प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

ऑस्ट्रिया - हा एक मध्ययूरोपांतील देश आहे. याच्या मर्यादा-पूर्वेस रशिया आणि रुमानिया, दक्षिणेस हंगेरी, अॅड्रियाटिक समुद्र, आणि इटली; पश्चिमेस स्वित्सरलंड, लिचटेनस्टिन आणि जर्मन साम्राज्य, - (बव्हेरिआचा भाग) उत्तरेस जर्मन साम्राज्य (सॅक्सनी आणि प्रशियाचा भाग). रशियाचें क्षेत्रफळ ११५५३३ चौरस मैल आहे. भूगोलदृष्टया हा देश एक नाहीं.

स मु द्र कि ना रा. - बहुतेक सरहद्दीवर जमीन आहे. फक्त सरासरी एकदशांश सरहद्दीला समुद्रकिनारा आहे. पश्चिमेस ट्रिस्टचें आखात आणि पूर्वेस फ्यूम किंवा क्वारनेरोचें आखात आहे व या दोन्ही आखातांच्या मध्यें इस्ट्रिआ हें द्वीपकल्प आहे. क्वारनेरो आखातांत क्वारनेरो बेटें आहेत. ट्रिस्ट, कपोडिस्ट्रिआ, पिरानो, पॅरेन्झो, रोव्हिग्नो हीं मुख्य बंदरें आहेत. डालमेशियाच्या किनाऱ्यावर झारा, कटारो, आणि रगुसा हे उपसागर आहेत व बेटांची एक रांग आहे.

प र्व त. - हा देश स्वित्झरलंडप्रमाणेंच अतिशय डोंगराळ आहे आणि याचा सरासरी चारपंचमांश भाग समुद्रसपाटीपासून सहाशें फुटावर आहे. येथील पर्वतांच्या तीन रांगा आहेत. आल्प्स पर्वत, कारपेथिअन पर्वत, आणि बोहेमिअनमोरेव्हिअन पर्वत.

न द्या. - येथील मुख्य नद्या डान्युब, नीस्टर, व्हिस्चुला, ओडर, एल्ब, ऱ्हाइन, आणि एडीज किंवा एत्स्च ह्या आहेत. या सर्व नद्यांचीं मुखें आणि डान्युब नदीचा उगमहि बाहेरील प्रदेशांत आहेत. पसाऊच्या दरींतून डान्युब नदी आस्ट्रियांत शिरते. येथें तिला इब्न नदी मिळते. ही पुढें हेनबर्गपर्यंत आल्प्स पर्वतामधून वहात जाते. लिन्झ आणि व्हिएन्ना या दोहोंमधील भागांत या नदीच्या तीरावरील देखावा फारच रमणीय आहे. ही नदी आस्ट्रियांत शिरतांना ८९८ फूट आणि येथून बाहेर पडतांनां ४०० फूट समुद्रसपाटीचे वर आहे. या नदीचा आस्ट्रियांतील प्रवाह २३४ मैल लांब आहे व हिचेपासून ५०३७७ चौरस मैल जमिनीला पाण्याचा पुरवठा होतो. ही काळया समुद्राला जाऊन मिळते. नीस्टर या नदीचा उगम पूर्व गॅलेशिआमध्यें कार्पेथिन पर्वतांत होतो व ही देखील काळया समुद्राला जाऊन मिळते. हिचा आस्ट्रियांतील प्रवाह ३७० मैल आहे, त्यांपैकीं ३०० मैल नौकानयनास योग्य असा आहे. १२००० चौ. मैल क्षेत्रफळास हिचेपासून पाण्याचा पुरवठा होतो. व्हिस्चला आणि ओडर या दोन्ही नद्या बाल्टीक समुद्रांत जाऊन मिळतात. व्हिस्चुला नदीचा उगम मोरेव्हिआमध्यें होतो. हिचा प्रवाह २४० मैल आहे. व ही १५५०० चौ. मैल जमिनीस पाण्याचा पुरवठा करिते. ओडर नदीचा उगम देखील मोरेव्हिआमध्यें होतो. हिचा येथील प्रवाह ५५ मैल लांब आहे. एल्ब नदी उत्तर समुद्रास मिळते. हिचा उगम रिसेन्जेबर्ज येथें होतो. हिचा येथील प्रवाह १८९ मैल आहे, त्यापैकीं सरासरी ६५ मैल नौकानयनास योग्य असा आहे. २१००० चौ. मैल जमिनीला ही नदी पाणी पुरवते. ऱ्हाइन नदीचा आस्ट्रियामध्यें सारा २५ मैलांचाच प्रवाह आहे. एडिज नदी अॅड्रिआटिक समुद्राला मिळते. टिरोल पर्वतांत हिचा उगम होतो. हिचा येथील प्रवाह १३८ मैल आहे व ही ४२६६ चौ. मैल जमिनीस पाण्याचा पुरवठा करिते. येथें मोठालीं सरोवरें मुळींच नाहींत.

पा त ळ ख नि ज प दा र्थां चे झ रे. - सर्व यूरोपात आस्ट्रियामध्यें सर्वांत जास्त आणि महत्त्वाचे असे खनिज पदार्थाचे झरे आहेत व हे सर्व बहुतेक बोहेमिआमध्यें आहेत. यांपैकीं मुख्य म्हटलीं म्हणजे अल्कजल, (अल्काइन), अल्काम्लजल (अल्कलाइन अॅसिडयुलेटेड वॉटर्स), लोहजल, कटूजल (बिटर वॉटर्स),क्षारजल (सलाइन वॉटर्स) अदजल (आयओडाइन वॉटर्स) आणि उष्णजल (थर्मल वॉटर्स) हीं होत.

भू स्त र व र्ण न. - आस्ट्रियाची खनिज संपत्ति विपुल आहे. आस्ट्रियांतील फार प्राचीन काळचे खडक हे अनेक धातूंनीं युक्त असे आहेत. अर्सेबर्ज व प्रायब्रम येथील रौप्यमिश्रित शिशांच्या खाणीचे अवशेष सांपडतात. तसेंच स्टीरीया व बुकोव्हिन्ना येथें कच्च्या लोखंडाच्या खाणी आहेत. कार्निओला येथें पाऱ्याच्या खाणी असून, तृतीय युगांतील ज्वालामुखी पर्वतांच्या खडकांत, सोनें व चांदीच्या कच्च्या खाणी आढळून येतात. सायलेशिया व बोहेमियामध्यें पुष्कळ कोळशाच्या खाणी आहेत. गॅलीशिया वगैरे प्रांतांत मिठाच्या खाणी असाव्यात असें तेथें सांपडणाऱ्या क्षारांच्या अवशेषांवरून अनुमान काढतां येतें.

ह वा मा न. - हवामान निरनिराळया प्रकारचें आहे, कारण हा देश फार अफाट असून लहान मोठया उंचीच्या डोंगरांनीं व्यापलेला आहे. हवामानाप्रमाणें याचे तीन भाग करतां येतील. (१) उत्तरअक्षांश ४६० पर्यंत सर्वांत दक्षिण भाग पसरलेला आहे. येथें सर्व ॠतूंतील हवा सौम्य आणि उन्हाळा पांच महिनेपर्यंत असतो. (२) उत्तरअक्षांश ४६० आणि ४९० यांमध्यें  मध्यभाग पसरलेला आहे. येथें हिवाळा मोठा आणि जास्त कडक असतो आणि उन्हाळाहि जास्त कडक असतो. (३) उत्तरभाग उत्तर अक्षांश ४९० अंशांच्या उत्तरेकडील भागांत पसरलेला आहे. या भागांत हिंवाळा जास्त असतो. साधारणपणें दरवर्षी आस्ट्रियामधील उष्णतेचें मान दक्षिण भागांत सरासरी ५९० आणि उत्तर भागांत ४८० पर्यंत असतें. व्हिएन्नामध्यें सर्वांत जास्त उष्णतेचें मान ९४० आणि सर्वांत की २० असतें. पश्चिमेकडील प्रदेशांपेक्षां उत्तरेकडील प्रदेशांत पाऊस जास्त पडतो. दक्षिण प्रदेशांत वसंतॠतूंत, आणि शरदृतूंत आणि उत्तर आणि मध्य प्रदेशांत उन्हाळयांत पाऊस पडतो. दक्षिण आल्प्स टापूंत आणि समुद्रकिनाऱ्यावर वादळें नेहमीं होतात.

वि भा ग. - याचे १७ विभाग आहेत. या विभागांनां 'लँड' किंवा 'क्रौन लँड' असें म्हणतात. यांपैकीं तीन म्हणजे बोहेमिया, गॅलेशिया आणि लोडेप्रेरिया आणि डालमेशिआ राज्यें होतीं. लोअर आणि अप्पर आस्ट्रिया यांवर आर्चडची असत आणि साल्झबर्ग, स्टिरिया, कारिन्थिया, कार्निओले, सिलेनिआ आणि बुकोव्हिया यांवर डयूक असत. गोर्झग्रोडीस्का आणि टिरोल कौंटच्या ताब्यांत होते. दोन मोरेव्हिआ आणि इंस्ट्रिआ हीं मारग्रेव्हच्या ताब्यांत असत. व्होरालबर्ग याला फक्त लँड असेंच म्हणत. आणि ट्रीस्ट्र हें शहर क्रौन लँड समजलें जाई.

लो क सं ख्या. - १९१० सालीं ३१ डिसेंबरच्या खानेसुमारीप्रमाणें आस्ट्रियाची लोकसंख्या २,८५,७१,९३४ होती. म्हणजे प्रत्येक चौरस मैलाला २४७ माणसें पडतात. या देशांत कायद्यानें विवाहबध्द न झालेल्या स्त्रीपुरुषांपासून झालेल्या मुलांची संख्या फार आहे. तसेंच मुलांची मृत्युसंख्याहि फार आहे.

वं श. - मानववंशशास्त्रदृष्टया येथें निरनिराळया वंशांचे लोक आहेत. यूरोपांतील निरनिराळया वंशापैकीं लॅटिन, टयूटॉनिक आणि स्लाव्होनिक या तीन मुख्य वंशाचे लोक येथें आढळतात. स्लॅव्होनिक लोकांची संख्या बरीच मोठी आहे व हे संख्येनें इतर वंशाच्या लोकांपेक्षां जास्त आहेत. जर्मन लोकांची संख्याहि बरीच असल्यामुळें त्यांचा येथें फार मोठा राष्ट्रसंघ आहे. सरकारी कामकाजांत व पुस्तकें छापण्यासाठीं जर्मन भाषेचा उपयोग करतात येथील राज्यकारभारांत यांचें वर्चस्व होतें व येथील राज्याची स्थापना व भरभराट करण्याच्या कामीं यांचेंच विशेष अंग होतें. लॅटिन वंशांत इटालियन, लाडिनि आणि रुमानियन लोक येतात.

शे ती. - पूर्वीपासून शेती ही येथील लोकांची मोठी उत्पन्नाची बाब आहे. १९०० सालीं एकंदर लोकसंख्येपैकीं अर्धेअधिक लोक शेतीच्या धंद्यावर आपली उपजीविका करीत असत. एकंदर जमिनीचें क्षेत्रफळ ७४१०२००१ एकर होतें. त्यापैकीं शेंकडा ९४.२ एकर जमिनींतून उत्पन्न हातें. ९४.२ एकर जमिनीपैकीं ०.४ एकर जमिनींत तळीं आहेत व त्यांतून माशांचें उत्पन्न होतें. उत्पन्नाच्या बाबीच्या जमिनींपैकीं शेंकडा ३७.६ एकर लागवडींत आणण्याच्या उपयोगी पडेल अशी आहे. ३४.६ एकर जंगल, २५.२एकर कुरणें, १.३ एकर बगीचे, ०.९ एकर द्राक्षाचे मळे आणि ०.४ एकर तळीं वगैरे. मुख्य पीक म्हणजे गहूं, राय, जव, ओट, मका, बटाटे, साखरेचें बीट, गाजर यांचें आहे. गहूं आणि मका यांचें पीक पुरेसें होत नाहीं म्हणून यांची बाहेरून आयात व्हावी लागते. जव आणि ओट यांचें पीक बाहेर पाठविण्याइतकें होतें.

जं ग ल. - उत्पन्नाचे जमिनीपैकीं १/३ वर जमीन जंगलानें व्यापली आहे. जंगलांत शेंकडा ८५ झाडें उंच आणि इमारती लांकडाचीं आहेत. विशेषेंकरून ओक, पाईन, बीच, अॅश, एल्म आणि अशाच प्रकारचीं झाडें आहेत व यांचें बरेंच उत्पन्न होतें. येथें उत्तम प्रकारचे आणि पुष्कळ घोडे होतात.

ख नि ज द्र व्यें. - या बाबतींत यूरोपांतील पहिल्या प्रतीच्या देशांत या देशाची गणना केली जाते. प्लॅटीनम सोडून सर्व प्रकारच्या उपयुक्त धातू येथें सांपडतात. सोनें, चांदी तसेंच लोखंड, तांबें, शिसें आणि कथील हीं अतिशय आहेत. (पिटफोल आणि ब्रौनकोल) कोळशाच्या खाणींतून थरचे थर आहेत. जस्त, अँटिमनि, सोमल, (आर्सेनिक) कोबाल्ट, निकल, मँगनीज, बिसमथ क्रोमिअम, यूरेनिअम, टेल्युरिअम, गंधक, ग्रॅफाइट आणि असफाल्ट ही थोडया प्रमाणांत सांपडतात. याशिवाय संगमरवरी दगड, घरें शाकारण्याच्या पाटया, जिप्सम, चिनी माती, मडक्यांची माती आणि जवाहीर यांच्याहि खाणी आहेत. १८२५ सालीं कोळशाचें उत्पन्न अजमासें १५०००० टन होतें आणि १९०० सालीं ३२५००००० टन झालें.

धं दे. - १९ साव्या शतकाच्या शेवटल्या सरासरी २५ वर्षांत येथें धंद्यांची आणि कारखान्यांची बरीच वाढ झाली; परंतु या वाढीचा प्रसार सर्व देशभर झाला नव्हता. निरनिराळया धंद्यांनां उपयोगी पडणाऱ्या जिनसा उदाहरणार्थ, काळसा, कच्चा माल वगैरे येथें विपुल असल्यामुळें त्यांची लवकर व जोरानें वाढ होण्याला येथील परिस्थिति अगदी अनुकूल आहे. कापड विणणें, शुध्द धातु तयार करणे मद्यार्क काढणें, चामडीं, कागद आणि साखर तयार करणें कांचकाम, चिनीमातीचें काम आणि कुंभारकाम, रासायनीक द्रव्यें करणें आणि गायनवादनाला लागणारीं वाद्यें शास्त्रीय रीत्या तयार करणें हे सर्व येथील मुख्य धंदे आहेत.

कापूस, लोकंर, रेशीम आणि निरनिराळया प्रकारच्या तागाच्या सुताचें कापड करण्याचे कारखाने बहुतेक सर्व बोहेमिआ, मोरेव्हिआ, सिलेसिआ आणि खालील आस्ट्रिया या ठिकाणीं आहेत. १९०२ सालीं २१८३७ कारखाने होते व त्यांत एकंदर काम करणारे लोक ३३७५१४ होते.

शुध्द लोखंड तयार करून त्याचें निरनिराळें सामान तयार करण्याचे कारखाने बोहेमिया, मोरेव्हिआ, सिलेसिया, अप्पर आणि लोअर आस्ट्रिया, स्टिरिया, कारिन्थिया या ठिकाणीं आहेत. याशिवाय निरनिराळया धातूंचें सामान तयार करण्याचे कारखाने निरनिराळया ठिकाणीं आहेत. येथें कांचेचे कारखाने फार जुने असून ते सर्व बोहेमियामध्यें आहेत.

बहुतेक व्यापार आगगाडीनें व देशांतील नद्यांवर चालतो. १९०० साली परदेशाशीं चालणाऱ्या व्यापारांत गुंतलेल्या व आस्ट्रो-हंगेरीच्या निशाणाखालीं चालणाऱ्या जहाजांची एकंदर वहनशक्ति १४४८७६४ टन होती आणि परदेशी निशाणाखालीं चालणाऱ्या नौकांची २६६५९१ टन होती.

रा ज्य का र भा र. - येथील राजाची सत्ता नियंत्रित किंवा पार्लमेंटच्या साह्यानें चालणारी असे येथील राजा सम्राट होता. हॅब्सबर्ग-लोथ्रिंजेन घराण्यांतील जेष्ठ पुत्राकडे गादी वंशपरंपरेनें जात असे पण पुत्र नसल्यास वारसा मुलीकडे जात असे. राजा रोमन कॅथोलिक चर्चचा असला पाहिजे असा नियम होता. आस्ट्रिआचा साम्राट हा हंगेरीआचा देखील राजा होता. राजा आणि कांहीं सामान्य राज्यकारभार सोडून आस्ट्रिया हंगेरीपासून अगदी स्वतंत्र होता. राजा सर्व सेनेचा वरिष्ठ सेनानायक असे. त्याला उमरावी वगैरे देण्याचा आणि गुन्हेगारांनां क्षमा करण्याचा अधिकार असे. कार्यकारी सत्ता सर्वस्वी त्याचेकडे असे. परंतु कायदेकानू करण्याची सत्ता लोकसभा (रीचस्राट) आणि राजा यांचे मध्यें वाटलेली असे. सर्व न्याय त्याचेच नांवाखालीं दिला जाई. कार्यकारी सत्ता चालविण्याचें काम राजानें मंत्रिमंडळावर सोपवून दिलेलें असे. या मंडळापैकीं एक मंडळाचा अध्यक्ष असे. दिवाणी काम करण्यासाठीं निरनिराळया प्रांतांत सुभेदार (स्टथोल्डर) नेमलेले असत. स्थानिक कारभार चालविण्यासाठीं प्रतिनिधिक संस्था असत. कायदे करण्याची सत्ता रीचस्राट कडे सोपविलेली असे. रीचस्राटचे वरिष्ठसभा (हेरेनहॉस) आणि कनिष्ठसभा (अॅबजिओर्डनेटेन हॉस) असे दोन भाग होते. सभासदांना वेतन आणि जाण्यायेण्याचा  खर्च मिळे. प्रत्येक बिल कायदा होण्यापूर्वी दोन्ही सभेंतून पसार होऊन त्याला राजाची संमति मिळावी लागे. रीचस्राट सभा दरवर्षी राजानें बोलाविलीच पाहिजे असा नियम होता.

ध र्म. - कायद्याने मान्य केलेल्या सर्व धर्मपंथांना प्रार्थनास्वातंत्र्य, कारभाराची देखरेख, व मालमत्तेची देखरेख, हे सर्व हक्क मिळाले होते. राजा हा रोमन कॅथोलिक पंथाचा असलाच पाहिजे अशी वहिवाट असल्यामुळें या पंथाचा धर्म राजधर्म झाला होता. राजघराणें या पंथाचें अनुयायी असे तरी जेव्हां जेव्हां पोपनें आपलेकडे फाजील हक्क घेण्याचा घाट घातला तेव्हां तेव्हां त्याला या घराण्यानें मोडा घातलेला आहे. चर्चच्या मालमत्तेवर कर बसविणें, बिशपची नेमणूक करणें, आणि पोपनें स्वतःचा हुकूम जाहीर करण्यासाठीं राजाची परवानगी घेणें हे हक्क राजानें आपल्याकडे ठेविले होते.

शि क्ष ण. - प्राथमिक शिक्षणाच्या शाळांची पध्दत येथें मराया थेरेसाचे वेळेपासून चालत आलेली आहे. हल्लीची शिक्षणपध्दति मे १४, सन १८६९सालच्या शिक्षणाच्या कायद्यान्वयें सुरू करण्यांत आली होती. या कायद्याने सरकारनें चर्चच्या अधिकारामधील शाळांचा कारभार काढून आपले स्वाधीन करून घेतला व प्रत्येक जाती करितां प्राथमिक शाळा बांधून ती चालविण्याची जबाबदारी घेतली. ६ व्या वर्षापासून चवदाव्या वर्षापर्यंत (कांही ठिकाणीं बाराव्या वर्षापर्यंत) सर्वांनी शाळेंत गेलेंच पाहिजे. अशी सक्ति होती. धार्मिक शिक्षण देण्याचें काम गावांतील उपाध्याकडे असे. व मोठाल्या शाळांमधून मुद्दाम एखाद्या माणसाचीच नेमणूक केलेली असे. खासगी शाळा काढण्याचीहि लोकांना परवानगी होती. शिक्षण (१) प्राथमिक (२) माध्यमिक (जिम्नाशिया) (३) उच्च (युनिव्हर्सिटि व कॉलेज), (४) औद्योगिक (टेक्निकल), (५) खनिशास्त्र (माइनिंग), (६) पशुवैद्यक व (७) विशिष्ट अशा निरनिराळया संस्थांत दिलें जातें. माध्यमिक शिक्षणाच्या शाळा १९१५-१६ मध्यें ५२४ होत्या व प्राथमिक शाळा १९१२ मध्यें २३२४७ होत्या. १९१६-१७ सालीं आठ युनिव्हर्सिटया असून साल्झबर्ग येथें एक नवीन निघणार होती. औद्यागिक शाळा १९१५-१६ मध्यें ६ ठिकाणीं होत्या.

न्या य - न्याय देण्यासाठीं ९६३ कौंटी कोर्टें; ७४ प्रांतिक आणि जिल्हा कोर्टे; ९ वरिष्ठदर्जाचीं प्रातिक कोर्टे; व्हिएन्नामधील सर्वांत वरिष्ट कोर्ट आणि कसेशन कोर्ट, इतकीं कोर्टें होतीं. कार्यकारी खातीं आणि न्यायखातीं अगदीं एकमेकापासून स्वतंत्र होती. याशिवाय इतर विशिष्ट प्रकारच्या विषियावर न्याय देणारीं कोर्टे होतीं. (उ. व्यापार लष्कर वगैरे). व्हिएन्नामध्यें आणखी एक राजाचें कोर्ट होते (साम्राज्य कोर्ट). येथें न्यायाधिशांमधील मतभेद असलेले खटले येत.

ज मा ख र्च - १९१३ सालीं जमा ३१३७४८१ हजार क्रौन व खर्च ३१३७२०२ हजार क्रौंन (२४ क्रौंन म्हणजे १ पौंड) होता व १९१८-१९ सालीं उत्पन्न ४८५४७८९ हजार क्रौन व खर्च २४३२११४० हजार क्रौन होता. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, जकात, पोस्ट आणि टेलेग्राफ, रेल्वे, जंगलावरील आणि खाणीवरील कर व फायदा ह्या उत्पन्नाच्या मुख्य बाबी होत्या. १९१८ मध्यें ऑस्ट्रियाचें जादा कर्ज ५ खर्च ४ अब्ज क्रौन होतें. व त्याचें वार्षिक व्याज २ अब्ज क्रौन होतें.

आ ग गा डया - देशांतील दळणवळणासाठी आगगाडया आहेत. १८५४ सालीं सेम्मरिंग आगगाडीचा बांधलेला रस्ता हा यूरोपात डोंगरावरील आगगाडीचा पहिलाच रस्ता होय. १८२४ सालीं येथें पहिला रस्ता बांधण्यांत आला व त्यावरून पहिल्यानें घोडयाची ट्रॅमगाडी चालविण्यात आली. वाफेची आगगाडी १८३७ पासून सुरू करण्यांत आली. १९०५ सालीं येथें आगगाडीच्या रस्त्यांची एकंदर लांबी १३९९० मैल होती.

[सं द र्भ ग्रं थ - टर्नबुल - ऑस्ट्रिया;व्हिट्मन-ऑस्ट्रिया (दि स्टोरी ऑफ नेशन्स); वाइल्ड - ऑस्ट्रिया इटस लिटररी सायंटिफिक अँड मेडिकल इन्स्टिटयूशन्स; बेकर-ऑस्ट्रिया, हर पीपल अॅड देअर होम लँडस; गयद-मॉडर्न ऑस्ट्रिया, हर रेशल अॅड सोशल प्राब्लेम्स; स्टेट्समन्स इयर बुक]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .