विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आकृति - स्वायंभु मनूच्या तीन कन्यांतील पहिली वरुचि ॠषीची स्त्री. हिला यज्ञ आणि दक्षिणा असें पुत्रकन्यारूप मिथुन झालें होतें. (भाग.स्कं.३ अ.१२)
(२) प्रियव्रत राजाच्या वंशांत जन्मलेल्या ॠषभदेवाच्या कुळांतील प्रसिद्ध जो विभु राजा, त्याच्या पृथुषेण नामक पुत्राची स्त्री. हिला नक्त नांवाचा पुत्र होता.
(३) उत्तानपाद राजाच्या वंशातील जो व्युष्ट नामक राजा, त्याची स्नुषा व सर्वतेजा(स)राजाची स्त्री. हिच्या पुत्राचें नांव चक्षु. तोच पुढें सहावा मनु झाला होता. (भागवत स्कं.४ अ.१३)