प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

त्यांची रहाणी.- शाक्य कुलांतील लोकांची उपजीविका तांदुळावर व दूधदुभत्यावर होत असे. हे लोक ज्या खेड्यांतून रहात तीं खेडीं या तांदुळाच्या शेतांभोंवतीं पसरलेलीं असत, व यांचे गुरांचे कळप भोंवतालच्या रानांत चरत. ह्या भोंवतालच्या जंगलावर शाक्य लोकांपैकीं सर्वांची सारखीच मालकी असे. प्रत्येक गांवामध्यें लहान लहान कारागीर असत. हे बहुधा शाक्य नसावेतसें वाटतें. सुतार, लोहार, कुंभार, इत्यादिकांचीं निरनिराळीं गांवें होतीं. ब्राह्मणांची खेंडी निराळीं असत, व यांचा उपयोग प्रत्येक घरगुती बाबीमध्यें हरघडी होत असे. उदाहरणार्थ, खोमदुश्श हें एक ब्राह्मणांचें खेडें होतें. यावरून ब्राह्मण त्या वेळेस वर्गस्वरूप राहिले नसून जातिस्वरूप पावले होते हें उघड आहे. बाजारांत कांहीं कांहीं किरकोळ दुकानें वगैरे असत; परंतु शेजारच्या राज्यांतील मोठमोठ्या शहरांतल्याप्रमाणें येथें बडे व्यापारी किंवा पेढीवाले असल्याचें दिसत नाहीं. हीं खेडी महावनांतील जंगलांत इतस्ततः पसरलेलीं होतीं. हें महावन पर्वताच्या पायथ्यापासून तो गंगातीरच्या प्रदेशापर्यंत पसरलेलें होतें. या सर्व कुलांचा शेजारच्या राजांनीं जेव्हा नाश केला, त्या वेळीं महावनांतील सर्व खेडीं लयास जाऊन तें पुन्हां एकच एक जंगल बनलें.

या जंगलांत चोर, दरोडेखोर, पळून आलेले गुलाम वगैरे लोक वेळोवेळीं येऊन रहात असत; परंतु खेड्यांपाड्यांतून दंगेधोपे झालेले मात्र कोठेंच ऐकुं येत नव्हते.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .