विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आप्री - श्रौतकर्मांतील पारिभाषिक शब्द. ॠग्वेदांतील कांहीं सूक्तांनी ही संज्ञा आहे. या संज्ञेचा उल्लेख तैत्तिरीय संहितेंत (५.१,८) आला असून तेथें त्यासंबंधीं एक आख्यायिका आहे ती अशीः- ''प्रजा उत्पन्न करून प्रजापतिश्रमित झाला असतां आप्रींच्या योगानें आपले श्रम नाहीसे होतील असें वाटल्यावरून त्यानें प्रथम आप्रीसंबंधीं याग केला.'' या कारणावरून पशुयज्ञामध्यें प्रथम आप्री मुक्तांतील प्रत्येक ॠचा पठण केली जाऊन प्रयाज नामक याग होतो. 'आप्री सूक्ताचें ॠग्वेदांतील स्थान आणि आप्रींचा गोत्रप्रवरांशीं, नराशंस व तनूनपात् या देवतांशीं व त्यांच्या अनुषंगानें आकाशांतील सप्तर्षीशीं संबंध यासंबंधीं सविस्तर विवेचन पूर्वी ( विभाग तीन पृष्ठ ४९१ येथें) केलें आहे.