प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

आरारूट - आरारूट हें दोन जातीचें आहे. एक जात हिंदुस्थानात पैदा होते. तीस करकुमा, अंगुत्ति, फोलिआ हीं नांवें आहेत. दुसरी वेस्ट इंडीझ व अमेरिकेंतील उष्ण प्रदेशांत होत असलेली. पहिल्या जातीसंबंधानें माहिती प्रथम दिली आहे.

या झाडाला तिखुर, तिकार, तंकिर, तवकिर, अरारुट-के-गड्डे, अरारूट-किशंगु, कुवा इत्यादि नांवें आहेत. संस्कृतांत तवक्षीर हें नांव आहे.

बंगालचा डोंगराळ प्रदेश, मुंबई व मद्रास यांचें दरम्यान असणाऱ्या प्रदेशांत व हिमालयाच्या वायव्येकडील प्रदेशांत हीं झाडें होतात. हीं झाडें विशेषेंकरून मध्यप्रांतांत व त्यांतल्या त्यांत गोदावरी जिल्ह्यातील उत्तरेकडील प्रदेशांत विपुल होतात रायपूर व मलबार येथें यांच्या मुळयांचा मोठा व्यापार आहे. कोचीन व त्रावणकोर येथें याच्या रानटी जातीच्या मुळापासून आरारूट काढतात.

मद्रास प्रांतांत यांचीं पिलें काढून ती वर्षाॠतूच्या शेवटीं लावितात. जानेवारींत यांचीं कापणीं करितात. या पिकाला उन्हाळयांत मधून मधून पाणी द्यावें लागते. याचे कंद खणून काढावे लागतात. मद्रासमधील सैदापेठ येथील सरकारी शेतांतील प्रयोगावरून एका एकरामागें ३९४४ पौंड कंद किंवा ४९३ पौंड सत्त्व निघतें असें समजतें. पीठ करितानां कंद स्वच्छ धुवून वरील माती काढून टाकतात, आणि त्या नंतर ते कांदे कुटून त्याचा बलक करितात व तों बलक थंड पाण्यात कुसकरून धुतात. येणेकरून पाणी दुधासारखें होतें. तें पाढरें पाणी चाळणींतून मोठाल्या भांडयांत गाळून ठेवतात. व तसेंच कांहीं वेळ ठेवल्यानें तळाशीं पांढरा सांका बसतो. वरील निवळ पाणी ओतून टाकतात व त्यांत पुन्हां पाणी घालून कुसकरतात व संथ रांहू देतात. वरील पाणी ओतून टाकल्यावर खालीं राहिलेल्या सांका पत्र्यावर पसरून वाळवितात. वाळून तयार झाला म्हणजे तेंच तवकीर होय. तवकील फारच पाढरें व तकतकीत असतें. व तें बोटांत धरून दाबलें असतां कुरकुर असा आवाज निघतो. ५० शेर ताजा कांदा किंवा गड्डे घेतले असतां त्यापासून फारतर ८।१० शेर तवकीर निघतें. बर्म्यूडा बेटांतलें तवकीर श्रेष्ठ समजलें जातें. तवकीर हलकें व सहज पचणारें असल्यामुळें मुलास व आजारी माणसास देतात.

अमेरिकेतील मूळरहिवासी लोकांस बाणापासून किंवा दुसऱ्या शस्त्रापासून जखम झाली असतां या झाडाचा चीक लावीत. म्हणून या मुळास आरारूट अशी संज्ञा प्राप्त झाली आहे.

उष्णतेपासून तोंडास चट्टे पडल्यास तवकील लावून लाळ गाळींत जावीं. पित्तावर तवकील तुपात घालून खावे. मुलाचीं शक्ती वाढण्यास - दुधात घालून शिजवून पातळ लापशी तयार करावी व तींत थोडी खडीसाखर घालून पाजावी. रक्तप्रदरावर, तवकीर, राळ, व गेरू यांचें चूर्ण तुपाशी द्यावें असें म्हणतात.

आरारूटचें झाड साधारणपणें हळदीसारखें दिसतें. पण पानांचा रंग मात्र थोडा जास्त हिरवा गार, काळया झाकीवर असतो. याला हळदीसारखीं जमीनींत पांढरीं मुळें येतात. त्यांतून सत्त्व काढितात. हें पीक मध्यम काळया जमीनींत चांगलें पोसतें. जमीन चांगली तयार करून दर एकरी सुमारें १०।१५ गाढया शेणखत द्यावें व शेतांत दीड फूट अंतरानें सऱ्या पाडाव्या व नंतर १०x१० असे वाफे करावे. जमीन सपाट असल्यास अरुंद व लांब वाफोळया पाडाव्या. सरींत नऊ इंच अंतरानें मुळाचे तुकडे करून लागण मे महिन्यांत करावी. या पिकाला दोन चार खुरपण्या द्याव्या लागतात. पाणी आठ दहा दिवसांनीं देत जावें. पीक नऊ दहा महिन्यांनीं म्हणजे डिसेंबर जानेवारींत काढण्यास तयार होतें. पिकाची निगा राखल्यास उत्पन्न बरें येतें. भडगांव (खानदेश जिल्हा) येथें सरकारी शेतांत १८८८-८९ सालीं दर एकरी ६७५० पौंड मुळयांचें उत्पन्न येऊन त्याचें ९०० पौंड सत्त्व निघालें, असें प्रसिध्द झालें आहे.

आरारूटची अरोरूट बर्म्यूडा ही एक अगदीं निराळी जात असून तिचें मूलस्थान अमेरिकेंतील उष्ण प्रदेश व वेस्ट इंडिझ बेटे हीं आहेत. ह्याच जातीची लागवड हिंदुस्थानांतहि होते. हिंदी आरारूटापेक्षां हे अगदीं उत्तम दर्जाचें व अस्सल समजलें जातें.

ला ग व ड - २ फूट अंतरावर ३ किंवा ४ इंच खोलीचे खड्डे घेतात. व या खड्डयांत मे महिन्यात आरारूटचीं मुळें लावून वर माती टाकून तो झांकून टाकतात. झाडाची रोपें तयार झाल्यावर बटाटयाच्या पिकाप्रमाणेंच या झाडास गड्डे किंवा कांदे येतात. त्यापासून आरारूट तयार करतां येतें. या पिकास चांगली खताळ जमीन लागत असून पाण्याचा पुरवठा लागतो. परंतु पीक खणून काढण्याच्या पूर्वी एक महिना दोन महिने पाणी देण्याचे बंद ठेवावें. कटक, नडीआद या जिल्ह्यांत पुष्कळ पीक होतें. वरील झाडाचीं पानें गळून पडावयास लागलीं म्हणजे जमिनीचें खालीं गड्डे तयार झाले असें समजावें दर एकरीं सहापासून सात टन गड्डे निघतात. कधीं बारा टनपर्यंत पीक निघतें.

व्यापारः - आरारूटचा व्यापार हिंदुस्थानांत बराच मोठा आहे. कधीं कधीं उत्तर हिंदुस्थानांत आरारुटांत मक्याच्या किंवा इतर सत्त्वाची भेसळ करतात. त्यामुळें निर्भेळ आरारूट मिळणें जरा मुष्किलीचें झालें आहे. [मोडक कृत पदार्थवर्णन]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .