प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

आश्रम - 'आश्रम' हा शब्द श्रम - देह झिजविणें या संस्कृत धातूपासून झालेला असून त्याचे (१) तप करण्याची जागा किंवा (२) तप वगैरे करण्याची क्रिया, असे अर्थ आहेत. परंतु यापैकीं मूळचा अर्थ कोणता हें ठरविणें कठिण आहे. यापैकीं दुसऱ्या अर्थाची झालेली परिणति लक्षांत घेतां प्राचीन भारतीयांच्या आयुष्यक्रमावर पुष्कळ प्रकाश पडतो.

ॠग्वेदकालीं आर्यांची वस्ती पंजाबमध्यें झाली असतांना वर्णाश्रमांचा कांहीं प्रश्नच नव्हतां, व अगदीं मागाहूनच्या ॠग्वेदसूक्तांत (ॠ. १०-९०) म्हणजे पुरुष-सूक्तांत चार समाज विभागांचा उल्लेख आहे, परंतु त्या चार समाजविभागांस वर्ण ही संज्ञा प्राप्त झाली नव्हती व आश्रमसंस्थाहि दिसत नाहीं.चातुर्वर्ण्य संस्थेची जसजशी परिणति होत गेली तसतशी प्रत्येक वर्णाचीं कर्तव्यें ठरत जाऊन ब्राह्मणवर्णानें अध्ययन, अध्यापन इत्यादि कार्ये स्वतःकडे घेतलीं, व हलके हलके प्रत्येक त्रैवर्णिक मुलानें कांहीं वर्षे गुरुगृहीं अध्ययन केलेंच पाहिजे असा नियम बनून गेला. अगदीं प्रथम प्रत्यक्ष बापच स्वतः गुरूचें कार्य भागवीत असे, परंतु पुढें प्रत्येक पित्याला आपल्या मुलांस सर्व प्रकारचें शिक्षण स्वतः देतां येणें शक्य नव्हते. या विद्यार्थि धर्माचा विकास होण्यास श्रौतस्मार्त सप्तसंस्थाचें अध्ययन काठिण्य, आणि अध्ययनोत्तर ॠत्विजाच्या धंद्यांत बऱ्याच प्रकारची प्राप्ति हीं कारणें झालीं असावीं. व ह्यामुळेंच पुष्कळ विद्यार्थी विद्यार्जनाकरितां दूरवर प्रवास करीत (बृहदारण्यक उप ३.३, १) त्याच प्रमाणें मोठे प्रसिध्द आचार्य जागजागीं शिष्यांस अध्यापन करीत फिरत असत (कौषीतकी ब्रा. ४.१)

अर्थांत सर्व त्रैवर्णिकांनां सारख्या तऱ्हेंचें शिक्षण मिळत नसे. ह्या मिळणाऱ्या शिक्षणाबद्दल शिष्यास यज्ञशालेंतील किंवा बाहेर शेतांतील कामें करावीं लागत. व अध्यायनाचें शेवटीं काहींतरी दक्षिणा गुरूस द्यावी लागे. गुरुगृहीं काम करून फावल्या वेळांत वेदाध्ययन करण्याची चाल असें. अशा रीतीनें अध्यायनसमाप्तीनंतर सर्वच लोक गृहस्थ होत नसत तर कांहीं नैष्ठिक ब्रह्मचर्य धारण करून गुरुगृहीं कायम वास करीत. किंवा कांहीं अध्ययन समाप्त झाल्यावर वनांत जाऊन खडतर कृच्छ्रचांद्रायणादि व्रतें करण्यांत आपला काळ घालवीत, व कांहींना अशा प्रकारचा आयुष्यक्रम देखील त्याज्य वाटून, ते सर्वसंग त्याग करून परिव्राजक होत व भिक्षावृत्तीवर जीवितयात्रा संपवीत असत. चतुर्थाश्रमसंस्थेची व्यवस्था ह्यानंतर उपनिषत्कालांत घटनास्थितींत असून धर्मसूत्र कालांत व मागाहूनच्या स्मृतिकालांत पूर्णपणे अंमलांत आलेली दिसते. अंमलात आली याचा अर्थ तशी धर्मशास्त्रांत मांडणी करण्यांत आली एवढाच समजावयाचा, सर्व लोक चारहि आश्रम पाळीत असे नव्हे तर सुशिक्षित वर्गापैकी काही वर्ग पाळीत असावा. कारण धर्मसूत्रें व स्मृति या ग्रंथांत प्रत्येक मुलानें (१) ब्रह्मचर्य, (२) गार्हस्थ्य, (३) वानप्रस्थ व (४) संन्यास, ह्या चार आश्रमांतून क्रमाक्रमानें गेलें पाहिजे असे नियम घालून दिलेले दिसतात. अखिल मानव जातीच्या इतिहासांत ह्या चतुर्थाश्रम संस्थेची इतकी उदात्त कल्पना कोणतीच नाहीं असें पाल डासनें म्हणतो (एरिए-आश्रम) उपनिषत्कालीं आश्रमसंस्थाची कसकशी वाढ होत गेली ह्याचा इतिहास पाहण्यासारखा आहे. छांदो० उप० ८-१५ यामध्यें ब्रह्मचारी व गृहस्थ यांचाच उल्लेख आला असून ह्यांच्या भिन्न भिन्न कर्तव्याचें फल एकच मोक्ष प्राप्ति सांगितलें आहे. छां. उ. २-२३-१ ''त्रयो धर्मस्कंधा यज्ञोऽध्ययनं दानमिति प्रथमस्तप एव द्वितीयो ब्रह्मचर्याचार्यकुलवासी तृतीयोऽत्यंतमात्मानमाचार्यकुलेऽवसादयन्सर्व एते पुण्यलोका भवन्ति ब्रह्म संस्थोऽमृतत्वमेति'' ह्या सुप्रसिध्द उल्लेखांत एका बाजूस तीन प्रकारचीं कर्तव्यकर्में व दुसऱ्या बाजूस ब्रह्मज्ञ मनुष्य ह्यांनां कशा प्रकारचीं भिन्न भिन्न फलें मिळतात ह्याबद्दल वर्णन आहे. त्याचप्रमाणें बृह० उप० ४-५-२२ ह्या ठिकाणीं (१) वेदाध्ययन, (२) यज्ञ दान वगैरे व (३) तप अशीं तीन प्रकारचीं कर्तव्यें करणारे लोक यांनां मिळणाऱ्या फळाहून आत्मज्ञानी मनुष्याला निराळेंच फल मिळतें असें वर्णन आलें आहे.

वरील उल्लेखावरून असें दिसून येतें कीं, उपनिषत्कालीं चतुराश्रम व्यवस्थेचा विकास होत होता. प्रथम ब्रह्मचर्य व ग्रार्हस्थ्य असे दोनच आश्रम मानले जात, परंतु पुढें ह्यांतूनच तीन आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य व वानप्रस्थ असे निघाले, व ह्या सर्व पलीकडे आत्मज्ञांनी लोकांची योग्यता मानली जात असून त्यांस ''अत्याश्रमी'' अशी संज्ञा श्वे. उ. ६-२१ व कैवल्य उ. २४ यांत दिली आहे.

पुढें कालांतरानें आत्मज्ञानाची थोंरवी वरील तिन्ही आश्रमापेक्षां जास्त मानल्याचा परिणाम असा झाला कीं, एक नवीन संन्यासाश्रमच बनविण्यांत आला, व अशा रीतीनें क्रमवार अशी चतुराश्रम संस्था पूर्ण झाली. तरी देखील कांहीं कालपर्यंत वानप्रस्थ व संन्यासाश्रम ह्यामध्यें स्पष्ट भेद केलेला नव्हता. परंतु यानंतर झालेल्या मागाहूनच्या 'जाबाल' वगैरे उपनिषदांत चारहि आश्रमांचे उल्लेख व वर्णनें आढळतात.

(१) ब्रह्मचांरिन् - उपनिषदांतील कांहीं उल्लेखांवरून असें दिसून येतें कीं, ब्रह्मचर्याश्रम स्वीकारण्याची रूढि हलके हलके बनत चालली होती, परंतु तो कांहीं अद्याप धर्मशास्त्रीय नियम झाला नव्हता. छांदोग्य उपनिषदांतील श्वेतकेतूप्रमाणें पित्यापाशीं विद्यार्जन करणेंहि शक्य होतें. परंतु कधीं कधीं त्याच मनुष्यास दुसऱ्या गुरूचाहि स्वीकार करावा लागे, प्रथम हातांत समिधा घेऊ ''उपैमि अहं भवंतं'' (वृ. ६.२, ७) असे शब्द उच्चारून शिष्य गुरूकडे येई, व नंतर गुरु त्याला त्याच्या जन्माबद्दल व कुलगोत्र वगैरेबद्दल माहिती विचारी हा ब्रह्मचर्याश्रमाचा काल १२ वर्षे व प्रसंगविशेषीं कमीजास्त वर्षें असे. छां. उ. ६.१, २ मध्यें श्वेतकेतूनें आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी गुरुगृहीं जाऊन १२ वर्षे अध्ययन केल्याचा उल्लेख आहे. गुरुगृहींच्या शिष्यांस ''अंतेवासी'' ही संज्ञा असे. कांहीनां अशा प्रकारची आयुष्यक्रमणा करणें इतकें मानवे कीं, ते पुढें सर्व जन्मभर गुरुगृहींच वास करीत असत. शिष्याचें अध्ययन समाप्त झाल्यावर गृहस्थाश्रम स्वीकारण्यापूर्वी गुरु त्यास पुढीलप्रमाणें उपदेश करीः - सत्यं वद। धर्मंचर। स्वाध्यायान्मा: प्रमदः। आचार्याय प्रियं धनमाहृत्य प्रजातंतुं मा व्यवच्छेत्सीः। इत्यादि (तै. उ. १.११) त्याचप्रमाणें माता, पिता, आचार्य, अतिथि यांचा सन्मान राखणें, आपलें आरोग्य-धन वगैरे संभाळणें, आपल्यापेक्षां श्रेष्ठ दर्जाच्या लोकांचा आदर राखणें वगैरे गोष्टीबद्दल उपदेश करण्यांत येत असे.

(२) गा र्ह स्थ्य :- छां. उ. ८.१५ यांतील उल्लेखावरून कांहीं शिष्य गुरुगृहीं अध्ययन संपल्यावर गृहस्थाश्रमी होऊन दुसऱ्या शिष्यांनां विद्या शिकविण्याचें काम आयुष्यभर करीत असलेले दिसतात, व अशा लोकांनां ब्रह्मप्राप्तीचें फल सांगितलें आहे; परंतु ह्याच्या उलट छां. उ. ५.१० सारख्या उल्लेखांत केवळ यज्ञ, दान करणाऱ्या लोकांस चंद्रलोकाचें फळ व पुनश्च त्या जगांत प्रवेश सांगितला आहे. गृहस्थाचा मुख्य आवश्यक धर्म म्हणजे कुलसंस्थापना करून प्रजोत्पत्ति करणें हा सांगितला आहे. कांहीं उल्लेखांत प्रजोत्पत्तीमुळें पितरांचें ॠण फिटतें, असें वर्णन आहे; व बृ. उपनिषदाच्या शेवटीं मनुष्यानें कांहीं विशिष्ट गुणांनीं युक्त पुत्र किंवा कन्या उत्पन्न करतांनां कशा प्रकारचा आहार करावा वगैरे नियम सांगितले आहेत. ह्या वेळीं बहुपत्नीकत्वाची चाल प्रचारांत असावी व याज्ञवल्क्याच्या दोन बायकांचा तर स्पष्ट उल्लेख बृ. उ. २.४, ४; ५ मध्यें आहे.

(३) वा न प्रस्थ. - हा व संन्यासाश्रम यांमधील भेद मागाहून पडला. प्रथम वानप्रस्थ स्थिति ही गार्हस्थाप्रमाणेंच एक 'धर्मस्कंध' म्हणजे कर्तव्यकर्माचा भाग होय, असें मानण्यांत येत असे; परंतु कांहीं कालानें गृहस्थाचीं कर्तव्यकर्मे यथासांग समाप्त झाल्यावर वृध्दपकालीं वानप्रस्थ व्हावयाचें अशी चाल पडली. बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्यानें आपल्या गार्गी व मैत्रेयी या दोन बायकांत द्रव्याची वांटणी करून गृहस्थाश्रमाचा त्याग केल्याचा, उल्लेख आहे. तो आत्मस्वरूपाचें ज्ञान प्राप्त करून सर्वसंगविवर्जित अशी परिव्राजक वृत्ति धारण करण्याकरितां होय. ह्या ठिकाणीं वानप्रस्थ व परिव्राजक असे निराळे भेद असल्याचें दिसत नाहीं.

(४) संन्यासिन् (परिव्राजक-भिक्षुः) संन्यास, ह्याचा मूळ अर्थ सर्व प्रकारच्या आयुष्याचा त्याग करणें असा होता, परंतु कालांतरानें हा संन्यासश्रम शेवटचा आश्रम झाला. ह्या शेवटच्या संन्यासाश्रमाचा विकास फारच आश्चर्यकारक आहे. कारण आत्मज्ञानानें प्राप्त होणारी स्थिति म्हणजेच संन्यास अशीं जी मूलभूत कल्पना ती जाऊन पुढें आत्मज्ञानाचें तें एक आवश्यक साधनच होऊन बसलें. विशेषतः मागाहून तयार झालेल्या ब्रह्म, संन्यास, आरुणेय, कंठश्रुति, परमहंस, जाबाल, आश्रम इत्यादि उपनिषदांत आपणास ह्या संन्यासाश्रमाचे नियम, त्याचें आचरण वगैरचें यथास्थित विवेचन आढळतें. शंकराचार्यांनीं प्रस्थापित केलेल्या अद्वैमतांतील आचारमार्गांचा ह्या संन्यास मार्गावर बराच परिणाम झाला आहे.

ह्या मागाहूनच्या उपनिषदांत संन्यासाचे अनेक प्रकार वर्णन केले आहेत. उदाहरणार्थ संन्यासोपनिषदांत कुटीचक, बहूदक, हंस, परमहंस, तुरीयातीत व अवधूत असे संन्यासाचे सहा प्रकार सांगितले आहेत, व ह्या प्रत्येकांचे आचारभेदहि सांगितले आहेत.

[संदर्भ ग्रंथ - उपनिषदें, धर्मसूत्रें, मनुस्मृति, महाभारत, जें. सी. ओमन - मिस्टिक्स, असेटिक्स, अँड सेंट्स ऑफ इंडिया, लंडन १९०३; तसेंच याच ग्रंथकाराचें कल्ट्स, कस्टम्स अँड सुपरस्टिशन्स ऑफ इंडिया लंडन. १९०८, डायसेन - फिलासफी ऑफ दि उपनिषदस् (इंग्लिश-भाषांतर) १९०६ एडिंबरो.]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .