विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्कहल ( अल्कोहॉल्स ) संज्ञा : - अल्कोहॉल म्हणजे मद्यार्क. हा शब्द अरबी भाषेतील “अल= तो आणि कोहल = भुंग्यास लावण्याची पूड, या दोन शब्दांपासून झाला आहे. पुष्कळ शतकेंपर्यंत आल्कोहॉल हा शब्द अगदीं बारीक पूड या अर्थी वापरला जात असें पॅरॅसेल्सस आणि लिबॅव्हिअस यांनीं या शब्दाचा उपयोग कोणतीहि बारीक पूड या अर्थी केला असून ‘लिबॅव्हिअस’ यानें “अंज” ( अॅन्टिमनी ) पासून तयार केलेला “आल्कोहॉल” असें स्पष्ट म्हटलें आहे. तरी पॅरासेल्सस यानें “आल्कोहोल” शब्दाचा उपयोग बाष्पभावी ( उडून जाणारा-व्होलटाईल ) पदार्थ अर्थीहि या लेखांत केला आहे. या “बाष्पभावी” पदार्थाचा अर्थबोध करणारीं दुसरीं नांवे प्राचीन रसायन शास्त्रज्ञांस माहीत होती. जसेः- “एलिक्झिर ऑप लाइफ” (अमृत) हा शब्द युरोपांत १३ – १४ व्या शतकांत या अर्थीं प्राचारांत होत. आर्नोल्डस व्हिलॅनोव्हॅनस यानें. प्रथम पातन विधीनें (डिस्टिलेशननें) तयार केलेल्या दारूला हा शब्द वापरला. हल्लीं सेंद्रिय रसायनशास्त्रांत आल्कोहॉल हा शब्द वर्गवाचक म्हणून वापरला जातो. परंतु व्यवहारांत तो त्या वर्गांतील इथिल अल्कोहॉल म्हणून जें द्रव्य त्यासाठींच योजितात. आम्ही मराठींत अल्कोहॉलसद्दश अल्कहल ही संज्ञा केवल वर्गवाचकच ठेविली असून त्या वर्गांतील इथिल अल्होहॉल या द्रव्यासाठीं मद्यार्क हा साधा शब्द पसंत केला आहे. अल्कद्दल या मराठी शब्दाची व्युत्पत्ति पुढें दिल्या प्रामाणें लावतां येतें.-
“अल्क” हा धर्म असून “हला” म्हणजे मद्या या पासून अल्कद्दला शब्द करून त्या वरून “अल्कहलें” हा शब्द अल्कधर्म असणारीं मद्यें या अर्थी वर्गवाचक होतो.
सा मा न्य स्व रू प. – “अल्कहल” या शब्दानें पुष्कळ सेंद्रिय पदार्थांचा बोध होतो. या सर्व पदार्थोत बाह्यस्वरूपांत साम्य पाहिलें तर क्वचितच असतें परंतु त्या सर्व पदार्थात एक साधर्म्य आहे. हे सर्व पदार्थ “उत्कर्ब” (हायड्रोकार्बन) यांच्या घटनेंतील एक किंवा अधिक “उज्ज” चे परमाणू निःसार्य होऊन त्याऐवजी “उत्प्राणिल” “प्रउ” ह्या संघाचे तितकेच अणू येऊन झालेलें आहेत; यामुळें त्यांची घटना सारखीच आहे. या अल्कहलांची तुलना धातुंच्या उत्प्राणिदांशीं करतां येईल. उत्प्राणिदाप्रमाणें अल्कहलांत एक किंवा अधिक उत्प्राणिल संघ आहेत म्हणून ते तत्तुल्य आहेत असें नव्हें तर अल्कहल अम्लांशीं संयुक्त होऊऩ धातुंच्या उत्प्राणिदाप्रमाणें क्षार बनतात व पाणीहि तयार होतें. हें साम्य खालीं दिलेलीं दोन समीकरणें पाहिली असतां ताबडतोब ध्यानांत येईलः-
धातु द्विमूल्य (डाय व्हॅलंट) असला म्हणज त्याच्या उत्प्राणिदांत दोन उत्प्रामिल संघ (प्रउ) असतात, धातु त्रिमूल्य असला म्हणजे तज्जन्य उत्प्राणिदांत तीन उत्प्राणिल संघ असतात. त्याचप्रामाणें उत्कर्ब मूलक जर द्विमूल्य किंवा त्रिमूल्य असला तर त्यापासून तयार होणार्या अल्कहलांत दोन किंवा तीन उत्प्राणिल संघ (प्रउ) अनुक्रमें असतात
वर्गींकरण.- अल्कहलांचें वर्गींकरण आपणांस दोन रीतीनीं करतां येण्यासारखे आहे. एक अल्कहलांतील उत्प्रणिल संघाच्या संख्येवरून, किंवा दुसरें उत्प्रणिल संघ ज्या कर्ब परमाणूशीं संलग्न असतो त्याच्याशीं जोडलेल्या दुसऱ्या संचाच्या स्वरूपावरून. प्रकार पहिलाः - अल्कहलांत उत्पाणिल संघाची जितकी संख्या असेल त्या संख्येप्रमाणें त्यास एकोज्जिक (मोनोहायड्रिक) द्विउज्जक, (ग्लायकोलस) त्रिउज्जक (ग्लिसरोल्स) इ. अल्कहल म्हणतात किंवा काही ग्रंथकारांच्या मतांप्रमाणे त्यास अनुक्रमें एकाणुक (मोनो अटॉमिक) द्वणुक, त्र्यणुक अल्कहल असेंहि म्हणतात.
प्रकार दुसराः - वर्गीकरणाच्या दुसऱ्या तत्त्वाप्रमाणें, प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक असे तीन परस्परभिन्न प्रकारचे अल्कहल निष्पन्न होतात. पाराफिन क्षेणींतील पहिल्या चार उत्कर्बाच्या व त्यापासून बनणाऱ्या अल्कहलांच्या घटनादर्शक सारण्यांचे काळजीपूर्वक अवलोकन केलें असता या वर्गीकरणाचा अर्थ स्पष्ट होईल. या उत्कर्बाच्या घटनादर्शक सारण्या येणेंप्रमाणेः-
प्रत्येक उत्कर्बात कउ२ हा संघ अधिक असतो व दुसऱ्या उत्कर्बापासून प्रत्येक उत्कर्बाच्या टोंकाच्या कर्ब परमाणूस तीन उज्ज परमाणू व मधल्या कर्ब परमाणूस दोन उज्ज परमाणू जोडलेले असतात एवढें लक्षांत ठेवले असतां या चार सारण्या थोडक्यांत पुढें दिल्याप्रमाणें लिहितां येतील. कउ४; कउ३, कउ३, कउ३, कउ२, कउ३; आणि कउ३ कउ२, कउ२ कउ३ यांमध्ये टोकाच्या कर्ब परमाणूस चिकटलेल्या उज्ज परमाणूच्या जागीं (म्हणजे दुसऱ्या उत्कर्बापासून कउ२ या संघांत) प्रउ हें मूलक घातलें असतां कउ प्रउ (मिथिलअल्कहल) कउ३ कउ२ प्रउ (इथिलअल्कहल) वगैरे प्राथमिक अल्कहल बनतात. पहिल्या दोन उत्कर्बात मध्यगत कर्ब परमाणूच नसल्यामुळें त्यापासून दुसऱ्या कोणत्याहि प्रकारचा अल्कहल बनण्यास जागा नाहीं; परंतु तिसऱ्या उत्कर्बातील टोंकाच्या मध्यगत कर्बपरमाणूस चिकटलेल्या उज्ज परमाणूच्या जागीं प्रउ मूलक घालू अनुक्रमें कउ३ कउ२ कउ२ प्रउ हा प्राथमिक प्रोपिलअल्कहल व कउ३ कउ (प्रउ) कउ३ हा द्वितीयक प्रोपिल अल्कहल बनतो. चवथ्या उत्कर्बापासूनहि तिसऱ्याप्रमाणेंच प्राथमिक व द्वितीयक असे दोन अल्कहल बनतात. पण त्याचें कउ३(कउ३)
ही घटनादर्शक सारणी असलेलें आणखी एक समावयविक रूप आहे. या पदार्थापासून कउ३ संघांतील उज्ज परमाणूच्या जागी प्रउ मूलक घालून प्राथमिक अल्कहल बनतो; पण कउ संघांतील उज्जपरमाणूच्या जागीं प्रउ मूलक घातला असतां तृंतीयक अल्कहल प्राप्त होतो. यावरून कउ प्रउ हा द्वितीयक अल्कहालाच्या व क.प्रउ हा तृतीयक अल्कहलाच्या घटनादर्शक सारणींतील लाक्षणिक संघ आहे हें उघड होतें.
ती न प्र का र च्या अ ल्क ह लां च्या रा सा य नि क ध र्मा ती ल भे द - या तीन जातीच्या अल्कहलांचे प्राणवायूंशी जें भिन्न रासायनिक वर्तन घडतें त्यावरून या तिघांनां परस्परांपासून तत्काळ ओळखतां येतें. जर अल्कहलास हवेंत जोरानें उष्ण केलें किंवा पुष्कळ प्राणवायूच्या सान्निध्यांत जाळलें तर त्यापासून कर्बाम्ल व पाणी हे पदार्थ बनतात. परंतु अल्कहलांचे प्राणिलीकरण मर्यादित केलें किंवा क्रमानें वाढवीत गेलें तर अल्कहलांच्या जातींप्रमाणें भिन्नभिन्न परिणाम घडतात. प्राथमिक अल्कहलांवर प्राणिलीकरण करणाऱ्या रासायनिक पदार्थातील प्राणवायूंचे कार्य होऊन प्रथम प्रायोज्जिदें (आलिहाइड्स) आणि नंतर अम्लें किंवा कधीं कधीं ईथरचे क्षार बनतात व त्यात कर्बाचे मूळच्या इतकेच परमाणू असतात. द्वितीयक अल्कहलांचे प्रणिली करण झाल्यानें प्रथम प्रायोज्जिदें न बनतां कितनें बनतात आणि त्यात कर्बाचे मूळच्या इतकेच परमाणू असतात. या कितनाचें आणखी प्राणिलीकरण झालें म्हणजे एक किंवा अधिक अम्लें बनतात व त्यात कर्बाचे मूळच्याहून कमी परमाणू असतात. तृतीयक अल्कहलांचे प्राणिलीकरण झाल्यानें मूळच्या इतके कर्बाचे परमाणू असलेलीं प्रायोज्जिदें. कितनें किंवा अम्लें बनत नाहींत. जोरानें प्राणिलीकरण झाल्यास यांचे पृथभवन होऊन कधीं कितनें व कधीं अम्लें बनतात. परंतु यांत कर्बाचे परमाणू कमी असतात. (प्रायोज्जिदें व कितनें पहा) हे तीन अल्कहल परस्परांपासून ओळखण्याची एक रीति म्हटली म्हणजे तृतीयक अल्कहल २१८ श. (नफ्थालीनच्या उत्क्कथनांक) पर्यंत तापविला असतां त्याचें पृत्तरण होते; ३६० श. (अन्थासीनच्या उत्क्ज्ञाथनांक) पर्यंत उष्णमान द्वितीयक अल्कहलाचें पृथक्करण करण्यास पुरेसें होतें; पण प्राथमिक अल्कहलांवर उष्णतेचा काहींच परिणाम होत नाही.
अल्कहल तयार करण्याच्या साधारण रीती. – (१) क्षारजाचा (अल्किलचा) एक परमाणू असलेल्या उत्कर्बाच्या संयुक्त पदार्थांपासून त्यांतील क्षारजांच्या जागीं उत्प्राणिल (उप्र) नेऊन अल्कहल करतां येतात. क्षारज संयुक्त पदार्थांस -मुख्यत्वें अदिदांस – (आयोडाइडांस) नुसत्या पाण्याबरोबर १०० श पर्यंत उष्ण करून किंवा त्यावर रुप्याचें आर्द्र प्राणिद याचें (याची उत्प्राणिदाप्रमाणें क्रिया होते) कार्य करून अगर त्यास शिशांचे प्राणिद व पाणी यांबरोबर कढवून ही अदलाबदल करतां येते.
क्षारज संयुक्त पदार्थांस पालाश किंवा सिंधुदार्विता (अॅ्सिटेट)बरोबर उष्ण करून त्याचें रूपांतर दार्वम्ल ईस्टर (सेंद्रिय अम्ल व अल्कहल यांचा संयुक्त पदार्थ) मध्यें करावें आणि नंतर त्यांस पालाश उत्प्राणिदाबरोबर कढवून अल्कहल करणें सोयीचें असतें.
इथिलस्तंभिद पालाशदार्वित इथिलदार्विक ईस्टरपालास्तं.
(२) गंधकाम्लाच्या आम्ल ईस्टरांस पाण्याबरोबर कढवून त्याचें पृथक्करण केलें म्हणजे अल्कहल व गंथकाम्ल बनतात.
(३) प्रायोज्जिदें व कितनें यांवर उपजत उज्जाचें कार्य केल्यानें पहिल्यापासून प्राथमिक अल्कहल व दुसऱ्यापासून द्वितीयक अल्कहल बनतात. सिंधुपारद मिश्रण व जलमिश्रित गंकाम्ल किंवा दार्वम्ल यांपासून उज्ज उत्पन्न करावा. परतु लोहाचा बारीक चुरा व दार्वम्ल किंवा जस्ताचा चुरा व ग्लेशियल दार्वम्ल घेणें फार चांगलें. यांत प्रथम दार्विक इंस्टरें बनतात.
प्रोपिल प्रायोज्जिद उज्ज प्राथमिक प्रोपिल अल्कहल
४) जस्ताचा मिथिद (मिथाइड) किंवा इथिद (इथाइड) (२ अणू) यास बर्फानें शीत करून त्यांत अम्ल हरिद (१ अणु) थेंब थेंब मिळवून तें मिश्रण तसेंच शीत अवस्थेंत त्यास स्फटिकरूप येईपर्यंत कांहीं तास ठेविलें आणि नंतर त्यास साधारण उष्णमानावर दोन तीन दिवस ठेवून त्यांचे बर्फासारख्या थंडपाण्यानें पृथग्भवन केलें म्हणजे तृतीयक अल्कहल बनतो. पाणी याहून लवकर मिळविल्यास कितन बनतें. एकंदर रसायनकार्य तीन पायऱ्यांनीं घडतें. प्रथम जस्ताच्या संयुक्त पदार्थाच्या एक अणूचें कार्य घडतें.
वरील क्रियेनें जो संयुक्त पदार्थ बनतो त्यावर जस्ताच्या संयुक्त पदार्थाच्या दुसऱ्या अणूचें कार्य घडून एक स्फटिक रूप पदार्थ बनतो. परंतु त्याचें लागलेंच पाण्यानें पृथग्भवन होऊन असिटोन उत्पन्न होतो. तथापि बराच वेळ तसेंच राहिल्यास पुढील रासायनि क्रिया घडतेः-
आतां पाण्याचें कार्य होऊं दिल्यास पहिल्या पदार्थापासून तृतीयक अल्कहल बनतोः-
सामान्य धर्म - अल्कहल वर्गाचा सर्वसाधारण धर्म म्हटला म्हणजे ते उदासीन संयुक्त पदार्थ आहेत. तथापि त्यात थोडासा अनाम्ल (बेसिक) धर्म असतो. त्यांचें अनाम्लाशीं साम्य आहे ते हें कीं त्यांचे अनाम्लाप्रमाणेच अम्लाशीं संयोग पावून क्षारांत रूपांतर होतें व पाणी बनतें. पण उदासीनत्वाच्या बाबतींत त्याचें प्राण्याशींहि साम्य आहे. पाण्याप्रमाणेंच त्यांच्यावरहि सिंधु व पालाश या धातूंची क्रिया होतें व उत्प्राणिल संघातील उज्जाच्या जागी धातूचा परमाणू येऊन अल्कहलितें (अल्कोहॉलेट्स) म्हणून क्षार बनतात इतकेंच नव्हे तर पाण्याप्रमाणेंच हेहि कांही क्षारांचे घटक द्रव्य म्हणून असतात. त्यांचें प्राणिलीकरण (ऑक्सिडेशन) सहज होऊन त्यांतील उज्ज असंयुक्त होतो व या असंयुक्त झालेल्या उज्जाच्या जागीं प्राणाची सममूल्य संख्या कधीं कधीं निविष्ट होते किंवा कधीं कधीं होत नाहीं. अशा प्राणिलीकरणापासून जे पदार्थ तयार होतात ते प्रायोज्जिदें (ऑल्डिहाइड) किंवा कितनें किंवा अम्लें इत्यादि प्राणिलीकरण्याच्या स्वरूपाप्रमाणें असतात.
अल्कहलांच्या भौतिक धर्मात अणुगुरुत्वाप्रमाणें चढता क्रम असतो. यांचे कढण्याचे बिंदू (उत्क्कथनांक) अणुगुरुत्वाप्रमाणें वाढतात. प्रत्येक कउ२ वाढीला हा बिंदु सुमारें १० शनीं नियमानें वाढतो. तीच सरल सारणी (इंपिरिकल फॉर्म्युला) म्ह. तितकेच कर्बादि परमाणू असलेल्या प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक अल्कहलापैकी प्राथमिकांचा सर्वांत जास्त व तृतीयकांचा सर्वात कमी (उत्क्कथनांक) असतो, व ही गोष्ट जितकी समप्रमाणतां जास्त वाढते तितका हा अंक कमी होतो. या नियमास धरूनच आहे.