प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

आस्ट्रिया हंगेरी - या नावाचा देश महायुध्दापूर्वी मध्ययूरोपांत होता. महायुध्दानंतर हा एक देश न राहतां आतां त्यांत निरनिराळीं राष्ट्रें निर्माण झाली आहेत, याच्या मर्यादा - पूर्वेस रशिआ आणि रुमानिया; दक्षिणेस रुमानिया, सर्व्हिआ, तुर्कस्तान, आणि मॉन्टेनिग्रो; पश्चिमेस, अॅड्रिआटिक समुद्र, इटली, स्वित्झरलंड, लिचटेनस्टांन आणि जर्मन साम्राज्य; उत्तरेस, जर्मन साम्राज्य आणि रशिया अशा होत्या. यूरोपच्या एकंदर क्षेत्रफळापैकीं आस्ट्रिया हंगारीनें सुमारें १६ वा हिस्सा व्यापलेला होता. १९०५ सालीं २३९९७७ चौ. मैल क्षेत्रफळ होतें. आस्ट्रिया आणि हंगेरी हीं दोन्ही स्वतंत्र राज्यें एकाच राजाच्या छत्राखालीं होतीं. १९०१ सालीं येथील लोकसंख्या ४५४०५२६७ होती. बोन्सिआ आणि हर्झेगोव्हिना येथील राज्यकारभार बर्लिनच्या १८७८ सालच्या तहाप्रमाणें आस्ट्रिया हंगेरीच्या हातीं ठेवला होता. व हे दोन्ही १९०९ सालीं आस्ट्रिआ हंगेरीला जोडण्यांत आले होते.

रा ज्य का र भा र. - आस्ट्रिया आणि हंगेरी हे दोन्ही देश अगदीं स्वतंत्र आहेत, फक्त त्यांचा राजा आणि कांही बाबतींत राज्यकारभार एक होता. परराष्ट्रीय राज्यकारभार, सैन्य आणि जमाखर्च या तिन्ही गोष्टींत दोन्ही देशांचा कारभार एक होता.

एकसत्ताक राज्यपध्दतीच्या सामान्य कारभाराला लागणारा खर्च आस्ट्रिया आणि हंगेरी या दोहोंमध्यं वाटला जात असे. या खर्चापैकीं कोणी किती करावयाचा हें अगोदरच कांही वर्षांकरितां ठरविण्यांत येत असे. त्याप्रमाणें १८९७ पासून १९०७ जुलैपर्यंत शंभरांपैकीं आस्ट्रियानें ६६ ३/४९ वा हिस्सा आणि हंगेरियाने ३३ ३/४९ वा हिस्सा द्यावा असें ठरिवण्यांत आलें होते . १९०७ पासून पुढे हंगेरीने ३६.४ वा हिस्सा द्यावा असे ठरविण्यात आले. या खर्चाला संमति देण्याचा अधिकार दोन्ही राष्ट्रांनीं निवडलेल्या कांहीं लोकांच्या सभेकडे असे.

ल ष्क र. - या दोन्ही ठिकाणची लष्करीपध्दत एकसारखीच होती. या दोघांचें एक सामायिक सैन्य असून प्रत्येकाचें याशिवाय निरनिराळें सैन्य असे. सामान्य फौज सामायिक असे. तिच्यावर एक संयुक्त प्रधान नेमलेला असे व प्रत्येकाच्या निरनिराळया सैन्यावर निरनिराळा प्रधान असे. लष्करी खात्याच्या देखरेखीसाठीं या एकछत्रीराज्यपध्दतीचे १६ लष्करी भाग केले होते आणि १०८ आणखी निराळे भाग केले होते (१०५ फौजे करितां आणि तीन आरमारा करितां).

त ट बं दी चीं ठि का णें - मुख्य तटबंदीचीं ठिकाणें क्रॅको आणि झेमिसल गॅलिशिआमध्यें, कोमारोन  पेटरव्हारड, ओअरड, टेमेस्व्हार; सेरजिवो, मोस्टर आणि बिलेक बोस्रिआ हर्झेगोविना प्रांतात; अॅड्रिआटिक समुद्र किनाऱ्यावरील पोला हें आरमारी बंदर; त्याचप्रमाणें ट्रीस्ट, झर आणि कट्टारो हीं होत.

व्या पा र. - ज्याप्रमाणें आस्ट्रिया आणि हंगेरी याचा काहीं बाबतींत राज्यकारभार एक असे तसा त्यांच्या व्यापारांतहि कांहीं कारभार एकत्र असे. उदाहरणार्थ व्यापार विषयक जकाती वगैरे बाबी, उत्पन्नावरील कर, चलन, आस्ट्रोहंगेरियन पेढी व ज्यांत दोहोचे हितसंबंध निगडित आहेत अशा रेल्वे वगैरे.

आ या ती चा मु ख्य मा ल. - हा म्हणजे कापूस आणि कापसाचा माल; लोकंर आणि लोंकरीचा माल; रेशीम आणि रेशमी माल; कॉफी, तंबाखू आणि धातु हा होता.

नि र्ग ती चा मा ल. - लांकूड, साखर, गुरें, कांच आणि कांचसामान, लोखंड आणि लोखंडीसामान, अंडीं, कडधान्य, वस्त्रसामग्री, भपकेदार माल, मातीचें कुंभारकाम आणि चामडयाचें सामान.

या दोन्ही राष्ट्रांची एक 'आस्ट्रोहंगेरिअन बँक' आहे हिची १८१६ मध्यें स्थापना झाली व तिलाच फक्त बँक नोटा काढण्याचा अधिकार असे.

इ ति हा स. - हॅबस्बर्ग या घराण्यांतील राजे इसवी सन १८०४ पासून आस्ट्रियाचे बादशहा झाले. त्या सालीं होली रोमन बादशहांपैकीं शेवटचा बादशहा फ्रान्सिस यानें आपल्याला आस्ट्रियाचा बादशहा असें म्हणवून घेतलें. परंतु 'आस्ट्रियाचे बादशहा' ही पदवी फक्त नांवाचीच होती. कारण, हॅब्स्बर्ग घराण्याचा इतर लहान लहान राज्यांशीं  फारसा संबंध आलाच नाहीं. व त्यांनी 'बादशहा' हा किताबहि कबूल केला नाहीं; व त्या बादशहाची सत्ताहि फार नव्हती; ते फक्त नामधारी बादशहा होते.

डॅन्यूब नदीच्या तीराजवळ एक लहानसा प्रदेश आहे, तेंच आस्ट्रियाचें उगमस्थान होय. या प्रदेशानेंच फ्रँक लोकांच्या राज्याचें स्लाव्ह लोकांपासून रक्षण केलें. याच प्रदेशाला ऑस्ट्रीरीच् (ऑस्ट्रिया) म्हणजे पूर्वेकडचे राज्य असें म्हणत. याच प्रदेशाची हळू हळू वाढ होऊन आस्ट्रिया हंगेरीचें साम्राज्य बनलें. बेबनवर्ग घराण्यानें या प्रदेशाची बरीच वाढ करून त्याला बळकटी आणिली. व नंतर हॅब्सबर्ग घराण्यानें आसपासच्या प्रदेशावरहि आपला ताबा बसविला. परंतु आस्ट्रियाच्या या प्रगतीनें यूरोपमध्यें आस्ट्रियास विशेष महत्त्व मिळालें नाहीं. स्लाव्ह लोकांनां जर्मनींत न येऊं देण्याच्या कामीं आस्ट्रियाचा उपयोग झाला. ऑस्ट्रियामध्यें टयूटन व स्लाव या लोकांच्या नेहमीं स्वाऱ्या होत. याचमुळें आस्ट्रियाच्या इतिहासाचें यूरोपमध्यें महत्त्व आहे.

हल्ली ज्याला 'आस्ट्रिया' असें म्हणतात, तेथें ख्रिस्ती शकापूर्वी तौरिस्की किंवा नॉरिसी या जातीचे लोक रहात असत; इ. स. पूर्वी रोमन लोकांनीं यांनां जिंकलें. डॅन्यूब नदीच्या उत्तरेकडे, मारकोमनी क्बादि जातींचे लोक रहात असत; व हेहि रोमन लोकांशीं नेहमीं भांडत असत. ख्रिस्ती धर्माचा थोडाबहुत प्रसार येथें झाला, परंतु रोमन बादशहांच्या दौर्बल्यामुळें, रानटी लोकांनीं आस्ट्रियास बराच त्रास दिला; व हूण लोकांनीं तर बरेच हल्ले केले. इ. स. ५९० च्या सुमारास येथें स्लेव्हॉनिक लोक रहात होते. या लोकांचा अव्हार लोकांच्या राज्यामध्यें समावेश होत असे. या अव्हार लोकांचा इ. स. ८०५ त पराभव होऊन यांचा देश फ्रँक लोकांच्या साम्राज्याखालीं आला.

ओटो दि ग्रेट हा आस्ट्रियाचा खरा संस्थापक होय. इ. स. ९७६ त दुसऱ्या ओटोनें बेबनबर्ग घराण्यांतील, लिओपोल्ड यास आस्ट्रियाचें राज्य दिलें. लिओपोल्ड व त्याचे वंशज यांनीं १२४६ पर्यंत राज्य करून आस्ट्रियाची स्थिति बरीच सुधारली. यावेळीं व्हिएन्ना हें राजधानीचें ठिकाण होतें. याच सालीं, जर्मनींत शांतता रहावी या हेतूनें पहिल्या फ्रेड्रिकनें, आस्ट्रिया देश हा एक स्वतंत्र डयूक नेमून त्याच्या स्वाधीन केला व त्याला महत्त्वाचे हक्कहि दिले. बादशहानें बोलाविलें असतां त्याच्या भेटीस जाणें व सैन्य पाठविणें या गोष्टी त्या डयूकला कराव्या लागत. डयूक लिओपोल्डनें (दुसरा) लॉर्ड ऑफ कार्निओला हें नांव धारण केलें. १२४६ त बेबनवर्ग घराण्याचा शेवट झाला. त्यावेळीं आस्ट्रियाची मर्यादा वाढलेली असून, एकंदर स्थितीहि समाधानकारक होती. डयूक लिओपोल्ड (दुसरा) यानें ११९४ पासून १२३० पर्यंत राज्य केलें; याच्यावेळीं आस्ट्रियाची फार भरभराट झाली; तो व त्याचे वंशज यांनीं बहुतेक स्वतंत्रपणें राज्य केलें; बादशहानें तिकडे विशेष लक्ष दिलें नाहीं.

बेबनवर्ग घराणें बहुधा बादशहाशीं एकनिष्ठपणानें वागत असे. दुसऱ्या लिओपोल्डचें बादशहाशीं वैमनस्य होतें; परंतु लवकरच त्यांचा समेट झाला; परंतु डयूक फ्रेड्रिक (दुसरा) याचें व बादशहाचें वितुष्ट येऊन बादशहानें डयूकला बहिष्कृत केलें व १२३६ त आस्ट्रियावर स्वारी करून पूर्णपणें तो देश आपल्या ताब्यांत आणिला. पण थोडयाच काळानंतर डयुकनें आपला देश पुन्हां मिळविला; पुढें १२४६ त त्याचा खून होऊन बेबनवर्ग घराण्याचा शेवट झाला!

आ स्ट्रि या ब द्द ल तं टा. - आस्ट्रिया व स्टीरिया याबद्दलच्या वारसाहक्काच्या बाबतींत बादशहा व पोप यांमध्यें तंटा झाला; शेवटीं बोहेमियाचा राजपुत्र, ओताकर यास डयूक नेमण्यांत आलें; यानें आपल्या राज्याची व्यवस्था उत्तम प्रकारें ठेविली; व राज्यविस्तारहि बराच केला; जर्मनीची गादी मिळविण्याची त्याला महत्त्वाकांक्षा होती. परंतु इ. स. १२७३ त रुडॉल्फ हा जर्मनीचा राजा झाला; त्याचें ओताकरशीं वैर पडून, लढाई झाली; त्यांत ओताकरचा पराभव झाल्यामुळें, त्याला आस्ट्रियांतून घालवून देण्यांत आलें; व आस्ट्रियाचा कारभार रुडाल्फच्या मुलाकडे आला; आस्ट्रियाच्या डयूकांपैकीं चौथा डयूक रुडाल्फ हा अतिशय प्रसिध्द आहे. त्यानें व्हिएन्ना येथें १३६५ त एक विश्वविद्यालय काढिलें; आस्ट्रिया स्वतंत्र व्हावा अशी त्याची इच्छा होती; त्यानें आपली राज्यमर्यादा बरीच वाढविली; तो मेल्यानंतर त्याच्या लिओपोल्ड व आल्बर्ट या भावांनीं तो देश वांटून घेतला. पुढें रुडॉल्फच्या वंशजांपैकीं, पांचावा आल्बर्ट हा १४३८ त जर्मनीचा राजा झाला, व त्यास पुढें हंगेरी व बोहेमिया हीं राज्येहि मिळालीं; परंतु त्याच्या मरणानंतर त्याच्या सर्व राज्यांत अव्यवस्था झाली व हॅब्स्बर्ग घराणें अगदीं मोडकळीस आलें. परंतु पहिल्या मॅक्झिमीलिअन बादशहानें आस्ट्रियाचा सर्व मुलूख आपल्या ताब्यांत आणिला. त्यानें आस्ट्रियांत उत्तम प्रकारची व्यवस्था केली.

यूरोपीय मध्ययुगाच्या शेवटीं ऑस्ट्रियाचा बराच विस्तार झाला; परंतु त्या मानानें त्याची अंतःस्थिति चांगली नव्हती. मॅक्झिमीलिअननें एकीकरणाचें काम केलें होतें, त्यांत आणखी दोन गोष्टींची भर पडली. (१) यूरोपच्या आग्नेय दिशेकडे तुर्कांची होत असलेली प्रगति व (२) ऱ्हाइन नदीवरील हॅब्स्बर्ग घराण्याच्या देशाचा नाश. पहिल्या गोष्टींमुळें निरनिराळे देश स्वसंरक्षणासाठी एकत्र झाले व दुसरीमुळें हॅब्स्बर्ग पूर्वेकडे आपला विस्तार करण्याचा विचार करूं लागले. मॅक्झिमीलिअननंतर स्पेनच्या चार्लस बादशहाकडे आस्ट्रियाचा कारभार आला; त्यानें आपला भाऊ फर्डिनंड यास आस्ट्रिया, बोहेमिया व हंगेरी हे देश दिले; परंतु १५२६ ते १६९९ पर्यंत हंगेरीचा बहुतेक भाग तुर्कांकडे होता. पांचव्या चार्लस् बादशहाला तुर्कांपासून हंगेरीची सुटका करितां आली नाहीं; त्याचा भाऊ फर्डिनंड (१५५६-१५६४) यानें अर्वाचीन हॅब्स्बर्गआस्ट्रियन साम्राज्याची स्थापना केली. दुसऱ्या मॅक्झिमीलिअनचे वेळीं राज्यांत शांतता होती. तुर्क लोकांचें वर्चस्व कायम होतें. दुसऱ्या रुडॉल्फच्या वेळीं जिकडे तिकडे अव्यवस्था व दंगेधोपे चालू होते. इ. स. १६०६ त मॅथिअस याच्या हातीं मुख्य कारभार देण्यांत आला; परंतु त्याच्या हातून नीट व्यवस्था झाली नाहीं व बोहेमिया स्वतंत्र झाला.

दुसऱ्या फर्डिनंडनें प्रॉटेस्टंट पंथ मोडून टाकण्याचा प्रयत्न केला; हा १६१८ त बोहेमियाचा राजा झाल्यावर बोहेमियांत जेसुइट लोकांचा अंमल बसविण्याचा यानें निश्चय केला; व यामुळेंच ''तीस वर्षांच्या युध्दास'' सुरुवात झाली (१६१८). फर्डिनंडच्या अंमलाखालीं इ. स. १६३० पर्यंत ऑस्ट्रियाची भरभराट झाली; परंतु त्या सालीं ऑस्ट्रियास उतरती कळा लागली. इ. स. १६३५ त त्या युध्दांत फ्रान्स सामील झाल्यामुळें त्या युध्दाचें धार्मिक स्वरूप जाऊन त्यास राजकीय स्वरूप प्राप्त झालें. या युध्दाने ऑस्ट्रियाचे फार नुकसान झाले; ''होली रोमन'' साम्राज्याचे अनेक विभाग झाले; हॅब्स्बर्ग घराण्यांतील राजे साम्राज्याचे हिताहित न पाहतां फक्त ऑस्ट्रियाकडेच लक्ष्य पुरवूं लागले. लिओपोल्डनें (१६५७-१७०५) एकंदर रज्यकारभाराचें धोरण निश्चित केलें. याच्या कारकीर्दीत तुर्कांचा पुरा मोड होऊन पूर्वेकडे ऑस्ट्रियाचा अंमल कायम झाला. लिओपोल्डनें शिक्षणास बरेंच उत्तेजन दिलें; व विश्वविद्यालयें स्थापन केलीं. लिओपोल्ड १७०५ मध्यें वारला. नंतर जोसेफ आला (१७०५-११) जोसेफनंतरचा राजा सहावा चार्लस होय. जोसेफच्या कारकीर्दीत ''स्पानिशवारशा'' ची लढाई (पहा) सुरू झाली ती युट्रेक्टच्या तहानें संपली.

युट्रेक्टतहाने (१७१४) बुर्बोन घराण्याकडे स्पेन राहिला. व स्पॅनिश नेदरलंड, सार्डिनिआ व नेपल्स हे देश ऑस्ट्रियास मिळाले. अठराव्या शतकाच्या आरंभी आस्ट्रियाची सत्ता बरीच वाढली. व एकंदर परिस्थिति समाधानकारक दिसत होती; तरी पण सुरळीतपणें राज्य चालविण्याच्या बाबतींत पुष्कळ अडचणी होत्या. या सर्व अडचणींना तोंड देऊन राज्यशकट चालविणें म्हणजे सोपें काम नव्हे व त्याला, चांगल्या अनुभवी व बुध्दिमान मुत्सद्याची आवश्यकता असते. परंतु चार्लस (सहावा) (१७११-१७४०) याच्या अंगी मुत्सद्दीपणा नसल्यामुळें. तो वारल्याबरोबर, सर्व राष्ट्रांस आस्ट्रियाबद्दल लोभ सुटला. तुर्क लोकांबरोबर चार्लसला युध्द करावें लागलें (१७३८-३९) व त्यांत त्याचा पराभव झाल्यामुळें आस्ट्रियाची स्थिति फारच शोचनीय झाली.

अशा स्थितींतहि चार्लसच्या मरणानंतर त्याची मुलगी मराया थेरिसा हिनें मोठया धैर्यानें व दृढ निश्चयानें शत्रूंशीं टक्कर देऊन आस्ट्रियाचा बचाव केला; परंतु प्रशियानें आस्ट्रियापासून सायलेशिया प्रांत घेतला. मराया थेरिसाने आस्ट्रियाचे प्रथमतः एकीकरण केलें. हिच्या वेळीं जर्मन भाषा सर्व सरकारी खात्यांत वापरण्यांत येऊं लागली. हिच्या कारकीर्दीत अनेक सामाजिक व धार्मिक सुधारणा घडून आल्या. शिक्षणपध्दतींत अनेक फेरबदल करण्यांत आले व विश्वविद्यालयांत नवीन विषय ठेवण्यांत आले.

यानंतर आलेला दुसरा जोसेफ हा रूसोचा अनुयायी होता; तो क्रांतिवादी होता; उपाध्याय वर्गाला त्यानें पूर्णपणें आपल्या अंमलाखालीं आणून, रोमशीं असलेला सर्व संबंध तोडून टाकिला. लोकांस सक्तीनें लष्करांत दाखल करण्याची पध्दत त्यानें सुरू केली. यामुळें लोकांचीं मनें क्षुब्ध झालीं. व जिकडे तिकडे बंडें होऊं लागलीं. बव्हेरिया प्रांत मिळविण्यासाठीं त्यानें खटपट चालू केली, परंतु त्यांतहि त्यास यश आलें नाहीं. तो १७९० त मरण पावला.

लिओपोल्ड (दुसरा) हा योग्य मनुष्य होता. त्यानें राज्यांत सुव्यवस्था केली. १७९१ तुर्क लोकांबरोबर तह होऊन जिकडे तिकडे शांतता झाली.

नेपोलियननें जर्मनींत ढवळाढवळ केल्यामुळें आस्ट्रिया व जर्मन संस्थानें यांमध्यें बरीच क्रांति घडून आली. इ. स. १८०४ त फ्रान्सिस (दुसरा) यानें 'आस्ट्रियाचा बादशहा ही पदवी धारण केली. परंतु दोन वर्षांनीं त्याचा पराभव झाल्यामुळें, व्हेनिस व टिरोल हे प्रांत आस्ट्रियाच्या ताब्यांतून गेले. जर्मनीचे अनेक विभाग होऊन फ्रान्सिसनें बादशहा ही पदवी सोडून दिली व होली रोमन साम्राज्याचा शेवट झाला (१८०६). व्हिएन्नाच्या तहानें आस्ट्रियाचा बराच पाणउतारा झाला (१८०९) परंतु रशियन स्वारींत नेपोलियन यास अपयश आल्यामुळें आस्ट्रियानें आपली हानि भरून काढिली व नेपोलियनचा सूड उगविला.

नेपोलियनचा पाडाव करण्यांत आस्ट्रियानें बराच भाग घेतल्यामुळें, नेपोलियननें नाहींशी केलेली यूरोपची शक्तिसमता कायम ठेवण्यासाठीं, व्हिएन्ना येथेंच महापरिषद भरविण्यांत आली (१८१४).

दुसऱ्या फ्रान्सिस नंतर आस्ट्रियाचा राज्यकारभार मेटरनिक याच्या हातांत आला. तो मोठा महत्त्वाकांक्षी होता. सद्यस्थितींत एकदम फेरबदल करून लोकांचीं मनें क्षुब्ध न करितां फक्त आवश्यक अशा सुधारणा हळु हळु केल्या जाव्या हें त्याचें मुख्य तत्त्व होतें. मेटरनिकचा कारभार एकंदरींत यशस्वी झाला. व्हिएन्ना परिषदेनंतर १५ वर्षेपर्यंत यूरोपांत शांतताभंग झाला नाहीं; व १८३० सालांतील पॅरिसच्या राज्यक्रान्तीचाहि ऑस्ट्रियावर कांही एक परिणाम झाला नाहीं. त्या नंतर गादीवर आलेला फर्डिनंड (पहिला) हा लोकप्रिय होता; परंतु तो राज्यकारभार करण्यास नालायक असल्यामुळें, एक प्रतिनिधिमंडळ नेमण्यात आले; परंतु त्या मंडळातील आपापसांतील कलहांमुळें राज्यकारभारांत बराच गोंधळ माजून राहिला; व लोकांमध्यें असंतोष पसरला. गॅलिशियामध्यें शेतकरी लोकांनीं बंड केलें; कारण त्यांनां सरंजामी पध्दत नको होती. ही त्यांची मागणी कबूल केली गेली; परंतु तेवढयानें त्यांचें समाधान न होतां राज्यपध्दतींत पूर्ण बदल झाल्याशिवाय आपली दुःखें कमी होणार नाहींत, असें त्यांस वाटून, राज्यक्रान्ति करण्यासाठीं त्यांनीं बंड केलें. राष्ट्रीय पक्षाचे लोक व हे शेतकरी एकत्र झाल्यामुळें आस्ट्रियामध्यें क्रान्ति घडून आली. मंत्रिमंडळाच्या सभागृहासभोंवती बंडखोर लोक जमून तेथें त्यांनीं दंगा केला. मध्यम वर्गाचे लोकहि बंडवाल्यांस सामील झाले. अशा प्रकारें बंडास राज्यक्रान्तीचें स्वरूप आलें. या बंडखोरांच्या कृत्यानें भिऊन मेटरनिक इंग्लंडमध्यें पळून गेला. मेटरनिकच्या पाडावाबरोबर, मध्ययूरोपांत सर्वत्र खळबळ उडून गेली. हंगेरी स्वतंत्र झाला. बोहेमियामध्येंहि नवीन राज्यपध्दति सुरू झाली. मोठा वादविवाद होऊन ता. ३१ आगष्ट १८४८ रोजीं सरंजामी पध्दतीचा व नोकरीचा कायदा रद्द करण्यांत आला. राज्यक्रान्तीचा हाच काय तो टिकाऊ परिणाम झाला. व अशा प्रकारें शेतकरी लोकांची इच्छा परिपूर्ण झाली.

स्लाव्ह लोक व साम्राज्यांतील पुराणमतवादी (कॉन्झर्व्हेटिव्ह) लोक यांचा जेलाकिच हा पुढारी झाला. इलीरिअन पक्षाचे आपण आहोंत असें त्यानें दर्शविलें व हंगेरियाशीं असलेलें दळणवळण बंद करून टाकिलें; परंतु व्हिएन्ना येथील बंडखोरांविरुध्द मॅजीरची मदत येईल असें सरकारास वाटत असल्यामुळें सेनापति जेलाकिच याच्या कृत्याचा त्यानें निषेध करून राजद्रोहाच्या आरोपावरून त्यास सेनापतीच्या पदावरून काढून टाकण्यांत आलें. त्याचा अंतस्थ हेतू वाईट नव्हता; तो राजनिष्ठ होता. यामुळें पुनः लवकरच त्यास त्याची पूर्वीची जागा देण्यांत आली. लवकरच आस्ट्रिया व हंगेरी हे देश निरनिराळे झाले, जेलाकिच हा हंगेरीवर स्वारी करण्यासाठीं निघाला.

इकडे व्हिएन्ना येथें पुनः अस्वस्थता झाली. आमूलाग्र सुधारणापक्षाचें (रॅडिकल) सरकारशीं व स्लाव्ह लोकांशीं वितुष्ट पडलें. ज्याचें आस्ट्रियावर प्रेम असेल व ज्याला स्वातंत्र्य पाहिजे असेल त्यानें बादशहाला येऊन मिळावें असें फर्डिनंड बादशहानें जाहिर केलें. विन्डिसंग्रेट्स यास सेनापति नेमण्यांत आलें; व लवकरच त्यानें व्हिएन्ना आपल्या हस्तगत करून घेतलें.

डिसेंबर १८४८ त फर्डिनंडनें राजीनामा दिल्यामुळें, फ्रान्सिस जोसेफ हा बादशहा झाला. साम्राज्यांतील सर्व देश व सर्व लोक पुनः एका छत्राखालीं आणण्याचें जोसेफनें ठरविलें, बंडवाल्यांचा पुढारी व्हिलॅगाज स्वाधीन झाल्याबरोबर, हंगेरियांतील बंड मोडलें व जर्मनींत आस्ट्रियाचें वर्चस्व स्थापण्यास संधि सांपडली.

इसवी सन १८५१ त ऑस्ट्रियामध्यें पुनः शांतता झाली. इसवी सन १८६३ त फ्रान्सिस जोसेफनें फ्रँकफोर्ट येथें सर्व राजांनां बोलाविलें होतें; तेव्हां लहान लहान संस्थानांत आस्ट्रियाचें वर्चस्व दिसून आलें, परंतु प्रशिया सामील झाल्याशिवाय सर्व लहान लहान संस्थानांत एकी होणें शक्य नाहीं हेंहि त्यावेळीं दृष्टोत्पत्तीस आलें. श्लेस्विग होल्टेन प्रश्नाच्या योगानें आस्ट्रिया व प्रशिया यांमध्यें उघडपणें वैमनस्य उत्पन्न होऊन १८६६ त आस्ट्रियाचा पाडाव झाला.

प्रागच्या तहानें आस्ट्रियाचा जर्मनीशीं असलेला संबंध नाहींसा झाला. आपण स्वतंत्र असावें असें हंगेरियन लोकांसहि वाटूं लागलें; व त्यांनीं बंड केलें. आस्ट्रियाचा व आपला कांहीं एक संबंध नाहीं असें हंगेरिअन लोकांस वाटलें. हंगेरीमध्यें निराळें पार्लमेंट व मांत्रिकमंडळ असावें, बादशहानें हंगेरीमध्यें फक्त राजा या नात्यानें राज्य करावें; प्रत्येक देशाचें जमाबंदीखातें निराळें असावें, वगैरे गोष्टी निश्चित झाल्या. दोन्ही पार्लमेंटमधून निवडलेल्या साठ प्रतिनिधींनां दोन्ही देशांतील सामान्य प्रधान जबाबदार असावेत; व दोन्ही देशांतील सामान्य कामें या प्रतिनिधींवर सोंपविण्यांत यावीं असाहि ठराव झाला.

आस्ट्रिया व फ्रान्स यांचें सख्य होतें. इ. स. १८७२ त रशिया व आस्ट्रिया यांचेंहि सख्य झाल्यामुळें, सर्वत्र शांतता झाली. पण लवकरच बाल्कनमध्यें चळवळ सुरू झाली; बोस्निआ व हर्झिगोविना या ठिकाणीं झालेल्या बंडाचा आस्ट्रियावर परिणाम झाला. त्या ठिकाणचे अनेक लोक आस्ट्रियामध्यें येऊन राहूं लागले. तुर्कस्तानांतील ख्रिस्ती लोकांच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करणें आस्ट्रियाला शक्य नव्हतें; परंतु हंगेरियन लोक तुर्कांच्या बाजूचे असल्यामुळें ख्रिस्ती लोकांनां प्रत्यक्ष मदत करणें त्याला शक्य नव्हतें;. रशियाचीहि तुर्कांनां मदत होती; रशियाचें वर्चस्व वाढूं देणें हेंहि आस्ट्रियाला धोक्याचें होतें. जर्मनीच्या मध्यस्थीमुळें तुर्कस्तान व आस्ट्रिया यांमध्यें कांहीं कालपर्यंत सलोखा राहिला; परंतु हें सख्य फार वेळ टिकलें नाहीं. ग्रेटब्रिटन या भांडणांत पडल्यामुळें, आस्ट्रियाचा बराच त्रास कमी झाला. बर्लिन परिषदेंत असें ठरलें कीं, बोस्निआ व हर्झिगोविना हे प्रांत तुर्कांकडे न ठेवितां, किंवा रशियाकडे जाऊं न देतां, आस्ट्रियानें आपल्या ताब्यांत घ्यावे.

इटालीमध्यें 'इरेडेंटिस्ट' या नांवाचा एक पक्ष होता. त्याचें असें म्हणणें होतें की आस्ट्रियाच्या ताब्यांत असलेल्या प्रांतापैकीं ज्या प्रांतांत इटालियन भाषा चालते ते प्रांत इटलीला जोडण्यांत यावें; या कारणामुळें तेथें बरीच चळवळ झाली; परंतु लवकरच ही चळवळ बंद पडली.

इ. स. १८७९ त आस्ट्रिया व जर्मनी यांमध्यें सलोख्याचा तह होऊन त्यांत असें ठरलें कीं एकमेकांनीं एकमेकांनां मदत करावी. या वेळेपासून विशेष महत्त्वाकांक्षा न बाळगतां शांतता राखणें हें आस्ट्रिया हंगेरीचें धोरण होतें. बाल्कन स्टेटमध्यें व्यापार करून आपलें वर्चस्व राखणें, व रुमानिया, सर्व्हिया, बल्गेरिया वगैरे देशांशीं व्यापारासंबंधीं तह करणें हे आस्ट्रिया हंगेरीचे त्या वेळचे उद्देश होते.

एकंदर यूरोपमध्यें शांतता नसल्यामुळें व इतर देशांनीं आपलें लष्करी सामर्थ्य वाढविल्यामुळें, आस्ट्रियालाहि आपलें सैन्य वाढविणें आवश्यक झालें. इ. स. १८६८ त आस्ट्रिया व हंगेरी या दोन्ही देशांत सक्तीचें लष्करी शिक्षण सुरू करण्यांत आलें; व प्रत्येक मनुष्यानें लष्करांत नोकरी केलीं पाहिजे असें ठरविण्यांत आलें. इ. स. १९०३ त आस्ट्रिया हंगेरीनें जर्मनी, इताली, बेल्जम व स्वित्झर्लंड या देशाशीं व्यापारसंबंधाचे तह केले. अशा प्रकारें १०९३ पर्यंत व्यापार सुरक्षितपणें चालला. या व्यवस्थेमुळें आस्ट्रियाची सांपत्तिक स्थिति सुधारली.

१९०३ ते १९०७ हा काल आस्ट्रिया हंगेरीच्या इतिहासांत महत्त्वाचा आहे. सॅदोवा येथें प्रशियानें इ. स. १८६६ त केलेला आस्ट्रियाचा पराभव, १८६७ त स्थापन झालेलीं दोन निराळीं राज्यें व १८७१ त नवीन जर्मन साम्राज्याची स्थापना या सर्व गोष्टींमुळें, आस्ट्रिया हंगेरीच्या खऱ्या इतिहासाला प्रारंभ झाला; परंतु १९०३ ते १९०६ पर्यंतच्या अडचणी व सर्वानां मत देण्याचा अधिकारी असला पाहिजे या तत्त्वाचा प्रसार, या दोन गोष्टींमुळें, आस्ट्रिया व हंगेरी यांमध्यें द्विदल राज्यपध्दतीवरील विश्वास उडाला व आस्ट्रिया हंगेरीच्या राज्यव्यवस्थेचें स्वरूप टिकाऊ आहे किंवा नाहीं हा प्रश्न उपस्थित झाला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं आस्ट्रिया व हंगेरी या दोन्ही देशांत मोठे आणीबाणीचे प्रसंग आले. आस्ट्रियाचा कारभार प्रधानमंडळाकडे असून, ते प्रधान नांवाला पार्लमेंटला जबाबदार होते; परंतु वस्तुतः ते फक्त बादशहालाच जबाबदार होते. अशा प्रकारें एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं आस्ट्रियाची राज्यव्यवस्था  फारशी समाधानकारक  नव्हती, परंतु हंगेरीची व्यवस्था इतकी वाईट नव्हती इ. स. १८९९ त प्रधानमंडळाची स्थापना झाली परंतु उदाहरमतवादी पक्षाचें पुढारीपण कायम राहिलें. इ. स. १९०२ त हंगेरीचा मुख्य प्रधान झेल यानें आस्ट्रियन प्रधान कोरबर याच्याशीं व्यापारसंबंधाचा तह केला; व या तहाच्या तत्त्वांवरून, आस्ट्रिया हंगेरीनें जर्मनी, इटली वगैरे राष्ट्रांशीं व्यापारासंबंधीं तह केले. आस्ट्रिया व हंगेरी यांमधील हा तह फार महत्त्वाचा आहे; या तहाच्या योगानें आस्ट्रिया हंगेरीचे वैमनस्य नाहीसें होऊन त्याठिकाणीं शांतता होईल असें लोकांस वाटलें; परंतु ही आशा पुढें निष्फळ झाली.

इ. स. १९०५ त आस्ट्रिया हंगेरीनें जर्मनी व इटली या देशांशीं व्यापारासंबंधाचे तह केले. या तहांमुळें सांपत्तिक अडचणीपासून हंगेरीचा बचाव झाला व ऑस्ट्रियांशीं असलेल्या सहकारित्वापासून हंगेरीला आपला फायदा करून घेतां आला.

आस्ट्रिया व हंगेरी यांमध्यें एकमेकांविषयीं पुष्कळ दिवसपर्यंत असंतोष माजून राहिला होता. अखेरीस इ. स. १९०७ मध्यें त्यांचा सलोख्याचा तह झाला. आस्ट्रियाचा व हंगेरीचा संबंध तुटल्यास, व्यापाराच्या दृष्टीनें हंगेरीचें फार नुकसान होईल व आस्ट्रियामध्येंहि महागाई होऊन, तेथील कारखान्यांचें नुकसान होईल असें आढळून आल्यामुळें त्या दोन राष्ट्रांमध्यें १९०७ सालीं व्यापारसंबंधाचा व राज्यव्यवस्थेसंबंधाचा एक नवीन करार होऊन दोन्ही देशांत शांतता झाली .

इ. स. १८६७ पा सू न आ स्ट्रि यां ती ल शा स न सं स्थे चा इ ति हा स. - हॅब्सबर्ग घराण्याच्या ताब्यांतील प्रदेशांपैकीं १८६७ च्या कराराप्रमाणें ज्या प्रदेशाचा समावेश हंगेरीच्या राजाच्या ताब्यांतील प्रदेशांत झाला नाहीं, त्या प्रदेशाला ऑस्ट्रिया हें नांव आहे. हंगेरी वेगळा झाल्यामुळें आस्ट्रियाची राज्यपध्दति ठरविणें भाग पडलें. यासाठीं अनेक प्रयोग करून पाहण्यांत आले. इ. स. १८६१ च्या फेब्रुवारींत राज्यकारभाराचे नवीन नियम करण्यांत आले. त्या नियमांप्रमाणें पार्लमेंटची योजना झाली, बडया लोकांची सभा (हाऊस ऑफ लॉर्डस्), राजघराण्यांतील पुरुष, कांही पगारी लोक, कांही पिढीजाद लोक व कांही प्रतिनिधी इतक्या लोकांचा समावेश पार्लमेंटमध्यें होत असे. मंत्रिमंडळाकडून प्रतिनिधींची निवड होत असे; हें मंत्रिमंडळ सहा वर्षांनीं निवडलें जात असे; परंतु ही पध्दति फार वेळ टिकली नाहीं, कारण भिन्न भिन्न देशांतील लोकांनां भिन्न भिन्न नियमांची आवड असते. जी पध्दति लोअर आस्ट्रियाला संमत होती, ती गॅलिशिया व बोहेमिया यांनां पसंत पडली नाहीं. इ. स. १८६५  त फेब्रुवारी १८६१ ची राज्यपध्दति नाहींशी झाली; फक्त मंत्रिमंडळ कायम राहिलें. हंगेरीशीं करारनामा करण्यासाठीं इ. स. १८६७ सालीं समाईक पार्लमेंट बोलाविणें आवश्यक झालें.

स्लाव्ह व संयुक्तशासनपध्दतिपक्षीय लोकांनां द्विदलराज्यपध्दति पसंत नसल्यामुळें जर्मन लोकांचे आधिक्य असलेल्या पार्लमेटनें राज्यकारभाराचे नियम ठरवावे, असें हंगेरियन लोकांचें मत होतें. बेलक्रेडी या संयुक्तराज्यपध्दतीच्या पुरस्कर्त्यानें १८६७ त, १८६१ची राज्यपध्दति मोडून मंत्रिमंडळाची निवडणूक करण्याचें ठरविलें. या मंत्रिमंडळानें पार्लमेंटचे सभासद निवडावयाचे असून त्या सभासदांकडे हंगेरीच्या प्रश्नांचा विचार करण्याचें काम होतें; परंतु जर्मन व उदारमतवाद्यांनीं असें सांगितलें कीं, १८६१ सालांतील राज्यपध्दति अद्यापि अस्तित्वांत असल्यामुळें पार्लमेंटनें फक्त आवश्यक फेरबदल करावे; हंगेरीशीं तह करूं नये, असें संयुक्तशासनपध्दतिवाद्यांनां वाटत असल्यामुळें अशा परिस्थितींत निवडलेलें पार्लमेंट हंगेरीशीं तह करण्याचें नाकारील असें बेल्क्रेडीला वाटलें; परंतु साम्राज्याला धोका येईल, असें ब्यूस्टला वाटल्यामुळें त्याला या भानगडींत पडावें लागलें. १८६१ सालांतील नियमाप्रमाणें पार्लमेंटच्या सभासदांची निवडणूक करण्याचें ब्यूस्टनें ठरविलें; परंतु संयुक्तशासनवाद्यांनां ही निवडणूक पसंत नव्हती, यामुळें निवडणुकींत त्यांनीं कांहीं एक भाग घेतला नाहीं व ते पार्लमेंटमध्यें गेले नाहींत; परंतु ब्यूस्टला इतर अनेक लोकांचा पाठिंबा असल्यामुळें त्याचें कार्य सिध्दीस गेलें. गॅलिशियाच्या पोल लोकांशीं तह करून ब्यूस्टनें त्यांनां आपल्या बाजूला वळविलें.

गॅलिशियाला स्वतंत्र प्रधान देण्याचें त्यानें ठरविलें, गॅलिशियासाठीं एक निराळें मंडळ स्थापण्याचें ठरवून जर्मनच्याऐवजी पोलिश भाषेचा प्रसार करण्याचें ठरलें. या अटीवर गॅलिशियाच्या पोल लोकांनीं व्हिएन्ना येथें जाऊन हंगेरीशीं तह करण्याबद्दल मत देण्याचें कबूल केलें.

पार्लमेंटची बैठक भरल्यावर हंगेरीशीं केलेला तह मंजूर करण्यांत आला. नंतर कित्येक महत्त्वाचे कायदे करण्यांत आले, त्या कायद्याच्या योगानें पार्लमेंटची सत्ता प्रस्थापित करण्यांत आली; इतर देशांप्रमाणेंच लोकांनां देण्यांत येणाऱ्या हक्कांचा व सवलतीचा विचार करण्यांत आला. पोल लोकांच्या वजनामुळें संयुक्तशासनपध्दतीच्या पुरस्कर्त्यांच्या इच्छेप्रमाणें त्यांस सवलती मिळाल्या. आस्ट्रियामध्यें राज्यनियमन करणाऱ्या सभेकडून प्रतिनिधींची निवडणूक होत नसून प्रत्येक देशांतील प्रतिनिधींकडून निवडणूक होत असे; परंतु हंगेरीमध्यें राज्यनियमन करणाऱ्या सभेकडूनच ही निवडणूक हात असे, या भेदामुळें हंगेरीपेक्षां आस्ट्रिया दुर्बल होता. इतकें झाल्यानंतर ब्यूस्टनें मुख्य प्रधानपदाचा राजीनामा दिला. नंतर बरगर व त्याच्या प्रधानमंडळाची नेमणूक झाली.

या प्रधानमंडळानें चर्चच्या अंमलापासून आस्ट्रियाची सुटका केली. १८५५ सालीं पोपशीं झालेल्या ठरावाच्या योगानें धर्मविषयक सर्वसत्ता चर्चकडे सोंपविलेली होती, परंतु नवीन प्रधानमंडळानें इ. स. १८६८ त चर्चचें वर्चस्व नाहींसें केलें.

या सुमारास बोहेमियन लोकांमध्यें आपापसांत कलह चालू होते. त्यांच्यामधील एका तरुणपक्षाला उमराववर्गाचें प्रभुत्व पसंत नव्हतें, प्रत्येकाला मताधिकार असावा, अशी त्याची इच्छा होती, मंत्रिमंडळांत आपला समावेश व्हावा व राजकीय सुधारणा करण्याचें कामीं जर्मन लोकांनां जाऊन आपण मिळावें अशी त्याची इच्छा होती. बोहेमियन लोकांचे आणखी दोन पक्ष आपापसांत भांडत होते. या परिस्थितीमुळें उदारमतवद्यांचें वर्चस्व झालें असतें; परंतु सरकारनें फेडरॅलिस्ट व क्लेरिकल या पक्षाच्या लोकांची मदत मागितल्यामुळें जर्मन उदारमतवाद्यांची सत्ता नष्ट झाली. १८७३ सालांतील व्यापारी क्रांतीचाहि त्यांच्यावर बराच परिणाम झाला.

काउंट टाफी या नांवाच्या प्रधानानें इ. स. १८७८ त बोहेमियन लोकांशीं सलोखा केला व त्यांनीं व्हिएन्ना येथें पार्लमेंटांत हजर रहाण्याचें कबूल केलें. सर्व पक्षांतील मवाळांच्या मदतीनें राज्यकारभार करण्याचें टाफी यानें ठरविलें. त्यानें सर्व पक्षांतील लोकांच्या प्रतिनिधींचा मंत्रिमंडळांत समावेश केला. तो कोणत्याहि विशिष्ट पक्षाचा नव्हता. ठरींव नियमाप्रमाणें त्यानें राज्यकारभार केला. वादविवादोत्पादक असे कायदे त्यानें विशेषतः केले नाहींत.

मोरॅव्हियाच्या कारखान्यांतील व गॅलिशिया येथील तेलाच्या खाणींतील मजुरांची स्थिति फार वाईट होती. त्यांनां फार वेळ काम करावें लागे; तेथील एकंदर परिस्थिति आरोग्याला हानिकारक असून अपघातांविरुध्द कांहीं एक तरतूद केलेली नव्हती. इ. स. १८८३ मध्यें, कारखाने, खाणी वगैरे ठिकाणची पहाणी करण्यांत यावी असा कायदा करण्यांत आला; नंतर इ. स. १८८४ व १८८५ त पास झालेल्या कायद्याच्या योगानें, कामाच्या वेळां कमी करण्यांत आल्या; रविवारी सुटी देण्याबद्दल ठराव करण्यांत आला व स्त्रिया व मुलें यांनीं किती तास काम करावयाचें तेंहि ठरविण्यांत आलें. प्रत्येकानें आपल्या आयुष्याचा विमा उतरलाच पाहिजे असा कायदा इ. स. १८८७-१८८८ त करण्यांत आला. सरकारनें रेल्वे आपल्या ताब्यांत घ्याव्या असें ठरविण्यांत आलें. या सुधारणांमुळें व आयात मालावरील बसविलेल्या नवीन करामुळें, इ. स. १८८९ त आस्ट्रियाची सांपत्तिक स्थिति बरीच सुधारली.

दुसऱ्या जोसेफच्या वेळेपासून जर्मन ही सरकारी भाषा झालेली होती. सैन्यांत, कचेऱ्यांत वगैरे तीच भाषा चालत असून, कायदेहि त्याच भाषेंत लिहिलेले होते, यामुळें जर्मन भाषा फार महत्त्वाची झाली होती; फक्त इटालीमध्यें इटालियन भाषा चालत असे; परंतु इ. स. १८६९ त सर्व गॅलिशियांत पोलिश भाषेचा प्रसार करण्यांत आला; व त्यावेळेपासून जर्मन भाषा नाहींशीं होऊं लागली. इ. स. १८८० त असा ठराव झाला कीं, ज्या भाषेंत एखादें प्रकरण निकालासाठीं सरकारांत आलें असेल त्याच भाषेंत त्याचा निकाल सांगण्यांत यावा; चेक (बोहेमियन) भाषेचें महत्त्व वाढविणें हा या ठरावाचा उद्देश होता. चेक भाषा शिकविण्यासाठीं कित्येक शाळा स्थापन करण्यांत आल्या; १८८२ त प्रागच्या विश्वविद्यालयांतहि त्या भाषेचा शिरकाव झाल्यामुळें, जर्मन लोकांचें जुनें विश्वविद्यालय भ्रष्ट झालें असें जर्मन लोकांनां वाटलें. आपल्या भाषेंचें वर्चस्व राखण्याचा त्यांनीं पुष्कळ प्रयत्न केला; पण त्यांत त्यांनां यश आलें नाहीं. प्रागला जर्मन युनिव्हर्सिटी स्वतंत्र आहे.

संयुक्त प्रधानमंडळ १८९५ त मोडल्यावर गॅलिशियाचा प्रसिध्द गव्हर्नर बेदनी यास मुख्य प्रधान नेमण्यांत आलें; हे मंडळ कोणत्याहि विशिष्ट पक्षाचें नव्हतें. हंगेरीशीं तडजोड करणें हा त्याचा मख्य उद्देश होता.

मत देण्याचा अधिकार अगदीं थोडया लोकांनां असल्यामुळें, आस्ट्रियांतील समाजसत्तावाद्यांचा राजकीय बाबतींत फारसा प्रवेश झाला नाहीं. परंतु इ. स. १८८७ पासून ह्यांनां चांगले दिवस येऊं लागले; सर्व लोकांनां मताधिकार असावा अशी ते मागणी करूं लागले; मे महिन्याच्या पहिल्या तारखेस आस्ट्रियामध्यें मजूरपक्षाचा मोठा उत्सव करण्यांत येत असतो.

इ. स. १८९७ त बेदनीनें असें प्रसिध्द केलें कीं, एखादें प्रकरण ज्या भाषेंत सरकारांत आलें असेल त्याच भाषेंत त्याचा निकाल सांगितला जावा. सरकारी कचेऱ्यांतुन चेक (बोहेमियन) भाषा सुरू करणें हा या कायद्याचा उद्देश होता; चेक भाषेंतून परिक्षा दिल्याशिवाय कोणलाहि सरकारी नोकरींत १९०३ च्या नंतर घेऊं नये असेंहि प्रसिध्द करण्यांत आलें; परंतु जर्मन लोकांनीं या कायद्याचा जोरानें निषेध करून, तो कायदा रद्द होईपर्यंत स्वस्थ बसावयाचें नाहीं असें ठरविलें; यामुळें जिकडे तिकडे बंडाळी चालु झाली. बेदनीनें आपल्या जागेचा राजीनामा दिला. नंतर नवीन प्रधानानें जर्मनांची समजूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांत त्याला यश आलें नाहीं; यामुळें त्यानेंहि राजीनामा दिला. नंतर थन हा प्रधान झाल्यावर त्यानें बोहेमियांत लष्करी कायदा अंमलांत आणिला. काउंट क्लेरी यानें भाषोसंबंधाचा कायदा रद्द करू तंटा मिटविण्याचा प्रयत्न केला; जर्मनांची इच्छा सफल झाली; परंतु चेक लोक त्यामुळें असंतुष्ट झाले. अखेरीस चेक व जर्मन या दोन्ही लोकांचा ज्यांत हितसंबंध आहे अशीं सार्वजनिक कामें करून त्या लोकांचा डॉ. व्हॉन कोर्बर या नवीन प्रधानानें समेट करण्याचे ठरविलें. परंतु या योगानेहि हें भांडण मिटलें नाहीं.

इ. स. १९०५ त समाजसत्तावादी व मजूरपक्षाच्या लोंकांनीं सर्वांनां आस्ट्रियांत मताधिकार असावा अशाबद्दल चळवळ चालू केली; चोवीस वर्षांपेक्षां अधिक वयाच्या व एक वर्षपर्यंत तेथें राहिलेल्या मनुष्यास मताधिकार असावा अशा अर्थाचें सुधारणापत्रक त्यांनीं प्रसिध्द केले. परंतु काहीं लोक या ठरवाविरुध्द होतें;  परंतु प्रसिध्द प्रधान, बॅरन बेक यानें कित्येक पुढाऱ्यांच्या गाठी घेऊन मोठया चार्तुर्यानें हें सुधारणापत्रक १९०६ त पास करून घेतले.

वरिष्ठ सभेनें एका मनुष्याला अनेक मतें असावीं अशी खटपट केली; परंतु ती व्यर्थ झाल्यावर १९०७ त त्या सुधारणापत्रकाचें कायद्यामध्यें रूपांतर झाले. याच सालीं झालेल्या निवडणुकींत लोकसत्तावाद्यांची सरशी झाली. सर्वांकडून निवडल्या गेलेल्या कायदेमंडळाचें काम एक वर्षपर्यंत सुरळींत चाललें. परंतु एका वर्षानंतर बोस्निया, व हर्झिगोविना हे प्रांत खालसा करण्याबद्दल जो प्रश्न निघाला त्या योगानें इतर अंतर्गत कारभारांत मोठा व्यत्यय आला.

आ स्ट्रि य न सा म्रा ज्य (१९०८-१९१८) आस्ट्रियाचें सरकारी कागदपत्रांत नांव 'साईशराठमध्यें प्रतिनिधी पाठविणारी राज्यें व प्रदेश' असें होतें, परंतु लोकांमध्यें देशाभिमान जागृत होण्यास हे नांव फारसें इष्ट नव्हतें. महायुध्दाच्या वेळीं या देशाचें स्वतंत्र नांव जाहीर करणें बादशहास भाग पडलें व त्यावेळीं त्याचें 'आस्ट्रियन साम्राज्य' असें नामा भिधान निश्चित झालें. आसन्नमरण असतां एखादा मनुष्य बाप्तिस्मा घेतो त्याप्रमाणें हें झालें. अनेक स्वतंत्र लोकांच्या आपखुषीनें हें राज्य अस्तित्वांत आल्यामुळें त्या सर्व लोकांचे पूर्वेकडील रानटी जातीपासून संरक्षण करणें हें या साम्राज्याचें मुख्य कर्तव्य होतें. हें काम साम्राज्यानें उत्तम रीतीनें केलें, परंतु या सर्व राष्ट्रांचा एकजीव करून त्यांचें एक मोठें राष्ट्र बनविण्याचें त्यास साधलें नाहीं. त्यामुळें हें साम्राज्य शेवटपर्यंत विस्कळित राहिलें. मराया तेरीसा व दुसरा जोसेफ यांनीं एकराष्ट्र करण्याचा प्रयत्न केला परंतु तो विफल होऊन घटक राष्ट्रें हीं अधिकच तुटक झालीं. नंतर जर्मन लोकांनीं सर्व राष्ट्रास आपलें स्वामित्व कबूल करावयास लावण्याचा प्रयत्न केला पण तोहि फसला. त्यानंतर सर्वांस सारखेंच महत्त्व देऊन प्रत्येक राष्ट्रास स्थानिक स्वातंत्र्य देऊन हा प्रश्न सोडविला. परंतु यामुळें राष्ट्रीय भावनांस इतका ऊत आला कीं, देशांत एक आवश्यक असें जें शासनैक्य असतें तेंहि शिथिल झाले. हीं राष्ट्रें म्हणजे जर्मन, ग्रीक, पोल, रूथीनियन, दक्षिणस्लॉव्ह हीं होत. १९०७ मध्यें मताचा अधिकार प्रत्येक मनुष्यास दिल्यानें सार्वत्रिक हिताचा विचार जास्त होऊन संकुचित राष्ट्रीय भावना मागें पडतील अशी सर्वांस आशा वाटली. या पार्लमेंटांत एकंदर सभासद ५१६ असून त्यांची वांटणी अशी होती; २२१स्लाव्ह, ११७ जर्मन, ८७ सोशल डेमोक्रॅट; परंतु कांहीं वेळानें हे डेमोक्रॅट भावनांनीं प्रेरित होऊन त्यांचे अनेक समूह झाले. हें पार्लमेंट फारच थोडें काम करीत असे. बजेट तीन किंवा सहा महिन्यापुरतेंच प्रतिनिधी पास करीत.त्यामुळें विशेष हक्कांचा उपयोग करून राज्यकारभार चालवावा लागे. सरकार व 'हाऊस ऑफ डेप्युटीज' मध्यें नेहमीं विरोध असे. विशेष हक्काचा उपयोग केल्यानंतर त्याबद्दल पुन्हां पार्लमेंट अथवा राईशराथची संमति घ्यावी लागे, परंतु १९१७ पर्यंत पार्लमेंटनें ही संमति कधींहि नाकारली नाहीं. पार्लमेंटांतील एक समुहानें एकसारखे अडवणुकीचें कार्य करण्याची पध्दति आस्ट्रियांत अगदीं पूर्णतेला गेली व याबद्दल त्या देशाची त्या वेळी प्रसिध्दि झाली होती. पूर्वीचे काम करण्याचे नियम नवीन पार्लमेंटांत उपयोगी पडेतात. म्हणून १९०९ मध्यें नवीन नियम केले पण त्यानेंहि काम भागेना, म्हणून १९१७ मध्यें आणखी कडक असे नियम केले. या नियमानुसार सरकारी काम अगोदर घेण्याची व्यवस्था झाली. पार्लमेंटांत प्रथम जर्मन भाषा बोलण्याचा प्रघात असे. परंतु पुढें स्लाव्ह भाषेंतहि पुष्कळ डेप्युटी बोलूं लागले व १९१७ मध्यें कोणत्याहि भाषेंत भाषण असले तरी तें अंशतः उतरून घ्यावें असा ठराव पार्लमेंटांत पास झाला. बोहेमियांत स्थानिक पार्लमेंटांत जर्मन लोकांच्या अडवणुकीमुळें कामच बंद पडलें. त्यामुळें १९१३ सालीं एक कमिशन नेमलें. त्यांत जर्मन व चेक या दोन्ही राष्ट्रांतील प्रतिनिधी नेमले. चेक लोकांच्या मतें हें कमिशन बेकायदेशीर होतें. परंतु कोर्टांनीं हें कमिशन कायदेशीर ठरविलें व तें प्रजासत्ताक राज्य होईपर्यंत तसेंच चाललें. स्थानिक पार्लमेंटें असल्यामुळें सर्व साम्राज्यास सामान्य अशा हक्कांचा व हितसंबंधाचाच मुख्य पार्लमेंटास विचार करावा लागे. शिवाय प्रत्येक स्थानिक पार्लमेंट आपापल्या प्रश्नांचा विचार करी. याशिवाय प्रत्येक शहरांत व तालुक्यांत पूर्ण स्थानिक स्वराज्य असे. मुख्य साम्राज्यसरकारचे ७ मंत्री असत. या मंत्र्यांचा व स्थानिक पार्लमेंटांतील मंत्र्यांचा प्रांत कोणता व कार्यक्षेत्र कोणतें याचा घोंटाळा होऊन पुष्कळ वेळां कलह उत्पन्न होत. इंग्लंडांतील अनेक अधिकाऱ्यांच्या क्षेत्राचें जसें गौडबंगाल आहे तसेंच आस्ट्रियांत होतें. १९११ मध्यें बीनार्थ या प्रधानमंत्र्यानें राज्यकारभारांत सुधारणा करण्यासाठीं एक कमिशन नेमलें, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. शिक्षणांत सक्तीचें प्राथमिक शिक्षण हा मूळाधार असून मुलाची जी मातृभाषा असेल तींत शिक्षण देण्याचा नियम असे. सरकारी शाळांशिवय खाजगी शाळा असत व खाजगी शाळांत १/१३ मुलें शिकत असत. शाळा बांधण्याचें काम प्रत्येक तालुक्याचें किंवा शहराचें असे व साम्रज्यसरकार फक्त इन्स्पेक्टर नेमीत असे. १९१३ सालीं २४७१३ शाळा होत्या. आस्ट्रियापेक्षां हंगेरींत शिक्षणाकडे ७ पट खर्च करीत असत. या शिक्षणामुळें अशिक्षित वर्ग अगदीं कमी झाला. १८९० त शेंकडा २८ अशिक्षित होते ते १९१० त शेकडा १६ अशिक्षित राहिले. प्रथम फक्त जर्मन, चेक व पोल राष्ट्रीयांकरितांच विश्वविद्यालयें होतीं परंतु पुढें इतर राष्ट्रांच्या लोकांची मागणी सुरू झाली. परंतु महायुध्दामुळें या मागणी प्रमाणें करण्याचें राहून गेलें.

इतिहास - १९०७ पासून प्रजासत्ताक राज्य होईपर्यंत एकंदर ९ मंत्रिमंडळें झालीं. या सर्वांत सरकारी अधिकारी होते. इंग्लंडांतील कॅबिनेट पध्दतीप्रमाणें बहुमताच्या पक्षाचें यांत प्राधान्य नव्हतें. त्यामुळें बहुमत मिळावयास सरकारी मंत्रिमंडळास खटपट करावी लागे. आपल्या मंत्रिमंडळांत चेक, पोल व जर्मन या राष्ट्रांचा कोणीतरी प्रतिनिधी घेण्याची मुख्य मंत्री व्यवस्था करी. परंतु बहुतेक मंत्री निःपक्षपातीं राहण्याचा प्रयत्न करीत.

बेकचें मंडळ (१९०६-१९०८) - १९०७ च्या पार्लमेंटांत सर्व राष्ट्रांचे हक्क संभाळण्याचें व यांच्या सरहद्दी कायम ठेवण्याचें बादशहानें आश्वासन दिलें, व इतर सर्व महत्त्वाच्या आधुनिक सुधारणा अमलांत आणण्याविषयीं वचन दिलें. त्याचप्रमाणें पार्लमेंटांत वापरणाऱ्या भाषेसंबंधानें बेकनें एकमत घडवून आणलें. परंतु यानंतर काहीं अनिष्ट प्रकार घडल्यामुळें बेकला राजीनामा द्यावा लागला.

बीनार्थ मंडळ (१९०८-१९११) - या मंडळांत सर्व सरकारी अधिकारी होते. बीनार्थचा उद्देश सर्व राष्ट्रांचा स्नेह संपादन करण्याचा होता. जर्मन लोकांची अशी तक्रार होती कीं बोहेमियांत जर्मन लोकांची संख्या १/३ असून त्यांना सरकारी नोकरींत शेंकडा दहासुध्द जागा मिळत नाहींत म्हणून मंत्रिमंडळाशीं जर्मन लोकांनीं सहकारिता करण्यापूर्वी हा प्रश्न जर्मन लोकांच्या इच्छेप्रमाणें सुटला पाहिजे अशी त्यांनीं भर घातली. शिवाय प्राग येथें जें पार्लमेंट होतें त्यांत जर्मन व चेक हे निराळे असावे अशी त्याची इच्छा होती. या मागण्यामुळें चेक लोकांस अतिशय राग आला व त्यांनीं जर्मन लोकांवर अत्याचार सुरू केले. यानंतर तालुक्याची व जिल्ह्यांची राष्ट्राप्रमाणें रचना करून जर्मन जिल्हे व चेक जिल्हे अलग करण्याकरितां मुख्य पार्लमेंटांत बिल आणलें, परंतु त्यास चेक लोकानीं विरोध केल्यानंतर पार्लमेंट बरखास्त झालें. इटालियन विद्यार्थ्यांनीं आपलें स्वतंत्र विश्वविद्यालय स्थापण्याकरितां व्हिएन्ना येथें दंगे केले परंतु त्याचा उपयोग झाला नाहीं. व्हिएन्नांत जर्मन भाषेशिवाय इतर भाषा असाव्या व जर्मन जिल्ह्यांत सुध्दा आपल्या भाषेचा प्रवेश व्हावा अशी चेक लोकांची इच्छा होती. परंतु लोकांनीं याविरुध्द कायदे पास केलें व बाहेमियाच्या बाहेर चेक लोकांची प्रतिष्ठा चालूं न देण्याचा निश्चय जाहीर केला. इतर कांही कारणांनीं पोल लोकांचीहि मदत बीनार्थ यास न मिळाल्यामुळें त्यानें राजीनामा दिला. एकंदर या मंडळाच्या कारकीर्दीत कोणताहि प्रश्न उत्तम रीतीनें न सुटतां सारखी धुमश्चकी चालू राहिली.

गौश मंडळ.(जून १९११ ते आक्टो. १९११) - चेक व जर्मन लोकांमध्यें समेट करण्याचा या मंत्रि-मंडळानें प्रयत्न केला, परंतु चेक लोकांनीं व्हिएन्नांत एक शाळा नियमांविरुध्द उघडली व ती म्युनिसिपल अधिकाऱ्यांनीं बंद केल्यावर एक चेक बायकांचें निषेधप्रदशेक मंडळ त्यांनीं पार्लमेंटांत नेलें. यामुळें व्हिएन्नांतील लोकमत क्षुब्ध होऊन चेक लोकांस मार देण्यापर्यंत प्रसंग आला. यावर कडक अंमल बजावून मंत्रिमंडळानें हे दंगे मोडून गुन्हेगारांस शासन केलें. चेक लोकांनी आपल्या राष्ट्राचे दोन मंत्री नेमण्याविषयींव इतर अनेक अधिकारी व कौन्सिलर चेक असावे अशाविषयी आग्रह धरल्यामुळें गौशनें राजीनामा दिला.

स्टूर्ग मंडळ (१९११-१९१६) - यानें सर्व राष्ट्रांचे मंत्री आपल्या मंडळांत सामील केले. चेक व जर्मन लोकांतील कलह काढून टाकवे व कालव्यावर पुष्कळ खर्च करून पोल लोकांनां राजी ठेवावें असा त्याचा उद्देश होता. कॅथॉलिक विवाह मरणाशिवाय रद्द होऊं शकत नाहीं, असा कायदा असल्यानें लक्षावधि घटस्फोट केलेल्या बायकांस पुन्हां विवाह करितां येईना. ही आपत्ति दूर करण्याकरितां कायदा बंदलण्याविषयीं लोकांनीं जोराची चळवळ केली, परंतु कायदा न बदलता मंत्रिमंडळानें फक्त कांहीं व्यक्तीनां सवलती दिल्या. याच मंडळाच्या अमदानींत महायुध्द सुरू झालें. त्यावेळेस सर्व राष्ट्रांची सरकारविषयीं चांगली भावना होती, कारण आपलें साम्राज्य फोडण्याचा बाहेरून प्रयत्न चालला आहे हें पाहून सर्व ऑस्ट्रियांतील लोकांस ते रक्षण करण्याविषयीं अभिमान उत्पन्न झाला. सैन्य जमा करण्यांत व नांवें नोदविण्यांत कोणीहि अडथळा केला नाहीं. विशेषतः प्रागमध्यें चेक लोकांनीं जर्मन लोकांविषयीं विलक्षण सहानुभूति दाखविली व जर्मन कैसरचा जयजयकार केला. त्याचप्रमाणें पोल लोकांनींहि साम्राज्याविषयीं राजनिष्ठा व्यक्त केली व सरकारास मदत करण्याचें वचन दिलें. तसेंच रूथिनियन व रूमॅनियन लोकांनीहि साम्राज्यविषयीं अभिमान व्यक्त केला. मधून मधून कांहीं इटालियन व स्लाव्ह व्यक्तिश: शत्रूकडील आपल्या बांधवांशीं खलबतें करीत. परंतु हीं उदाहरणें अपवादक होती. या वेळेस पार्लमेंटची संमति घेण्याचा स्टूर्गनें प्रयत्न केला नाहीं. त्यामुळें सर्व अधिकार सैन्यांतील लोकांच्या हाती गेले, त्यांनां जे जे लोक संशय घेण्यासारखे वाटले त्यांनां त्यांनीं कैद केलें व अशा रीतीनें अदांधुदी सुरू झाली. या सगळया अवघीत मुख्य मंत्र्याचें दुर्बलत्व स्पष्टपणें सर्वांस कळून आलें १९१६ त पुन्हां राईशराठ भरविण्याविषयी स्टूर्गनें खटपट चालविली होती; इतक्यांत डॉ. अॅडलर या सोशिएलिस्टानें स्टूर्ग यास गोळी घालून ठार मारिलें.

कोर्बर मंत्रिमंडळः - (१९१६ आक्टोबर पासून डिसेंबर) स्टूर्गच्या मरणानेंहि पार्लमेंट भरविण्याचा उद्देश सफल झाला नाहीं व कोर्बर यानें दोन महिनें पार्लमेंट शिवायच कारभार चालविला. याच सुमारास फ्रान्सिस जोसेफ बादशहा मरण पावला. त्याच्या मुलास म्हणजे पहिला चार्लस या बादशहास कोर्बनें राज्यघटना पाळण्याची शपथ घेण्यास लाविलें. त्यामुळें त्याचा कोर्बर यावर रोष झाला. १९१६ च्या डिसेंबर महिन्यांत चार्लस बादशहानें कोर्बर यांस काढून टाकिलें.

क्लँम - मार्टिनीझ मंडळ - (१९१६ – १९१७) या मुख्य मंत्र्यानें मिश्रमंडळ बनविलें. प्रेसिडेंट वुईल्सन याच्याकडून स्वयंनिर्यायासंबंधानें जो खलिता आला त्याला क्रोशियन प्रतिनिधीनीं असे उत्तर दिलें कीं, हॅप्सबर्गच्या घराण्याखालींच क्रोट लोकांची उन्नति होत असल्यामुळें त्यांनां स्वतंत्र होण्याची इच्छा नाहीं. चेक रुमॅनियन लोकांनीहि आपणांस स्वयंनिर्णय नको असें जाहीर केलें. जर्मन लोकांनीं राज्यघटना पुन्हां बदलण्याविषयीं मागणी केली व स्लाव्ह लोकांनीं कोणतीहि अट न घालतां पार्लमेंट बोलाविण्याविषयीं आग्रह धरला. नंतर मे ३१ ला पार्लमेंट भरलें, परंतु स्लाव्ह - चेक व जर्मन यांच्यांत कलह होऊन कांहीच करतां येईना. असें झाल्यानें निराश होऊन क्लॅम - मार्टिनीसनें राजीनामा दिला.

सीडलर मंडळ  - (१९१७-१९१८) सीडलरनें राज्यघटनेचा प्रश्न बाजूस ठेवून राज्यकारभार चालू ठेवण्यापुरते मंडळ नेमलें; परंतु १९१७ च्या आगष्टमध्यें हा प्रश्न हातीं घेणें त्यास भाग पडलें. परंतु काहींच निश्चित न होतां पार्लमेंट मे महिन्यांत (१९१८) तहकूब करावें लागलें. मध्यंतरी निरनिराळी राष्ट्रें आपापले हक्क इतरांचा विचार न करतां पुढें करूं लागलीं. चेक लोकांनीं जून ५ ला आपलें स्वतंत्र राज्य करण्याकरितां एक कमेटी नेमली. म्हणून सीडलरला राजीनामा देणें भाग पडले.

हुसारेक मंडळः - (जुलई  १९१८ पासून आक्टोबर १९१८). इंग्लंडनें जेव्हा चेको-स्लोव्हेकिया स्वतंत्र आहे असें सरकारी रीतीनें कबूल केलें तेव्हा हुसारेकनें असें जाहीर केले कीं, आस्ट्रियन साम्राज्य अद्यापि संयुक्त आहे व त्याचा नाश करणें हें अनिष्ट आहे असें त्यानें यूरोपातील राष्ट्रांस बजाविलें. आक्टोबर महिन्यांत हुसारेकनें चेक, पोल व स्लॉव्ह या लोकास पूर्ण स्थानिक स्वातंत्र्य देण्याचें कबूल केलें, परंतु ही राष्ट्रें आता अगदीं अलग होण्याविषयीं प्रयत्न करूं लागली. यानंतर बादशहानें लॅमास्क यास मंत्रिमंडळ बनविण्यास सांगितलें.

लॅमास्क मंडळ (ऑक्टोबर २७ ते  आक्टोबर ३१) - हा अखेरचा प्रयत्न होता. बादशहास असें वाटलें कीं सर्व इतर राष्ट्रांशीं स्नेह होणें शक्य असल्यास पहावें; नाहीं तर फक्त जर्मन आस्ट्रियाचें राज्य निराळें करून आपण त्यावर राज्य करावें ही गोष्ट शेवटीं साध्य झाली नाहीं. कारण लोकांनीं प्रजासत्ताक राज्य स्थापण्याचें ठरविलें. परंतु लॅमास्क याच्या प्रयत्नामुळें रक्तपात न होता हें कार्य घडून आलें, याबद्दल त्याची स्तुति केली पाहिजे.

आर्थिक परिस्थितिः -युध्दाच्या पूर्वी एकंदर राजकीय स्थिति समाधानकारक नसल्यामुळें आस्ट्रियानें सैन्यावर जास्त खर्च करण्यास सुरवात केली. त्यामुळें कर्ज काढावें लागलें, इतर देशांत पैशाची टंचाई असल्यामुळें लोकांच्या बँकेतील रकमांवर फार ताण पडला. १९०७ पासून १९१३ पर्यंत व्यापराची अशी स्थिति होतीं कीं, निर्यात मालापेक्षां आयात माल जास्त होता. निम्म्या लोकांचा शेतकीवर निर्वाह असे. गहूं, सातु, मका, साखर यांचे उत्पादन फार मोठया प्रमाणावर असे. कोळसा व लोखंड हीं अति विपुल होती. १९१० पासून १९१४ पर्यंत महागाई वाढत गेली. १९१४ त युद्ध् सुरू झाल्यावर थोडक्याच दिवसांत व्यापर अगदीच शिथिल झाला. पूर्वी उत्त्पन्न झालेला माल खपेनासा झाला, व निर्यात व्यापार फार कमी झाल्यामुळें पुष्कळ लोक बेकार झाले. सरकारनें लोकांस काम देण्याची विशेष फिकीर केली नाही. कांहीं वेळानें लढाईची सामुग्री उत्पन्न करण्याकरितां मजुराची जरूर लागली. त्यावेळेस पुष्कळ मजुरांस पुन्हां काम मिळालें, परंतु याच सुमारास इंग्लंड व फ्रान्स यांनी आस्ट्रियांत कोणताही माल येऊं न देण्याची व्यवस्था केल्यामुळें लढाईच्या सामुग्रीस लागणारा कच्चा मालहि मिळेनासा झाला. आस्ट्रियाची स्थिति जर्मनीमपेक्षांहि वाईट झाली, कारण पूर्वीपासून आस्ट्रियांत जर्मनीपेक्षा कच्चा माल कमी होता. त्याचप्रमाणें आस्ट्रिया व हंगेरी यांमधील कलहामुळें जकात ठेवण्याच्या बाबतींत दोघांचें एकमत होत नसे. हंगेरींत अन्नाचा पुरवठा जास्त असल्यामुळें हंगेरीवर आस्ट्रिया अवलंबून असे. आस्ट्रियांत येणारा बहुतेक माल जर्मन बंदरातून येत असे, त्यामुळें तो व्यवस्थित येण्याकरितां जर्मनसरकारशीं आस्ट्रियास तह करावा लागला. माल विकत घेण्याकरितां जर्मनीनें व आस्ट्रियानें बोर्डें नेमलीं व त्याच्या द्वारें तटस्थ देशांत माल विकत घेऊन आणण्याची व्यवस्था केली, परंतु १९१५ त ही व्यवस्था बंद करावी लागली. पुढें याच बोर्डांना कोणास किती माल द्यावा याचें नियंत्रण करण्याचें काम दिलें. या कामाची देखरेख सरकारनें आपल्याकडे ठेवली. अन्नाच्या नियंत्रणाकरितां इंग्लंडातील 'फूड कंट्रोलर' च्या धर्तीवर आणखी एक निराळें कमिशन नेमलें. हें कमिशन किंमती ठरवीत असें व अमुक पध्दतीची रोटी असावी व अमुक कुटुंबास अमुक रोटया द्याव्या, इत्यादि गोष्टीवर त्याचा पूर्ण ताबा असे. जमीनीची लागवड करण्यासंबंधानेंहि सक्ती करण्यांत आली व ठराविक किंमतीपेक्षां धान्याची जास्त किंमत घ्यावयाची नाहीं असा निर्बंध करण्यांत आला. इतकें करूनहि कांही वस्तूंचा पुरवठा कमी पडला तो पडलाच. महायुध्दाचे शेवटी आस्ट्रियांत कांहीं महत्त्वाच्या वस्तूंचा पूर्ण अभाव होता. या सर्व कारणामुळें सामान्य जनतेंत व मजुरांमध्यें युध्दाच्या विरुध्द भावना उत्पन्न झाल्या व त्यांच्या चळवळी थांबवितां थांबविता सरकारास पुरेसें झालें. महायुध्दांत आस्ट्रो-हंगेरियन बँकने नोटांचे पैसे देण्याचे बंद केलें व सोन्याचा सर्व सांठा महत्त्वाच्या कामाकरितां राखून ठेविला. महायुध्दाचे पूर्वी नुकताच आस्ट्रियामध्यें पैशाचा तोटा पडून बँकांची स्थिति अगदीं संकटाची होती. नोटाची संख्या अमर्याद वाढली. १९१४ मध्यें ५१३ कोटि क्रोननच्या नोटा होत्या त्या १९१८ मध्यें ३५५८ कोटि क्रोनन झाल्या. त्यामुळें किंमती वाढून क्रोननची हुंडणावळींत किंमतहि कमी झाली. एक अमेरिकन डॉलर १९१४ मध्यें ५ क्रोनन बरोबर होता तो १९१८ त १६ क्रोनबरोबर झाला. सरकारी जमा व खर्च दोन्हीहि फुगत चाललीं. युध्दाकरितां सरकारनें आस्ट्रो-हंगेरियन बँकेकडून १९१९ पर्यंत २५०८ कोटि क्रोनन कर्ज काढलें याशिवाय इतर मागांनीं बँकेने सरकारला उसन्या रकमा दिल्याच होत्या. याशिवाय ट्रेझरी बिलांच्या रूपानें सरकारनें लोकांपासून २६० कोटि क्रोनन इतकें कर्ज काढलें, व वॉरलोनच्या रूपानें सरकारनें ३५०६ कोटि क्रोनन कर्ज काढले. १९१६ मध्यें नवीन कर बसविण्यांत आले.

क ला व वा ङ्म य:- फ्रॅन्सिस जोसेफ बादशहाच्या वेळचे सर्व उत्तम कलाभिज्ञ १८९० च्या पूर्वीच मरण पावले. आस्ट्रियन साम्राज्याविषयीं अभिमान हें त्यांच्या कलेचें हृदम होतें. ही परंपरा १८९० मध्यें परमावधीस जाऊन त्यानंतर अवनत होऊं लागली. या कलाभिज्ञांपैकीं कांहीं आस्ट्रियन साम्राज्यांत राहिले व कांहीं इतर देशांत गेले. व्हिएन्नांतील या लोकांचा अग्रणी गस्टव्ह क्लिट हा असून, तो चित्रकार होता. जोसेफ हॉफमन हा उत्तम शिल्पकार होता. महायुध्दानंतरच्या कारागिरांतील प्रमुख ओस्कर कोकोस्का हा होता.

१९१६ मध्यें मारी ईशनबाश ही प्रसिध्द ग्रंथकत्रीं मरण पावली. १९१८ मध्यें पीटर रोसीजर हा मरण पावला. हे जुन्या परंपरेचे भोक्ते होते. याच्या मरणानंतर अगदीं आधुनिक प्रवृतीच्या वाङ्मयाचे लेखक पुढें आले. या पिढीवर इबसन झोला, मॅटरलिंक, डोस्टएफ्स्की, टॉलस्टॉय, शॉ व स्टाइंडबर्ग याचें फार वजन पडलें होतें. यापैकीं प्रमुख ग्रंथकार व नाटककार कार्ल शॉनहर हा होता. याच्याच तोडीचा नाटककार श्नीटझर हा होता, परंतु याची विचाराची दिशा भिन्न होती. वीणाकाव्यें लिहिण्यांत डेद्दमेल व रिल्क हे अग्रणी होते. फ्रान्झ वर्फेल हा आधुनिक कवीमध्यें अतिशय बुध्दिवान होता. कादंबरीकारात गूटनब्रून, गूंथर; मॅझेटी, बॅरनेस हँडेल, बॉसरमन, कोल्बनहीयर हे प्रमुख होते. महायुध्दाच्या समाप्तीपर्यंत व्हिएन्नातील मुख्य नाटकगृहाची पॅरिसमधील कॉमेदी या नाटकगृहाची बरोबरी करण्याची महत्त्वाकांक्षा होती व ती बऱ्याच अर्थानें सफल झाली होती. बोमिस्टर, केंझ व जिराडीं हे आस्ट्रियांतील प्रमुख नट होते.

इ ति हा स वा ङ्म य. - १९१० पासून १९२० पर्यंत थिओडर व्हॉन सिकल याच्या नेतृत्वाखालीं अनेक इतिहास कारांनीं आपले शोध जगापुढें आणले. यांपैकीं फिकर, मूलबाशर, ऑल्टनथॉल, हार्टमन रेडलिश हे प्रमुख होते. फूर्नियर यानें लिहिलेलें नेपोलियनचें चरित्र सर्व देशांत प्रसिध्द झालें. नवीन परंपरेपैकीं प्रसिध्द इतिहासकार यूबर, बर्गर, बौअर हे होते. ईबनगऱ्यूथ व अॅडलर यांनी शासनसंस्थेच्या इतिहासांत अतिशय परिश्रम केले. ग्रूनबर्ग यानें 'अर्थशास्त्राचा इतिहास' या क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलें. जोसेफ रीडलीश यानें आस्ट्रियन साम्राज्याच्या राजकीय धोरणाचा १८४८-१८६१ पर्यंतचा इतिहास लिहिला आहे तो फारच अप्रतिम आहे.

प र रा ष्ट्री य रा ज की य धो र णः - (१९०८-१९१८) जर्मन साम्राज्य व संयुक्त इटलीचें राज्य स्थापन झाल्यापासून आस्ट्रियन साम्राज्यास पश्चिमेकडे जर्मन प्रदेश जिंकणें अशक्य झालें व पूर्वेकडे साम्राज्य वाढविल्यास रशियाचा विरोध अगदी हटकून होणार या कारणानें जर्मनी व इंग्लंड यांच्याशीं स्नेह ठेवणें आस्ट्रियास भाग पडलें. रूसोजपानी युध्दानंतर रशियाने पूर्वेकडील आपली महत्वाकांक्षा सोडून देऊन पुन्हा कॉस्टांटिनोपल व दार्दानेल्सकडे आपला मोर्चा वळवळा. मध्यंतरी इंग्लंड, फ्रान्स यांचा व जर्मनीचा अनेक बाबतींत मतभेद झाल्यामुळें इग्लंड फ्रान्स, व रशिया यांनीं १९०८ मध्यें आपसांत स्नेह केला. तुर्कस्तानांत क्रांति झाल्यानंतर बोसनिया व हर्जगोव्हिना, हीं दोन आपल्या राज्यांत सामील करण्याचा आस्ट्रियानें निश्चय केला. परंतु दार्दानेल्स रशियानें आपल्या ताब्यांत घेतल्यास त्यास आस्ट्रियानें प्रतिबंध करूं नये असें रशियाचें धोरण दिसलें. हें धोरण आस्ट्रियानें कबूल केलें परंतु दार्दानेल्स घेतल्यास कॉन्स्टांटिनोपल रशियानें घेऊं नये असें आस्टियाचें म्हणणें होतें.

सेप्टेंबरमध्यें हें म्हणणें रशियानें कबूल केलें. त्यानंतर लगेच आस्ट्रियानें बोसनिया व हर्झगोव्हीना हीं गिळंकृत केलीं.  हें वर्तमान कळतांच इंग्लंड व फ्रान्समध्यें खळबळ उडाली व सर्व राष्ट्रांच्या संमतीशिवाय असें करतां येणार नाहीं असें इंग्लंडनें जाहीर केलें. सर्व्हियानेंहि याविरुध्द तक्रार करून लढाईची तयारी केली. तुर्कस्तान, इटली व बल्गोरिया हे सर्व आस्ट्रियाच्या विरुध्द उठलें. परंतु आस्ट्रिया हे देश न सोडण्याचा निश्चय जाहीर केला. रशियानें आपली युध्द करण्याची तयारी नाहीं असें पाहून माघार घेतली व तुर्कस्ताननें काहीं रक्कम घेऊन आस्ट्रियाच्या कृत्यास संमति दिली व हें करण्यास इंग्लंडनें सल्ला दिला. सरतें शेवटीं मार्च महिन्यांत इंग्लंड व रशिया या दोहोंनीं सरकारी रीतीनें आस्ट्रियास संमतीदर्शक खलिते पाठविले. परंतु सर्व्हिया संमति देण्यास कबूल होईना. अखेरीस रशियाच्या मध्यस्थीनें सर्व्हियानें आपली संमति दिली व आस्ट्रियाशीं मित्रत्वानें रहाण्याचें कबूल केलें. परंतु यामुळें रशिया व आस्ट्रिया यांमध्यें नेहमीचा विरोध स्थापित झाला. याच सुमारास बल्गेरिया व इटली हे रशियास अनुकूल झाले. आस्ट्रियानें इटलीशीं विरोध न करितां त्यास ट्रिपोलीमध्यें वाटेल तें करण्यास परवानगी दिली. परंतु याचा मोबदला म्हणून इटलीनें आस्ट्रियाच्या बाल्कनमधील धोरणाच्या आड येऊं नयें असा करार झाला. १९१२ मार्चमध्यें सर्व्हिया व बल्गेरिया यांनी 'बाल्कन लीग' स्थापित करून आस्ट्रियाच्या बाल्कनमधील धोरणास विरोध करण्याचा निश्चय केला व या लीगमध्यें ग्रीस सामील झाला.  या लीगशीं सामना करण्याकरितां तुर्कस्ताननें इटलीशीं लॉसेनचा तह करून आपले हात मोकळे केले. ऑक्टोबर महिन्यांत बाल्कन युध्द सुरू झालें. या युध्दांत सर्व्हिया, ग्रीस, व बल्गेरिया यांचा जय झाल्यामुळें आस्ट्रियाचें महत्त्व कमी झालें. परंतु रशियाशीं शत्रुत्व होऊं नये म्हणून आस्ट्रियानें तटस्थपणा स्वीकारला. अल्बेनिया व सर्व्हिया यांची प्रगति होण्यापासून इटलीचें नुकसान होतें. यास्तव इटली बाल्कन लीगच्या विरुध्द होता. याचा फायदा घेऊन आस्ट्रियानें इटलीश वश करून पुन्हां बारा वर्षेंपर्यंत जर्मनी, आस्ट्रिया व इटली यांचा स्नेहसंबंधाचा करारनामा पुनरुज्जीवित केला. याचा परिणाम असा झाला कीं, सर्व्हिया व रशिया हे आस्ट्रियाच्या विरुध्द अधिकच कारवाई करूं लागले. एका वेळी तर युध्दाचाच प्रसंग आला होता. परंतु इग्लंड व जर्मनी यांच्या सल्यानें आस्ट्रियानें सामाचा मार्ग स्वीकारला. आस्ट्रियानें लंडन येथें एक परिषद भरवून तेथें बाल्कन प्रश्नाचा खल करण्याचें कबूल केलें. या परिषदेचा कांहीं उपयोग न होता दुसरें बाल्कन युध्द १९१३ फेब्रुवारी ३ ला सुरू झालें. या युध्दंत माँटिनीग्रोनें स्कुटारी घेतल्यामुळें इंग्लंड व आस्ट्रिया यांनीं लढाई करून तें परत घेण्याचा निश्चय जाहीर केला. त्या बरोबर माँटिनीग्रोनें स्कुटारींतून सैन्य काढून घेतलें. रुमानियांत आस्ट्रियाचा जो आब होता तो या बाल्कन युध्दानें कमी झाला. आस्ट्रियाच्या आग्रहास्तव रुमानिया बाल्कन युध्दांत सामील झाला नव्हता. परंतु त्याला पाहिजे असलेला प्रदेश देणें हे आस्ट्रियास आता प्राप्त झालें. परंतु आस्ट्रियाचें म्हणणें बल्गेरिया कबूल करीना. त्यामुळें रुमानियानें रशियाकडे धांव घेतली. यानंतर तिसरें बाल्कन युध्द होऊन बल्गेरियाचा पुष्कळ प्रदेश रुमानिया व सर्व्हिया यानीं घेतला. या युध्दांत आस्ट्रियानें मदत न  केल्याबद्दल बल्गेरियाचें मन पूर्ण  कलुषित झालें. शिवाय सर्व्हिया व माँटोनिग्रो यांची सत्ता वाढल्यामुळें ते आस्ट्रियाविषयीं बेफिकीर राहूं लागले. १९१३ जुलईमध्यें लंडनच्या परिषदेनें बल्गेरियाची दक्षिण सरहद्द ठरविली व त्याप्रमाणें सर्व्हियास तो प्रदेश सोडून देण्यास भाग पाडलें. तरीहि सर्व्हियानें आस्ट्रियांतील स्लाव्ह लोकांशीं खलबतें करून त्यांनां आपणांत सामील करून घेण्याचा प्रयत्न सोडला नाहीं. रुमानियानेंहि हंगेरींतील आपल्या लोकांस आस्ट्रियन साम्राज्यविरुध्द बंड करण्यास प्रोत्साहन दिलें. व रशियाशीं स्नेहभाव वाढविला. असें झाल्यानें आस्ट्रियास रुमानियाविषयीं संशय वाटूं लागला. आस्ट्रियानें आतां बाल्कन संस्थानांत फूट पाडण्यास सरुवात केली. या सुमारास आस्ट्रिया व जर्मनी यामध्यें बाल्कन देशांपैकीं आपणास कोण अनुकूल आहेत या मुद्दयासंबंधानें तीव्र मतभेद झाला. यामध्यें अखेरीस बल्गेरियास वश करून बाकी इतर देशांस त्याच्या इच्छेप्रमाणें करूं द्यावें असें ठरलें. या सुमारास इटली व आस्ट्रिया यांमध्यें बेबनाव झाला. इंग्लंड, फ्रान्स, रशिया व इटली यांचा बेत बाल्कन देशांचें जाळें आस्ट्रियाभोवतीं करण्याचा आहें असें आस्ट्रियास दिसून आलें. यानंतर कडक उपाय अमलांत आणण्याचा आस्ट्रियानें निश्चय केला व त्याप्रमाणें जर्मन चॅन्सेलर यास त्यांनीं कळविलें. इतक्यांत आस्ट्रियांतील राजपुत्रास सर्व्हियांत मारल्याची बातमी आली. यावर आस्ट्रियानें सर्व्हियास निर्वाणीचा खलिता पाठवून असें कळविले की, सर्व्हियन सरकारनें सर्व्हियांतील आस्ट्रियाविरुध्द चळवळीस मदत केल्यामुळें असा अनर्थ घडला. याकरितां सर्व्हियानें सरकारीरीतीनें ही चळवळ मोडून टाकावी व त्यांत सामील असलेल्या लोकांस शिक्षा द्यावी. ' जुलै २४ ला हा खलिता पाठविल्यानंतर दोन दिवसांचे आंत त्याचें उत्तर मागितलें. परंतु गुन्हेगारांची चौकशी केल्यास त्यांत आस्ट्रियाचा कांहीं संबंध असूं नये व हा प्रश्न हेग येथील कोर्टानें सोडविला असतां आमची हरकत नाहीं असें सर्व्हियानें कळविलें. वस्तुतः या उत्तरानें आस्ट्रियाचा मुख्य मुद्दा सर्व्हियानें कबूल केल्यामुळें युध्दाची आवश्यकता नव्हती असें असतां आस्ट्रियानें युध्द पुकारलें. या युध्दांत आस्ट्रियानें कांहीं प्रदेश मिळविल्यास इटलीसहि तितका प्रदेश दिला पाहिजे या अटीवर इटलीनें युध्दांत सामील व्हावें असें आस्ट्रियाचें व जर्मनीचें म्हणणें होतें. परंतु इटलीनें तटस्थ राहण्याचे ठरविलें. रुमानियानें युध्दांत सामील होण्याचें नाकारलें. तुर्कस्ताननें आस्ट्रियाला मदत करण्याचें कबूल केलें परंतु बल्गेरियाचा पुष्कळ प्रदेश मिळून शिवाय तुर्कस्तानचें पूर्ण स्वातंत्र्य कायम राहिलें पाहिजे अशी त्यांत अट होती. बल्गेरियास वश करण्याचा प्रयत्न निष्फळ झाला. बल्गेरियानें अर्धवट उत्तरें देऊन हा प्रश्न लोंबत ठेविला. कारण जर्मनी व आस्ट्रिया यांस सामील झाल्यास आपला फायदा होईल अशी त्याची खात्री होईना. शिवाय इंग्लंड व फ्रान्स यांनीं बल्गेरियाकडे बोलणें सुरू केलें होतें व त्यांत बल्गेरियास अधिक प्रदेश मिळवून देण्याचें त्यांनीं आमिष दाखविलें.

डिसेंबरमध्यें आस्ट्रियानें पुन्हां इटलीशीं बोलणें सुरू केलें व १९१५ च्या मार्चमध्यें आस्ट्रियाचा कांही प्रदेश देण्याचेंहि कबूल केलें. इटलीनें अधिकाधिक प्रदेश मागण्यास सुरवात केली. दक्षिण टायरोल ट्रीस्ट आड्रियाटिक मधील बहुतेक बेटं व व्हॅलोना ही सर्व ताबडतोब इटलीस द्यावी असें इटलीचें म्हणणें होतें. हें आस्ट्रियानें कबूल केलें नाहीं व मध्यंतरी इंग्लंड व फ्रान्स यांनीं इटलीस याहीपेक्षां जास्त कबूल केल्यानें मेच्या २० तारखेस इटलीनें आस्ट्रियाच्या विरुध्द युध्द पुकारलें. रुमानिया हा अद्यापि तटस्थ होता, जुलईनंतर आस्ट्रिया व जर्मनी यांची सरशी होते असें पाहून बल्गेरियानें आस्ट्रियाशीं तह केला. या तहाअन्वयें सर्व्हियांतील 'मॅसिडोनिया' हा प्रदेश बल्गेरियास मिळावा असें ठरलें व तुर्कस्ताननें मारित्सा नदीवर बल्गेरियानें मागितलेला प्रदेश त्याला देण्याचें कबूल केलें. या तहापासून जर्मनीचा तुर्कस्तानपर्यंत मार्ग खुला झाला, व १९१५ चे शेवटीं व सर्व्हिया माँटेनिग्रो हे आस्ट्रियाच्या ताब्यांत आले. पोलंड देशहि जर्मनी व आस्ट्रिया यांच्या ताब्यांत आला. परंतु त्याची व्यवस्था काय करावयाची याविषयी जर्मनी व आस्ट्रिया यांचें एकमत होईना. परंतु युध्दानंतर पोलंड स्वतंत्र करून त्यावर कोणी तरी राजानें पार्लमेंटच्या मदतीनें राज्य करावें असें ठरलें. मध्यंतरी रुमानिया हा इंग्लंड व फ्रान्स यांच्या बाजूस गेला होता. असे करण्यांत आस्ट्रियाचा पुष्कळ प्रदेश आपणांस मिळेल अशी त्याला उमेद होती. १९१५ डिसेंबरमध्यें दोन तृतीयांश रुमानिया आस्ट्रियाच्या ताब्यांत आला. रुमानिया युध्दांत शिरल्यामुळें तुर्कस्तानच्या मनांत पूर्वीच्या तहाच्या अटीविषयीं संशय उत्पन्न झाला. त्यामुळें जर्मनी व आस्ट्रियानें स्वतंत्र तह न करण्याविषयीं पुन्हां करार केले, व परकीय राष्ट्रांचे हक्क संभाळण्याकरितां परकीय कोर्टें, तुर्कस्तानांत होतीं ती काढून टाकण्याचें कबूल केलें. समुद्रावर इंग्लंड व फ्रान्सचें वर्चस्व असल्याकारणानें जर्मनी व आस्ट्रियांत माल येण्याचें बंद होऊन उपासमार होण्याचा प्रसंग आला. त्यामुळें इतके जय मिळूनहि आस्ट्रियास युध्दाचा कंटाळा आला व त्यानें तहाचें बोलणें शत्रुपक्षाशीं सुरू करावें असें जर्मनीस सुचविलें. त्याप्रमाणें वादविवाद होऊन जर्मनीनें असं करण्यास संमति दिली. १९१६ च्या डिसेंबर १२ तारखेस जर्मनीच्या पक्षानें आपल्या अटी जगासमोर मांडल्या. त्यांत आस्ट्रियाचें साम्राज्य पूर्ववत रहावें, रुमानियाची सरहद्द आस्ट्रियास अनुकूल अशी ठरवावी, सर्व्हियाचा कांहीं भाग आस्ट्रियांत याचा व इटलीचा काहीं भाग इटलीनें सोडावा व अल्बेनियावर आस्ट्रियाचें स्वामित्त्व असावें अशा आस्ट्रियाच्या तर्फे मागण्या होता. परंतु तहाचें बोलणें इंग्लंड व फ्रान्स यांस कबूल नव्हतें; व त्यांनीं युध्दांतील नुकसानीची भरपाई मागितल्यानंतर जर्मनीनें युध्द चालू ठेवण्याचा संकल्प केला.

शिवाय सबमराईन बोटीच्या सहाय्याने शुत्रूची जहाजें बुडविण्याची कल्पना जर्मनीच्या मनांत आली . व अशा रीतीनें शत्रूंस जेर करून अखेरीस आपला पूर्ण जय होईल असे जर्मनींस निश्चित वाटलें. याप्रमाणें १९१७ मध्यें खरोखरीच घडून येऊन विजयश्री खरोखरीच जर्मन पक्षास माळ घालणार असें दिसूं लागलें. परंतु या पाणबुडया बोटींचे प्रयोग अमेरिकेंतील संस्थानावर झाल्यामुळें त्यांनी जर्मनीविरुध्द एप्रिलमध्यें व आस्ट्रियाविरुध्द डिसेंबरमध्यें युध्द पुकारलें. या वेळेस आस्ट्रियाचा बादशहा चार्लस यानें अखेरच्या तहाविषयीं प्रयत्न केला व फ्रान्सचा प्रेसिडेंट पांक्वारे याशीं बोलणें सुरू केलें. परंतु आस्ट्रियाचा प्रदेश इटलीस देण्यास आस्ट्रिया तयार नसल्यामुळें विशेष प्रगति होईना. १९१७ मार्चमध्यें जर्मनी व आस्ट्रिया यांनीं आपल्या मागण्यासंबंधानें एक कार्यक्रम (प्रोग्रॅम) तयार केला. यांत जर्मनीनें पोलंड व गॉलीशिया घ्यावीं व अॅलसेस लॉरेन फ्रान्सला द्यावा असें ठरविलें. परंतु इटलीनें लंडनच्या तहाप्रमाणें आपल्यास प्रदेश मिळाल्याविना आपण तह करणार नाही असें जाहीर केल्यामुळें इंग्लंड व फ्रान्स यांनां स्वतंत्र रीतीनें कांहीं करतां येईना. यानंतर १९१७ मे मध्ये जर्मनी व आस्ट्रिया यांनीं एक निराळा कार्यक्रम तयार केला. यांत रुमॅनियावर ऑस्ट्रियाचें वर्चस्व असावें, जर्मनीने पोलंडवर सत्ता चालवावी व अॅलसेस लॉरेन फ्रान्सला देऊं नये असें ठरविले. तथापि इंग्लंड व फ्रान्स तहास कबूल झालें नाहींत. त्यांनीं उलट नेटानें युध्दसामग्री जमविण्याची तयारी चालविली. शिवाय जर्मनी व आस्ट्रिया हीं अगदीं हतबल झालीं आहेत व कदाचित त्या देशांत राज्यक्रांति होईल अशी माहिती संयुक्त राष्ट्रांस लागलेली होती व अमेरिकन लोकांची मदत आपणांस सारखी मिळेल अशी त्यांनां खात्री होती. मध्यंतरी संशियांत राज्यक्रांति होऊन रशियानें डिसेंबरच्या १५ तारखेस युध्दाची तहकुबी करून तहासंबंधीचें बोलणें सुरू केलें. रशियाचें मागणें इतकेंच होतें कीं, कोणाचा प्रदेश कोणी घेऊं नये, लढाईचा खर्च कोणी कोणास देऊं नये, हें इंग्लंड व फ्रान्स यांनी नाकारलें. मध्यंतरी यूक्रेन प्रांतानें स्वतंत्र लोकसत्ताक राज्य स्थापन करून जर्मनपक्षाशीं स्वतंत्र तह केला. या तहान्वयें चोमचा लहान प्रांत, आस्ट्रियास युक्रेनच्या राज्यास द्यावा लागला व पूर्व गॅलिशियास स्वातंत्र्य द्यावें लागलें. नंतर जर्मनी व आस्ट्रिया यांनीं रशियांत शिरून अनेक लढायांत रशियन सैन्याचा पराभव केला. नंतर १९१८ मार्च ३ तारखेस ब्रेस्ट लिटॉक्सचा तह जर्मनी, आस्ट्रिया व दुसऱ्या बाजूस रशिया यामध्यें, होऊन रशिया कायमचा युध्दांतून हटला. या तहाप्रमाणें पोलंड देश स्वतंत्र झाला. परंतु जर्मनी व आस्ट्रिया यांमध्यें पूर्वीचा विरोध कायम होता. पोलंडचा बराचसा भाग जर्मनींत सामील व्हावा असें जर्मनीचें म्हणणें होतें. आस्ट्रियाचें असें म्हणणें होतें की स्थानिक स्वराज्य देऊन पोलंड हा आस्ट्रियन साम्राज्याचा एक भाग राहिला पाहिजे. रशियाने तह केल्यानंतर रुमानियासही तह करणे भाग पडले. य़ा तहाप्रमाणें कारपेथियन सरहद्द आस्ट्रियास अनुकूल अशी मिळाली व कांही आर्थिक सवलती मिळाल्या. यापेक्षां अधिक फायदा झाला नाहीं. हे पूर्वेकडील जय मिळाले तरीही सैन्यांतील लोक अगदीं थकून गेले असल्यामुळें शांतता प्रस्थापित होणें आस्ट्रियाच्या दृष्टीनें फार आवश्यक होते. जर्मन व मँग्यार लोकांशिवाय इतर लोक राजद्रोहाचे विचार व्यक्त करूं लागले. यामुळें प्रेसिडेंट वुइल्सन यांच्या चौदा तत्त्वांचा स्वीकार करण्यास आस्ट्रिया तयार झाला. तथापि तहाचें लक्षण कांही दिसेना. जर्मनीची इच्छा युध्द सुरू ठेवण्याची होती. या कारणाकरितां आस्ट्रियाच्या बादशहानें जर्मनबादशहा व त्याचे सेनापती यांस संतुष्ट ठेवण्याकरितां पुन्हां एक तह केला. आस्ट्रियानें इटलीवर आणखी एक स्वारी केली पण तींत त्याला यश आलें नाहीं. आस्ट्रियांत जर्मन व मग्यार या लोकांशिवाय इतर लोक उघड उघड राज्य उलथून पाडण्याच्या गोष्टी बोलू लागले. या सुमारास जर्मनींतहि लोकांची इच्छा तहाविषयीं अतिशय अनुकूल झाली होती. आस्ट्रियानें पुन्हां प्रेसिडेंट वुइलसनच्या मार्फत आग्रहाचें बोलणें लाविलें परंतु त्यानें चौदा तत्वांचाच पाढा वाचला. मध्यंतरी बल्गेरियन सैन्यानें तहकुबी मागून शस्त्रें खालीं ठेवलीं व तेथील राजा फर्डिनंड यानें राज्य सोडून दिलें. १९१८ आक्टोबरांत तुर्कस्ताननेंहि तहकुबीचा तह मागितला व जर्मनी व आस्ट्रिया यांचा संबंध सोडून दिला.

प्रे. वुइल्सनच्या तत्त्वांच्या आधारे स्लाव्ह झेक व इतर सर्व लोक आस्ट्रियन सरकारजवळ स्वातंत्र्य मागूं लागले. तेव्हां निराश होऊन जर्मनी व आस्ट्रिया या दोघांनीं प्रे. वुइलसन यास तहकुबीविषयीं विनंति केली. तिचें उत्तर येण्यापूर्वीच आस्ट्रियन बादशहानें आपल्या राज्यांतील सर्व राष्ट्रांस स्वतंत्र राज्यें स्थापण्याची संमति दिली. परंतु यांत स्लाव्ह लोकांचा समावेश केला नाहीं. परंतु प्रे. वुइलसन याचें उत्तर आल्यानंतर असें स्पष्ट दिसलें कीं झेका-स्लोव्हाकिया हें स्वतंत्र राष्ट्र मानल्याशिवाय तह होणें शक्य नाहीं. निरनिराळया ठिकाणीं स्वतंत्र पार्लमेंटें भरून आस्ट्रियन साम्राज्याचे तुकडे झाले. व या पार्लमेंटांनीं आपापलें राष्ट्रीय सैन्य परत बोलाविलें. निदान स्वतःस राजा नेमनू हे सर्व देश संयुक्तसंघपध्दतीनें एकत्रराहतील अशी चार्लस बादशहाला उमेद होती. आक्टोबरच्या शेवटीं हंगेरियांत राज्यक्रांति झाली. यामुळें इटलीशीं युध्दतहकुबीचा तह करावा लागला. या तहान्वयें आस्ट्रियाचा बराच प्रदेश इटलीस द्यावा लागला. या तहानें आस्ट्रियाचा पूर्ण नाश झाला. १९१८ नोव्हेंबर ११ तारखेस चार्लस बादशहानें आपलें राज्य सोडून दिलें. त्याच्या दुसऱ्या राष्ट्रीय असेंब्लीनें लोकसत्ताक राज्य जाहीर केलें.

आ स्ट्रि य न लो क स त्ता क रा ज्य - आस्ट्रियन लोकसत्ताक राज्याचें क्षेत्रफळ ३२४९१ चौरस मैल आहे. म्हणजे जवळ जवळ आयर्लंडच्या आकाराचें आहे. लोकवस्ती इंग्लंडच्या एक पंचमांश आहे. १९१८ त ४१०२ प्राथमिक शिक्षणाच्या सरकारी शाळा होत्या. व त्यांत ८ लक्ष विद्यार्थी होते. ३ विश्वविद्यालयें आहेत. शेंकडा ४० मनुष्यें शेतकीवर निर्वाह करतात. मुख्य पिकें राय, ओट, सातू, बटाटे, मका, कडधान्य व ताग हीं आहेत. कापसाचें व लोंकरीचें कापड, तागाचें कापड, रेशमी कापड, रासायनिक द्रव्यें बूट, हातमोजे, कांच यांचे कारखाने महत्त्वाचे आहेत.

साम्राज्यांतील रीशराथचे २१ ऑक्टोबर १९१८ ला जे सभासद होते. त्यांपैकीं जर्मन सभासदांनीं आपलें नवीन पार्लमेंट स्थापलें, त्यांत बहुमतानें लोकसत्ताक पध्दतीची घटना पास झाली. या तात्पुरत्या नॅशनल असेब्लीनें प्रथम सर्व हक्क आपल्या ताब्यांत घेतले व इंग्लंडमधील कॅबिनेटच्यासारखें एक असेंब्लीच्या सभासदांमधून निवडणूक करून कौन्सिल ऑफ स्टेट नेमलें. या कौन्सिलला सर्व अंमलबजावणीचे हक्क दिले. या पार्लमेंटशिवाय स्थानिक प्रांतांनां निराळीं पार्लमेंटे दिलीं व एकंदर राज्यघटना युनायटेडस्टेट्स (अमेरिका) च्या धर्तीवर (फेडरल) बनविली. कौन्सिल ऑफ स्टेटला कोणत्याहि कायद्याला इनकार करण्याचा हक्क दिला. असेंब्लीचे अध्यक्ष तीन असत व हे तीन मुख्य पक्षांनीं निवडलेले असत. हे आळीपाळीनें अध्यक्षाचें काम करीत. कौंसिल ऑफ स्टेट प्रत्यक्ष काम करण्याकरितां एक कॅबिनेट नेमीत असे. या कॅबिनेटमध्यें मंत्र्यांची व्यक्तिश: जबाबदारी असे. प्रांतिक पार्लमेंटें अगदीं स्वतंत्र असत. परंतु या सर्वांच्यावर एक प्रांतिक सरकार असे व ह्यांत सर्व स्थानिक पार्लमेंटांतून निवडलेले सभासद असत. हें प्रांतिक सरकार मुख्य पार्लमेंटला कनिष्ठ असून मुख्य पार्लमेंट त्याला हुकूम करूं शके. या नॅशनल असेंब्लीचें काम एक नवीन राज्यघटना करण्याकरितां दुसरी मुख्य असेंब्ली नेमण्याचें होतें. ही असेंब्ली एकंदर देशांत निवडणुकी होऊन अस्तित्वांत आणण्याकरितां नॅशनल असेंम्ब्बलीनें एक कायदा पास केला. त्या अन्वयें १७० सभासद निवडले गेले व नवीन कान्स्टियूअंट असेंब्ली तयार झाली. १९१९ मार्चला तिचें काम सुरू झालें, तिनें पूर्वीच्या तात्पुरत्या घटनेंत पुष्कळ फरक केले. प्रथम प्रांतिक सरकारावरचा व प्रांतिक पार्लमेंटावरचा ताबा मध्यवर्ती सरकारनें जास्त विस्तृत व कडक केला. कौन्सिल ऑफ स्टेट हें नांव काढून टाकून कॅबिनेटच्या हातांत अंमलबजावणीचें काम दिलें. परराष्ट्रीय राजकारण व तह करणें, परराष्ट्रांत वकील नेमणें इत्यादि अधिकार असेंब्लीच्या अध्यक्षास दिले. सेंट जर्मेनच्या तहामुळें जे आवश्यक फेरबदल करावे लागले ते असेंब्लीनें केले. सगळयांत महत्त्वाचें असेंब्लीचें काम राज्यघटनेस फेडरल तत्त्वावर स्थिर व चिरस्थायी करण्याचें होतें. प्रथम मध्यवर्ती सरकार व स्थानिक सरकारें यांच्या कक्षा निराळया केल्या. कांहीं महत्त्वाच्या गोष्टी फक्त मध्यवर्ती सरकारकडेच ठेवल्या व अगदीं स्थानिक गोष्टी व त्यांविषयी कायदे करण्याचा हक्क स्थानिक पार्लमेंटांनां दिला. मध्यवर्ती सत्तेचे कायदे करण्याचें काम नॅशनल कौन्सिल व फेडरल कौन्सिल हीं दोन्ही करीत. फेडरल कौन्सिलमध्यें प्रांतिक प्रतिनिधी प्रांतांतील लोकसंख्येच्या प्रमाणानें नव्हते. नॅशनल कौन्सिलची रचना पूर्वीच्या नॅशनल असेंब्लीप्रमाणेंच होती. फेडरल कौन्सिलला कायदा नापास करतां येतो परंतु पुन्हां तोच कायदा पास झाल्यास तो तहकूब करतां येत नसे. सरकारचें अंमलबजावणी करण्याचें काम फेडरल गव्हर्नरमेंट कडे मध्यवर्ति असें. हें अगदीं इंग्लंडांतील कॅबिनेटप्रमाणें होतें. पूर्वीच्या तात्पुरत्या राज्यघटनेंत अध्यक्षास जे हक्क होते ते आतां फेडरल अध्यक्षास दिले. हा अध्यक्ष नॅशनल कौन्सिल व फेडरल कौन्सिल यांच्या एकत्र बैठकीमध्यें सर्वांनीं मिळून निवडावयाचा असे प्रांतिक सरकारमध्येंहि मध्यवर्ती सरकारची अंमलबजावणीचीं अधिकाऱ्यांची मंडलें होतीं. तीं प्रांतांत अंमलबजावणी व काहीं बाबतीत प्रांतिक अंमलबजावणीचे अधिकारी मध्यवर्ती सरकारच्या तर्फे अंमलबजावणी करीत. प्रांतिक सरकारचें व त्यांचे अधिकारी यांनीं बेकायदेशीर वर्तन केल्यास एका विशिष्ट कोर्टापुढें त्यांस जबाब द्यावा लागे. या कोर्टाचें नांव 'कॉन्स्टियूशल कोर्ट' असें होतें.

नवीन राज्यापुढें चलनाचा प्रश्नहि महत्त्वाचा होता. पूर्वीच्या आस्ट्रिया-हंगेरियन बँकांच्या ज्या नोटा नवीन राज्यांत प्रचलित होत्या त्यावर पुन्हां एक सरकारी छाप मारून त्या नोटा कायदेशीर केल्या. या शिवाय इतर राज्यांत गेलेल्या व दुसऱ्या कोणत्याहि पूर्वीच्या नोटा बेकायदेशीर आहेत असें ठरविलें. सोनें कमी असल्यानें सर्व खर्च नोटा काढून करण्याचें नवीन सरकारनें ठरविलें. १९२० मध्यें एकंदर नोटा १९१९ च्या तीनपट होत्या. त्यामुळें हुंडणावळीचा भाव खालीं जाऊन क्रोननची किंमत इतर देशांतील नाण्याच्या प्रमाणानें कमी झाली. परराष्ट्रीय हुंडणावळीचा धंदा कांहीं दिवस सरकारनें आपल्या ताब्यांत ठेवला. लढाईच्या नुकसानभरपाईचा ऑस्ट्रियन प्रजासत्ताक राज्यावर मोठा बोजा पडला व तो सर्व परराष्ट्रांस त्यांच्या चलनांत द्यावा लागे. त्यामुळें बजेटमध्यें फार तुट येऊं लागली. ही तूट भरून काढण्याकरितां सरकारानें इतर देशांत पुष्कळ कर्ज काढलें व इतकेंहि करून जी तूट राही ती नोटा काढून भरून काढवी लागली.

इतिहासः - १९१८ ऑक्टोबर मध्यें ऑस्ट्रियन साम्राज्य नामशेष झालें असें कळल्याबरोबर ऑस्ट्रियांतील जर्मन लोकांनीं स्वतंत्र होण्याचा निश्चय केला. त्याचे बरेचसें श्रेय 'स्पेशल डेमोक्रेट' पक्षाच्या सभासदांस दिलें पाहिजे. नवीन राज्यांत ख्रिश्चन सोशिआलिस्ट, जर्मन नॅशनल पक्ष, व स्पेशल डेमोक्रेट या तीन पक्षांनीं राज्यकारभाराची जबाबदारी शिरावर घेतली. पैकीं शेवटचा पक्ष मजुरांशीं संलग्न असल्यामुळें त्याच्या हातांत सर्व सत्ता गेली. स्वयंनिर्यणाच्या तत्त्वाच्या आधारें युगो-स्लॅव्हिया, ईटली, बोहेमिया या राज्यांनीं मूळच्या आस्ट्रियाचा पुष्कळ प्रदेश आपल्या राज्यांत सामील केला. पहिल्या कॉन्स्टिटयूअंड असेंब्लींत १७० पैकीं ७२ जागा स्पेशल डेमोक्रेट पक्षानें काबीज केल्या. त्यामुळें सर्व खात्याचें सेक्रेटरी या पक्षांतील नेमले गेलें. या पक्षाच्या आग्रहामुळें पूर्वीचें राजघराणें असेंब्लीनें काढून उमरावांची संस्था नष्ट करून टाकली. दुष्काळ व अराजकात यामुळें प्रांतांत बळी तो कान पिळी अशा स्थिति होऊं लागली व ती राज्यव्यवस्था सुस्थिीवर आणण्यास बाधक होऊं लागली. ब्यूडापेस्ट व म्युनिक येथें सोव्हिएट पध्दतीचीं राज्यें लोकांनीं स्थापलीं. १९१९ जूनमध्यें व्हिएन्नांत बंडाळी माजली. हींत बहुतेक भाग कम्यूनिस्ट लोकांचा होता. सेंट जर्मनीच्या तहामुळें ३० लक्ष जर्मन लोक आस्ट्रियाच्या नवीन राज्यांतून गळले. जर्मनी व आस्ट्रिया या दोघांचें एक राज्य होऊं नये अशी एक तहाची अट होती. यामुळें आपल्या राज्यकारणाचा अपजय झाला असें पाहून आस्ट्रियाचा वकील बौमेर यानें राजीनामा दिला. १७ ऑक्टोबरला असेंब्लीनें तह पास केला. डिसेंबर महिन्यांत डॉ. रेनरनें पॅरिस येथें तहाच्या कडक अटीसंबंधानें व आस्ट्रियांतील हालअपेष्टांसंबंधानें लिहून तहाच्या कांहीं अटी सौम्य करवून घेतल्या. परंतु सर्व राष्ट्रांची कमिशनें आस्ट्रियन सैन्य मोडून टाकण्याकरितां व्हिएन्नांत बसल्यामुळें आस्ट्रियाचें स्वातंत्र्य अद्याप नांवाचेंच होतें. रेनरनें नंतर जवळच्या राज्यांशीं स्नेह करण्याचा प्रयत्न केला. हंगेरीशीं स्नेह होणें जास्त कठिण झालें. तेथें सोव्हिएट पध्दति चालेनाशीं होऊन घोटाळा झाला होता. युध्दाच्या वेळेपासून हंगेरियाचें शत्रुत्त्व झालें कारण तहांत आस्ट्रियाला हंगेरियाचा पश्चिम भाग मिळाला होता या व इतर कारणांनीं हंगेरीसारखा नवीन आस्ट्रियन राज्याविरुध्द कारवाई करूं लागला.

याच सुमारास ख्रिश्चन सोशिआलिस्ट व सोशल डेमोक्रॅट यांजमध्यें कलह होऊं लागले त्यामुळें रेनर यानें राजीनामा दिला व दुसरी निवडणूक होऊन डॉ. व्हेनिस्क अध्यक्ष झाला. नवीन असेब्लीत ख्रिश्चन सोशिआलिस्टचें बहुमत होतें व सोशल डेमोक्रॅट पक्ष खालीं गेला. यानंतर आस्ट्रियाची स्थिति जास्त वाईट होत गेली. अमेरिकेंत व इंग्लंड आणि फ्रान्स यांमध्यें एकमत न झाल्यामुळें आस्ट्रियास मदत करण्याची त्यांची इच्छा सफल झाली नाहीं. १९२१ मार्चमध्यें असें ठरलें कीं, आस्ट्रियाच्या पुनरुज्जीवनाचें कार्य 'राष्ट्रसंघा' कडे द्यावें. एप्रिलमध्यें टायरोल व इतर प्रांतांनीं जर्मन लोकसत्ताक राज्यांत सामील होण्याचें ठरविलें. ही घातक चळवळ थांबविणें कठिण झाले परंतु मे महिन्यांत सर्व पक्षांनीं सरकारास मदत करण्याचें ठरविलें व राष्ट्रसंघानें आर्थिक उन्नतीचा प्रश्न सोडविण्याचें आपल्या ताब्यांत घेतलें.

आस्ट्रियन साम्राज्य नष्ट झाल्यावर सगळयांत महत्त्वाचा प्रश्न अन्नाचा होता. नवीन राज्यांत उत्पन्न होणारें धान्य खाण्यास पुरेसें नव्हतें. त्याचप्रमाणें कोळसाहि पुरेसा नसल्यामुळें कारखान्यांची स्थिति फार वाईट झाली. प्रथम दोन वर्षे कच्चा मालहि पुरेसा नव्हता.

या सर्व आपत्तीचा प्रतिकार करण्याकरितां आवश्यक असे कायदे नवीन प्रजासत्ताक राज्यानें पास केले. विशेषतः बेकार लोकांनां काम न मिळाल्यास निर्वाहाकरितां आवश्यक अशी आर्थिक मदत देण्याची सरकारनें व्यवस्था केली. शिवाय प्रत्येक कारखानदारास पूर्वीच्या मजुराच्या एक पंचमांश मजूर ठेवण्यास कायद्यानें भाग पडलें. १९२० मे नंतर आर्थिक स्थिति सुधारत चालली व १९२० च्या शेवटीं बेकार लोकांची संख्या १६००० पर्यंत खालीं गेली. सोशल डेमोक्रॅटचें प्राबल्य जोंपर्यंत होते तोपर्यंत त्यांनीं समाजसत्तावादाचा पुरस्कार करून खाजगी कारखाने व धंदे सरकारच्या ताब्यांत देण्याविषयीं अनेक कायदे पास केले. या सर्व कायद्यांचा हलके हलके परिणाम होऊन १९२१ च्या सुरवातीस एकंदर आर्थिक स्थिति लवकरच पूर्ववत होईल अशी उमेद वाटूं लागली. व्हिएन्ना शहर हें थोडक्याच वर्षांत यूरोपांतील व्यापराचें एक मुख्य केंद्र होईल यांत संशय नाहीं.

१९२१ ते १९२३ म धी ल हं गे री ची स्थि ति. - जागतिक युध्दानंतरच्या तहानें बुरोनलंड (पश्चिम हंगेरीचा एक जिल्हा) आस्ट्रियाला देण्यांत आला. ह्या जिल्ह्यावर आस्ट्रिया व हंगेरी दोघेहि हक्क सांगत होते, व तो आस्ट्रियाला मिळाल्यानंतर परत मिळण्याकरितां हंगेरींत प्रयत्न सुरू झाले. १९२१ आगष्टमध्यें कर्नल हेज्जास नांवाच्या धाडसी इसमाच्या नेतृत्वाखालीं हा मुलूख आस्ट्रियाच्या ताब्यांत न जाऊं देण्याकरितां प्रयत्न करण्यांत आला. दोस्त राष्ट्रांचे निकाल अमान्य करण्याचें हें धाडस पाहून दोस्तांच्या मिशनला मोठें आश्चर्य वाटलें. १९२१ सप्टेंबरमध्यें हंगेरीच्या २५०० सैन्यानें आस्ट्रियांत शिरून आस्ट्रियन नॅशनल गार्डचा पराभव केला. या बंडाळीमुळें पदच्युत हॅब्सबर्ग घराण्याला पुन्हां राज्यप्राप्तीचा प्रयत्न करण्यास सवड मिळाली, आणि १९२१ आक्टोबरमध्यें माजी बादशहा कार्ल यानें स्वित्झर्लंडमधील वसतिस्थानाहून निघून विमानामधून बुर्गेनलंडचें मुख्य शहर ओल्डनबर्ग येथें प्रवेश केला. तेथें बादशहाच्या मदतीला एक चांगली फौज सज्ज होती. पण १९२० मध्यें असा कायदा पास झाला होता कीं, हॅब्सबर्ग घराण्यांतील कोणाहि इसमाला आस्ट्रिया किंवा हंगेरीच्या राज्यावर हक्क सांगूं द्यावयाचा नाहीं. कार्ल बादशहा तेथून ब्युडापेस्टला गेला व तेथें कार्लपक्षीयांची हंगेरियन सरकारच्या सैन्याशीं लढाई होऊन त्यांत कार्लला पकडण्यांत आलें. १९२१ नवंबरमध्यें कार्ल व माजी बादशाहीण झिटा यांनां हद्दपार करून मदीरा बेटांत ठेवण्यांत आलें. तेथें कार्ल १९२२ एप्रिलमध्यें मरण पावला. या बंडामुळें द्रव्यहानि होऊन अमेरिकेकडून मोठया मुदतीच्या कर्जाऊ रकमा मिळण्यास अडथळा मात्र उत्पन्न झाला. यानंतरहि राजपक्षीयांचे कट चालूच होते, व त्यांनीं कार्लच्या मरणानंतर त्याचा पुत्र ओटो याला राजा मान्य केलें. परंतु शेतकरी वर्गाचा कल लोकसत्ताक राज्यपध्दतीकडे अधिकाधिक वळत होता; आणि १९२२ मे च्या निवडणुकीमध्यें राजपक्षीयांचा पूर्ण पराभव झाला. व्हिएन्ना येथील सरकारी नोकरांची फाजील असलेली संख्या कमी करावी असा राष्ट्रसंघानें हुकूम केला. हंगेरीला २५०० लक्ष सोन्याचे क्राऊन कर्ज देऊन तें आयात निर्गतीवरील जकात, तंबाखू व मीठ यांच्या परवान्याचें उत्पन्न व साखरेवरील कर, या उत्पन्नांतून फेडून घ्यावी अशी योजना राष्ट्रसंघाने १९२३ नवंबरमध्यें तयार केली. या काळांत द्वंद्वयुध्दाची प्रवृत्ति हंगेरीत इतकी वाढली कीं, त्याविरुध्द सरकारला जादा उपाय योजावे लागले तसेंच सार्वत्रिक दारिद्रयामुळें पुरलेल्या प्रेतांवरील जिन्नस चोरणें, अशा प्रकारचें किळसवाणें गुन्हेहि होऊं लागले.

आ स्ट्रि या ची सां प त्ति क व सा मा जि क स्थि ति (१९२१-२३) - १९२१ सप्टेंबरमध्यें आस्ट्रियांतील राहणीचा खर्च १९१४ मधील राहणीपेक्षां ९८ पटीनें वाढला होता. किंमती फार वाढल्यामुळें १९२१ डिसेंबरमध्यें व्हिएन्ना येथें मोठें बंड झालें, याच सालीं आस्ट्रियानें असा कायदा केला कीं, आस्ट्रियांतील सर्व रहिवाशांनीं परकी बँकनोटा, बिले, व परकीयांनां दिलेलें कर्ज यांत गुंतविलेला सर्व पैसा आस्ट्रियन सरकारच्या बाँडमध्येंच घालावा. १९२२ फेब्रुवारीमध्यें ५००० लक्ष क्राऊन झेको - स्लोव्हाकियानें आस्ट्रियाला वीस वर्षांत परत फेडीच्या करारानें दिलें. शिवाय ६५०० लक्ष सोन्याचे क्राऊन इतकें कर्ज आस्ट्रियाला मिळावें ही राष्ट्रसंघाची सूचना आस्ट्रियन पार्लमेंटनें मान्य केली. आस्ट्रियांतील या सांपत्तिक दुःस्थितीचा एक परिणाम असा झाला कीं, एका बाजूला झेको-स्लोव्हाकिया, युगोस्लाव्हिया, रुमानिया व पोलंड आणि दुसऱ्या बाजूला इटाली यांच्यामध्यें परस्परांबद्दल मत्सर उत्पन्न झाला. आस्ट्रियाच्या हलाखीचा फायदा घेऊन तेथें आर्थिक किंवा राजकीय सत्ता प्रतिपक्ष प्रस्थापित करीत अशी भीति परस्परांनां वाटूं लागली. १९२३ मध्यें आस्ट्रियाची सांपत्तिक स्थिति कांहीशीं सुधारली. ब्रिटनमध्यें मिळालेल्या कर्जामुळें सरकारला येणारी तूट निम्म्यावर आली. त्याच सालीं आस्ट्रियांत फासिस्टि चळवळीच्या धर्तीवर उपक्रमिंलेली समाजसत्ता वादाला विरोधी व राजसत्ताक पध्दतीला अनुकूल अशी चळवळ बरीच बळावली.

[सं द र्भ ग्रं थ. - वुइल्यम कोक्से - हिस्टरी ऑफ दि हॉऊस ऑफ ऑस्ट्रिया १२१८-१७९२ (लंडन १८७३); बँक्स-हिस्टरी ऑफ दि हॉऊस ऑफ ऑस्ट्रिया; वेहसे/मेमॉयर्स ऑफ दि कोर्ट, अॅरिस्टॉक्रसी अँड डिप्लोमसी ऑफ ऑस्ट्रिया; मिट्टन - ऑस्ट्रिया हंगेरी; मीशिएल्स - सीक्रेट हिस्टरी ऑफ दि ऑस्ट्रियन गव्हमेंट; वर्म्स - ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायर, पोलिटिकल स्केच सिन्स (१८६६); अॅन इंग्लिशमॅन - ऑस्ट्रो हंगेरिरियन एम्पायर अँड दि पॉलिसी ऑफ कौंट ब्यूस्ट पोलिटिकल स्केच १८६६-१८७० (लंडन १८७०); लेगर - हिस्टरी ऑफ हंगेरी; स्कॉटस व्हियेटर - दि फ्यूचर ऑफ ऑस्ट्रिया हंगेरी (लंडन १९०७) डब्ल्यू एच स्टाइल्स - ऑस्ट्रिया इन १८४८-४९ (न्यूयॉर्क १८५२)].

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .