प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

आशिया मायनर - आशिया खंडाच्या अगदीं पश्चिम टोंकाला तुर्की साम्राज्यान्तर्गत जो एक द्वीपकल्प आहे त्याचें हें नांव आहे. मर्यादा, - उत्तरेस काळा समुद्र. पश्चिमेस इजिअन समुद्र. दक्षिणेस भूमध्यसमुद्र. पूर्वेस युफ्रेटीस नदी. लांबी ७२० मैल; रुंदी ४२० मैल. पर्वत - दक्षिणेस टॉरस व दुसरा अॅटी टारस; नद्यां - बोआस, इरिस, हलिस, संगरियेस, विलाईस, या काळया समुद्रास मिळतात. रिंडाकस, व मॅकेस्टस, या मार्मोराच्या समुद्रास मिळतात. हर्गस, व मिअॅन्डर, या इंजिअन समुद्रास मिळतात. सिंहुन, आणि गेरेनीझ, या भूमध्यसमुद्रास मिळतात. सरोवरेः - टुझगेउल, बल्दरगेउल, अजितझगेउल, हीं खाऱ्या पाण्याची व बीशरगेउल व एगिर्दिरगेउल हीं गोडया पाण्याचीं सरोवरें आहेत.

भू स्त र.- आशिया मायनरचें मध्य पठार निरनिराळया खनिज द्रव्याच्या थरांनीं युक्त असून, त्या ठिकाणीं तृतीय युगांतील, चिकणमातीचे व चुन्याचे अवशेष सांपडतात. या मध्य पठाराभोंवती डोंगराच्या रांगाच रांगा पसरल्या आहेत. समुद्रकिनाऱ्याच्या सभोंवतींहि तृतीय युगांतील अवशेष सांपडतात. टॉरस पर्वताच्या आग्नेयीस ज्वालामुखी पर्वतांची ओळ असून, त्यांतून हल्ली ज्वालांचे लोट निघत नाहींत. पण तृतीय युगाच्या वेळेस ते ज्वालायुक्त असावे असें दिसतें. मध्य पठाराच्या दक्षिणेस टॉरस व अॅन्टी टॉरस पर्वताची रांग पसरली आहे. अॅन्टीटॉरस पर्वतांत पुष्कळ ठिकाणीं, शुध्द कोळसा करतां येणाऱ्या द्रव्यांचें प्रस्तरीभूत अवशेष सांपडतात. टॉरसमध्यें चुन्याच्या दगडाच्या खाणी आहेत.

ह वा पा णी. - डोंगर सपाटीवरील हवा हिंवाळयांत अतिशय थंड आणि उन्हाळयांत अति उष्ण असते. उत्तर किनाऱ्याकडे थंडी अतिशय असते. पूर्व भागांतील हवा समशीतोष्ण असते. दक्षिणेकडे उन्हाळा कडक असून हिवाळा साधारण असतों. पश्चिम किनाऱ्यावरील हवा शीतोष्ण असते.

उ त्प न्न - आशिया मायनरमध्यें खनिज पदार्थ अतिशय आहेत. तुरटी, अज्जन, तालस, असबस्ट, क्रुम, कोळसा, तांबें, टाकणखार, कुरुंद, खळ करण्याची माती, सुवर्ण, लोखंड, शिसें, चुंबकीय लोह, मंगल, पारा, निकल सैंधव, चांदी, गंधक, जस्त वगैरे.

झा डें व न स्प ति. - पाईन वृक्ष, देवदारः सीडर नांवाचे वृक्ष वाळुंजीचीं झाडें, हिंवर, अंजीर, आलिव्ह, चेस्टनट नांवाचीं झाडें, नारिंगे, निवडुंग, द्राक्षे सफरचंद चेरी नांवाचीं झाडें, ईडलिंबू, ऊस, समरमस्तकी, गहुं, खाद्यधान्यें, कापूस, ज्येष्ठमध, अफू, तांदूळ, केशर, सालंमिश्री, तंबाखू, रेशीम, पिंवळया बेरी, वगैरे.

प्रा णी. – क्रूर पशुः - अस्वल, डुकर, हरीण, गॅझेला, कोल्हा, चित्ता, लांडगा, रानटी मेंढया वगैरे. पाळीव जनावरें - म्हशीं, उंट, खेंचर, मेंढया, घोडा, बैल.

प क्षी. - विलायती बगळे, माळटोक, गरुड हंस, तित्तिर ग्राऊज, पाणकोळी, कृकणपक्षी, करकोंचा, राजहंस.

उ द्यो ग धं दे - सतरंज्या, रग, कापूस, तंबाकू आणि रेशमी कापड, साबण दारू आणि कमावलेलें कातडें.

नि र्ग त मा ल.- धान्यें, कापूस, सरकी, फळफहावळ (वाळलेलीं) औषधी, फळें, मायफळ, मका, सुपारी, आलिव्ह तेल, अफू, तांदूळ, तीळ, शिलापुष्प, इमारती लांकूड, तंबाखू, वालनटवृक्षाचें लांकूड, पिंवळया बेरी, मद्यें, सतरंज्या, सूत, रेशमाचे कोसले, कातडें, कमावलेलें कातडें, रेशीम, ब्लँकेट, मेणबत्ती. लोंकर, जळवा, पाळीव जनावरें, खनिज द्रव्यें इत्यादि.

आ या त मा ल. - बुंद, कापड, सुती, माल, चिनी मातीचीं भांडी. कांचेचें सामान, फीत, दोरा, सुया, सुताच्या गुंडया, लोखंडी सामान, तागाचा कपडा, काडयाच्या पेटया, पेट्रोल, मीठ, साखर, लोकरीचा माल.

द ळ ण व ळ ण सा ध नें. - पक्के रस्ते थोडे आहेत. लोहमार्ग - (१) हैदरपाशापासून अंगोरापर्यंत (२) मूदानिया ते ब्रूसा. (३) एक्सेशेर ते बलगर्लींपर्यंत (४) स्मर्ना ते आफियम करहिसारपर्यंत (५) स्मर्ना ते दिनशेरपर्यंत (६) मर्सिना ते अदनापर्यंत ह्याशिवाय इतर रेल्वे आहेत.

मा न व जा ती. - ह्या देशांतील मूळ लोक कोण होते ह्याचा पत्ता मुळींच लागत नाहीं. कारण ह्या देशावर पूर्व आणि पश्चिम ह्या बाजूंनीं स्वाऱ्या होत होत्या. यावेळीं जित लोक पळून जात असत किंवा जेत्यांमध्यें मिसळून जात. या खेरीज यांच्या मूळ वंशाचें ज्ञान न होण्याचें कारण म्हणजे निरनिराळया जातींचे आणि धर्माचे लोक तेथें येऊन रहात असत. प्रथम ग्रीक, नंतर ख्रिस्ती मुसुलमान, नंतर मेंढपाल वगैरे येऊन गेले. साधारणतः येथील लोक वस्तीचे तीन भाग करितां येतील ते मुसुलमान, ख्रिस्ती, आणि यहुदी हे होत. त्यांपैकी मुसुलमानांसंबंधी कोष्टक खालीलप्रमाणें आहे.

मुसुलमानः - कॅपॅडोशिया-अनार्य; गॅलेशिया-गॅलिक; पश्चिम आणि वायव्य भाग केरियन व लीशियन; काळया समुद्राच्या किनाऱ्यावरील-बिथ्रिया पॅफ्लेगोनिया व पॉटस यांतील आलेल्या जाती अंगोरा, सिवस-कुर्दःबोधाझ केनीच्या पूर्वेस-किझिलबश उर्फ शिया पंथाने तुर्क; सायलेशियाचा सपाट प्रदेश-नोसैरिस, अंगोरा व अदना तुर्कोमन; अॅन्टीटॉरस-अवशर; अंगोरा आणि ब्रूसा; तार्तर, कोनिया युरुक, ऐदिन-खेंपी व तख्तजी.

वरील सर्व जाती मुसुलमानी असून वर दिलेल्या जिल्ह्यांत किंवा ठिकाणीं रहात असतात. शिवाय इतर भटकणाऱ्या जाती पुष्कळ आहेत.

ख्रि स्तीः - स्मर्ना आणि पॅम्फिलिया यांत बरेचसे ग्रीक लोक आहेत. या देशांतील कांही ग्रीक लोक पूर्वी तेथें आले आणि कांही बायझन्टाइन राज्याचे रहिवाशी म्हणून ग्रीक बनले. पश्चिम किनाऱ्याच्या बाजूला रोमन भाषा आणि दक्षिण किनाऱ्यावर तुर्की भाषा प्रचारांत आहेत. स्मर्नाजवळ बऱ्याच ग्रीक वसाहती आहेत. तसेंच मोठमोठया शहरांत आर्मेनियन वस्ती आहे.

यहुदी लोकः - स्मर्ना, ऱ्होडस, ब्रूसा, बॉस्परस आणि इतर पश्चिमेकडील शहरें ह्यांत आढळतात. जिप्सी लोकहि बरेच आहेत.

इ ति हा स. - पूर्वी हिटाइट अथवा श्वेत सिरियन लोक आणि इतर अनार्य जाती बोघाझ केइ आणि आसपासचा प्रदेश येथें रहात असत. यांचे वंशज हल्ली देखील कॅपाडोशियाच्या खेडयापाडयांत दिसतात. ख्रिस्त पूर्व ११ किंवा १२ व्या शतकांपूर्वी आर्यन लोक यावयास लागले त्यावेळीं त्यांनी प्रथम फ्रिजिया येथें राज्य स्थापन केलें अशी माहिती दगडी गनोरे, किल्ले आणि ग्रीक दंतकथा यांवरून कळतें. नंतर ९ व्या किंवा ८ व्या शतकांत सिमेरी लोकांनीं अर्मेनियामधून स्वारी करून आर्यन् लोकांचा मोड केला. त्यानंतर लिडीयाचें राज्य उदयास आलें. परंतु हें राज्य सिमेरी लोकांच्या दुसऱ्या स्वारीनें लयास गेलें. या लुटारू लोकांनां अल्याटीस यानें हांकून लाविलें ख्रिस्त (पूर्व. ६१७). या राजानें बराच राज्यविस्तार केला परंतु हा सर्व प्रांत पुढें इराणच्या हातीं लागला (ख्रि. पू. ५४६) इराणच्या सत्तेखालीं लिडियाचे राज्याच्या बंदोबस्ताकरितां चार भाग झाले, आणि ग्रीक वस्तिचा भाग ग्रीक लोकांकडे, आणि इतर वस्तीचा भाग त्या त्या वस्तीच्या लोकांकडे सोंपविण्यांत आला होता. परंतु सायरस यानें इराणवर स्वारी गेली त्यावेळीं तेथील ग्रीक रहिवाशी सायरसला मिळाले (ख्रि.पू. ४०२). नंतर त्याच्या पुढील शतकांत (ख्रि. पू. ३३४) अलेक्झान्डरनें आशियामायनरवर स्वारी केली (अलेक्झान्डर पहा). अलेक्झान्डरच्या निधनानंतर सेल्यूकस ह्याच्याकडे सर्व आशियामायनर आला, परंतु हा राजा दुर्बल असल्यामुळें देशाचे निरनिराळे भाग स्वतंत्र झाले. ख्रि. पू. २७८-२७७ च्या सुमारास गॅलिक जातींनं मध्य आशियामायनर येथें राज्य स्थापिलें. आणि सर्व स्वतंत्र भाग आपल्या साम्राज्याखालीं आणलें. परंतु ख्रि. पू. १८९ मध्यें मॉनलिअस यानें या जातींचा पराभव केल्यामुळें सर्व देश पर्गामम याच्या स्वामित्वाखालीं आला.

आशियामायनर मधील बेबंदशाहीचा फायदा घेऊन रोमन लोकांनीं पॉम्पे याच्या नेतृत्वाखालीं हा देश जिंकून बरीच वर्षे राज्य केलें आणि साम्राज्य काळांत सर्व आशियामायनरभर ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला.

बरींच वर्षें शांततेचा उपभोग घेतल्यामुळें तेथील लोकांमध्यें पूर्वीचे शौर्य राहिलें नाहीं. त्यामुळें इ. स. ६१६ ते ६२६ मध्यें इराणी सैन्याला कोठेंहि अडथळा झाला नाहीं. त्यांच्या मागून अरबलोक आले. परंतु १० व्या शतकांत अरब लोकांनां सेल्जुक तुर्क लाकांनीं हांकून लाविलें. १२४३ पर्यंत सर्व प्रांत मोंगोल लोकांच्या हातीं आला, आणि तेथील सुलतान परतंत्र बनले. ही परतंत्रता फक्त औपचारिकच होती. कारण १३०७ मध्यें रुमचा सुलतान वारल्यानंतर त्याच्या प्रांतांतील तुर्कोमन सुभेदारांनीं मोंगल लोकांना घालवून दिलें. परंतु त्या सुभेदारांमध्येंच कलह उपस्थित होऊन शेवटीं ब्रूसाच्या ओस्मान्ली तुर्कांनीं सर्व सत्ता बळकाविली. इ. स. १४०० मध्यें सर्व आशियामायनर सुलतान बायाझिद पहिला याच्या सत्तेखालीं होतें, परंतु १४०२ मध्यें तैमुरलंगानें त्यास कैद केलें. तैमूर वारल्यानंतर ओस्मान्ली तुर्काचें वर्चस्व पूर्ववत् स्थापलें जाऊन दुसरा महमद (१४५१-१४८१) यानें करमानिया आणि ट्रेबिझान्ड हे प्रांत आपल्या राज्यास जोडले. यानंतर आशियामयनरचा इतिहास म्हणजे तुर्की साम्राज्याचा इतिहास होय. पण यांतहि एक मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे (१८३२-३३) इजिप्तच्या इब्राहिम पाशाची स्वारी होय. वरील मोंगलांच्या स्वारीमुळें आशियामायनरमध्यें ख्रिस्ती धर्म व इतर ज्या कांही पाश्चात्य सुधारणा झाल्या होत्या त्यांचा समूळ उच्छेद झाला. हल्ली रेल्वे वगैरे बांधणें चाललें आहे. पाश्चात्य सुधारणेचा जोरानें प्रवेश होत आहे. आशिया संकुचित अर्थानें एजिअनच्या पूर्वेस १९०८ सालीं झालेल्या तुर्की राज्यक्रांतीमुळें व पुढील सालीं झालेल्या आर्मेनियनांच्या कत्तलीमुळें, आशिया मायनरच्या राजकीय परिस्थितींत मोठमोठया घडामोडी सुरू झाल्या. १९११-१३ च्या इटालोतुर्की व बाल्कन युध्दांत आशिया मायनरच्या किनाऱ्यावरील बेटें आटोमन साम्राज्याच्या हातांतून निसटली. १९१४-२१ च्या महायुध्दात खुद्द साम्राज्यच संपुष्टांत येऊन त्याचें बहुतेक आशिया मायनरमध्ये राज्य करणारे ''आनाटोलिया'' असें तुर्की संस्थान बनलें. आनाटोलियाच्या तुर्की राष्ट्रीय सरकारनें सेव्हरसच्या तहाच्या अंमलबजावणीला सशस्त्र विरोध केला. अलीकडे सत्ताकेंद्र ''अंगोरा'' झालें. ['अंगोरा' मेसापोटोमिया, आर्मेनिया वगैरे वरील स्वतंत्र लेख पहा.]

[संदर्भग्रंथ - बाक्ले-राइड थ्रु आशियामायनर अँड अर्मेनिया; चँड्लर ट्रॅव्हल्स इन आशियामायनर व ग्रीस; मसेरा एक्सकव्हेशन इन आशिया मायनर; चाइल्डस-ऑन फूट अॅक्रास आशिया मायनर; आइन्सवर्थ-ट्रव्हल्स अॅन्ड रीचर्सेस इन आशियामायनर; एडि-न्यू ईरा इन आशिया मरे-हेडबुक ऑशिया मायनर; रम्से-सिटीज अँड बिशप्रिक्स ऑफ फ्रीजिया (१८९५);  इंप्रेशन ऑफ टर्की (१८९८); ब्यूफर्ट - करमेनिया (१८१७); स्प्रॅट अॅन्ड फोर्स - ट्रॅव्हलस इन लीशिया (१८४७) डेव्हीस - लाइफ इन आशियाटिक टर्की (१८७९)]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .