प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

आर्यशूर - शूर किंवा आर्यशूर हा बराच प्रसिध्द कवि असून हा जरी बराच उत्तरकालीन दिसतो तरी बहुधा अश्वघोषाच्या संप्रदायांतील असावा याच्या जातकमालेची भाषा व रचनापध्दति अगदीं सूत्रालंकाराच्या पध्दतीसारखीच आहे. परंतु ''जातकमाला'' हें वास्तविक एका समूहाचें नांव आहे. कित्येक कवींनीं जातकमाला लिहिल्या आहेत; म्हणजे त्यांनीं निवडक जातकें खुबीदार गद्यपद्यात्मक भाषेंत पुन्हा लिहून काढिलीं आहेत. आर्यशूरानेंहि नवीन गोष्टीं लिहिण्याची तसदी घेतली नाहीं; ह्यानें जुन्याच गोष्टी सुंदर खुबीदार भाषेंत पुन्हा: कथन केलेल्या आहेत. यांतील गद्य व पद्य काव्यदृष्टया उत्कृष्ट व शुध्द असून त्यांत कृत्रिमतेपेक्षां खुबीदारपणा अधिक दिसून येतो. ज्याप्रमाणें धर्मोपदेश करितेवेळीं भिक्षूंनां प्रवचनाच्या उपयोगासाठीं जातकांची योजना झालेली आहे. त्याचप्रमाणें धर्मप्रचारकांसाठीं जातक मालेची योजना झालेली असावी. तथापि हा कवि बहुधा राजदरबारी धर्मोपदेशाचें काम करीत असल्यामुळें संस्कृत काव्य ज्यांनां पूर्णपणें समजत असे अशा दरबारच्या मंडळींत धर्मोपदेश करित असलेल्या भिक्षूकडेच फक्त या कवीचें लक्ष होतें. जातकमाला या ग्रंथांत चौतीस जातकें असून ती चरियापिटकांतील पस्तीस जातकांप्रमाणेंच, बोधिसत्वाच्या पारमितांचें ज्ञान करून देण्यासाठीं लिहिलेलीं आहेत. बहुतेक सर्व कथानकें जातक ग्रंथामध्यें आलेलीं असून, बारा कथानकें चरियापिटकांत आलेलीं आहेत. पालिजातकसमुच्चयांत ज्या थोडया गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. त्यांपैकीं, एक 'क्षुधापीडित व्याघ्री आपल्या पिल्लांनां खाऊन टाकण्याच्या बेतांत आहे. असें पहातांच तिला अन्न पुरविण्यासाठीं बोधिसत्त्वानें स्वतः आपला प्राण दिला' ही पहिली गोष्ट आहे. ही लाक्षणिक गोष्ट येथें थोडक्यांत देतो.

''पूर्व जन्मीं गुरूनें सर्व प्राण्यांवर अत्युत्कट व निःस्वार्थी प्रेम दाखवून सर्व प्राण्यांच्या जीवितांमध्यें तो स्वतः गढून गेला होता. म्हणून बुध्दगुरूवर आपण अतिशय प्रेम केलें पाहिजे. नंतर, उदाहरणार्थ, गुरूच्या पूर्व जन्मांतील एक खालील अद्भुत कृत्य सांगितलेलें आहे. ज्यानें आपल्या कुशाग्रबुध्दीनें व सद्गुणानें आपल्या गुरूचें समाधान केलें, जो सद्गुणनिरीक्षणामध्यें पारंगत होता व जो तीन रत्नांची पूजा करीत असे त्या माझ्या पूज्य गुरूनें त्या अद्भुत कृत्यांची तारीफ केलेली आहे. आपल्या विलक्षण वचनांप्रमाणें, देणग्या देऊन, प्रेमयुक्त भाषणकरून, मदत करून व सहज स्फूर्तीच्या योगानें व प्रेमाच्या योगानें उत्पन्न झालेलीं अशीं इतर दयायुक्त निर्दोष कृत्ये करून त्या वेळीं बोधिसत्त्वानें (जो हल्ली गुरू जाहे) सर्व जगतावर उपकार केले; अतिशय विद्वान, कर्तव्यनिष्ठ, सदाचाराबद्दल प्रसिध्द असलेल्या ब्राह्मण कुटुंबात त्यानें जन्म घेतला.'' तो मोठा झाल्यावर त्यानें सर्व कलांमध्यें व शास्त्रांमध्यें मोठें प्राविण्य मिळविलें. त्याला मोठी संपत्ति मिळून मानमरातबहि मिळाले. परंतु संसारामध्यें आनंद न मानतां लवकरच त्यानें एकांतवास पत्करिला. अरण्यामध्यें तो धर्मपरायण यति होऊन राहिला. एके दिवशीं एका शिष्याला बरोबर घेऊन तो टेकडयांवर हिंडत असतां निःशंकपणें दूध पिण्यासाठीं जवळ आलेल्या आपल्या पिल्लास क्षुधापीडित अशी एक तरुण व्याघ्री एका गुहेमध्यें खाऊन टाकण्याच्या बेतांत आहे असें त्याच्या दृष्टीस पडलें.

''ज्याप्रमाणें धरणीकंपाच्या वेळीं नगराजहि कंपायमान होतो, त्याप्रमाणें स्वतः शूर असूनहि आपल्या शेजारच्या प्राण्यांच्या दुःखाबद्दल कळवळा येऊन बोधिसत्त्वालाहि तो प्रकार पाहून भीति वाटली.

स्वतःवर मोठें संकट आलें असतां दयाळु लोक धिम्मेपणानें वागतात, परंतु दुसऱ्यावर लहानसें संकट आलें असतांहि ते कंपित होऊन जातात हें आश्चर्यकारक आहे.''

नंतर केवळ एकांत पाहिजे या निमित्तानें त्यानें आपल्या शिष्यांस मांस आणण्यासाठीं पाठविलें; कारण, त्या वाघांच्या पिलांचा जीव वाचविण्यासाठीं व व्याघ्राच्या भक्ष्यस्थानीं पडण्यासाठीं त्या कडयावरून उडी टाकण्याचा त्यानें अगोदरच निश्चय केला होता. आपला देह दुसऱ्याला अर्पण करण्याशिवाय या निरर्थक नश्वर देहाचा दुसरा कांहीं एक उपयोग नाहीं, हें जाणून त्यानें हा निश्चय केला होता. शिवाय असें केल्याने जगांत सत्कृत्य करूं इच्छिणाऱ्यांस प्रोत्साहन मिळेल, स्वार्थसाधु लोकांची मानखंडना होईल, सत्कर्म करणाऱ्यास स्वर्गाचा मार्ग दाखविल्यासारखें होईल, व आपल्या स्वतःला तात्काल उत्कृष्ट आत्मप्रबोधन होईल; असें त्यास वाटत होतें; त्याला याशिवाय कांही एक नको होतें.

''महत्त्वाकांक्षेसाठी, कीर्तिसाठीं स्वर्गांतील सुखासाठीं, सार्वभौमत्व मिळविण्यासाठीं किंवा मला निरंतर मुक्ति मिळावी यासाठींहि मीं हे कृत्य करीत नसून फक्त माझ्या शेजारच्या कल्याणासाठीं मीं हें करित आहें अशी वस्तुस्थिति असल्यामुळें, जगांतील सर्व दुःखाचा परिहार करण्याचें व ज्याप्रमाणें सूर्य नेहमीं प्रकाश देऊन अंधःकार नाहींसा करितो त्याप्रमाणें उध्दार करण्याचें माझ्या नशीबीं असो''

असें म्हणून त्यानें गुहेंत उडी टाकिली. त्या आवाजाच्या योगानें व्यांध्रीचें लक्ष्य तिकडे जाऊन तिनें आपल्या पिल्लास सोडून दिलें, व बोधिसत्त्वाला खाऊन टाकण्यासाठीं तिने त्याच्यावर झडप घातली; तो शिष्य परत आल्यावर त्याच्या दृष्टीस जेव्हां हा देखावा पडला तेव्हां त्याला अत्यंत कळवळा येऊन त्यानें त्या महात्म्याची ज्यांत स्तुती आहे असे कांही श्लोक म्हटले शिल्लक राहिलेल्या अस्थींवर, पुष्पमाला, रत्नें वस्त्रें व चन्दन टाकून, मनुष्यें, गंधर्व व देव यांनीं त्याची वाहवा केलीं. दुसऱ्या कित्येक कथानकामध्येंहि बोधिसत्त्वाच्या अमर्याद दयाळूपणाचें वर्णन केलें आहे.

त्यावेळीं हिंदुस्थानांत विशेष लोकप्रिय व बऱ्याच प्रचलित असलेल्या ग्रंथांपैकीं एक अशी इत्सिंगानें जातकमालेची स्तुती केली आहे. अजिंठयाच्या लेण्यातील चित्रामध्यें, जातक मालेंतील कथासंबंधीं चित्रें असून समर्पण लेखामध्यें आर्य शूरानें केलेले श्लोक आहेत. प्राचीन लिपिविद्येप्रमाणें, हे खोदीव लेख इसवी सनाच्या सहाव्या शतकांतील असावेत. ज्याअर्थी आर्यशूराच्या दुसऱ्या एका ग्रंथाचें इ. स. ४३४ त चिनी भाषेंत भाषांतर झालें होतें त्याअर्थी हा कवि बहुधा इसवी सनाच्या चौथ्या शतकांत होऊन गेला असावा.

[संदर्भ वाङ्मय-विंटरनिझ-हिस्टरी ऑफ इंडियन लिटरचेर (बौध्दकाळ). जातकमाला-हा खर्डाओ. सीरीजमध्यें प्रो. कर्ननें प्रसिध्द केली आहे. हिचें स्वेयरनें भाषांतर केलें आहे. (लंडन, १८९५).]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .