  कांही कापसाची सरकी काढण्याच्या व कापूस दाबण्याच्या गिरण्या गांवांत आहेत.

[इं.गॅ. १२. सेटलमेंट रिपोर्ट (१८७४). जिल्हा गॅझीटियर (१८७६). सेन्सस रिपोर्ट]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .