प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

त्यांची शासनपद्धति.- या कुलाचे राजकारणासंबंधाचे व न्यायप्रकरणाबद्दलचे सर्व व्यवहार संथागार नांवाच्या एका सभेमध्यें कपिलवस्तु गांवीं चालत असत, व अशा प्रसंगीं वृद्ध, तरुण सर्व लोक हजर असत.

शाक्य लोक आपला राजा निवडून नेमीत. ही निवडणूक कोणत्या पद्धतीनें होत असे, व निवडलेला अधिकारी आपल्या जागेवर किती दिवस असें हें समजण्यास मार्ग नाहीं. दरबार वगैरेच्या सभा भरत त्या वेळीं त्यांचें आधिपत्य हा स्वीकारीत असे; व ज्या वेळीं अशा सभा नसत त्या वेळीं हा कारभार चालवीत असे.

महावनांत न्यग्रोधारामामध्यें बुद्ध रहात असतांना कपिलवस्तु येथें एक नवीन सभागृह बांधण्यांत आलें. हा न्यग्रोधाराम कपिलवस्तूपासून फार दूर नव्हता. सर्व पंथांच्या भिक्षूंसाठीं येथें एक सार्वजनिक मठ होता. या नवीन सभागृहाचा प्रवेशसमारंभ गौतमाच्या हातून झाला. या समारंभाच्या वेळीं गौतमानें दिलेलीं वेदान्तपर व्याख्यानें आज उपलब्ध आहेत. त्यांमध्यें आनंद आणि मोग्गलान यांनीं दिलेलीं व्याख्यानेंहि आहेत.

अशींच आणखीहि कित्येक सभागृहें निरनिराळ्या गांवांत बांधण्यांत आलीं होतीं. या सभागृहांवर छायेसाठीं छपरें असत, परंतु यांच्या भोंवतालीं भिंती मात्र नव्हत्या. स्थानिक व्यवहाराबाबतच्या चर्चा लोकसभेपुढें एखाद्या वृक्षराजीमध्यें होत असत. पूर्वपश्चिम ५० मैल व हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेकडे ३० मैल एवढ्या प्रदेशांत शाक्य कुळांतले लोक रहात असत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .