प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ५ वें.
असुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.

हिटाईट लोकांचें कलाकौशल्य. - हिटाइट लोकांमध्यें कलाकौशल्याचा स्वतंत्र उगम झालेला दिसत नाहीं. त्यांनी बऱ्याच गोष्टी असुरियन लोकांपासून घेतल्या होत्या. हिटाइय लोकांच्या ज्या मूर्ती उपलब्ध आहेत, त्यांच्या आंगावरील पोशाख आणि मूर्तीची ठेवण या बाबतींत असुरियन लोकांचीच नक्कल केलेली दिसते. तथापि कोठें कोठे फरकहि आढळतो. उदाहरणार्थ हिटाइट आस्टार्टेची मूर्ति बाबिलोनच्या एस्टार सारखीच आहे तथापि हिटाइट मूर्तीला पंख आहेत. डिटाइट लोकांतील वर लेख कोरलेली अशी एक सिंहाची मूर्ति सांपडली आहे. ती मूळची मूर्ति हल्लीं कान्स्टांटिनोपल येथें असून तिचा ओतीव पुतळा ब्रिटिश म्यूझियममध्यें आहे. सिलिसयांत सापडणाऱ्या मूर्ती मात्र स्वतंत्र पद्धतीवर तयार केलेल्या आढळतात, पण त्या अधिक ओबडधोबड आहेत. या हिटाइट मूर्तीत आढळणाऱ्या विशेष गोष्टी म्हणजे स्त्रियांच्या डोक्यावर असलेली उंच टोपी आणि टोकें असलेले जोडे या होत. कॅपेडोशियांत हिटाइट लोकांचे बरेच अवशेष सांपडलेले आहेत. प्राचीन राजधानी बोगझकुइ येथें प्राचीन राजवाड्याचे अवशेष सांपडलेले आहेत त्यांचे असुरियांतील इमारतीशीं बरेंच साम्य आहे. नवीन संशोधनांत सांपडलेल्या राजवाडयाचेंहि असुरियांतील इमारतीशीं साम्य आहे परंतु राजवाडयाच्या दरवाजाजवळ एक स्त्रीमुखी सिंह (स्फिंक्स) ठेवलेला आहे, त्यावरून मिसरी कलेचे अनुकरण केले आहे असें दिसतें. पण असुरियन आणि हिटाइट यांच्या स्मारकाविषयक गोष्टींत असा फरक आहे कीं, असुरियन लोकांचीं स्मारकें राजांच्या गौरवपर आहेत आणि हिटाइट लोकांचीं स्मारकें पारमार्थिक व धार्मिक स्वरूपाचीं म्हणजे देवादिकांसंबंधाचीं आहेत. हिटाइट लोकांच्या स्मारकविषयक वस्तू कॅपॅडोशियांत आणि तारस पर्वताच्या दोन्ही अंगांना खडकामध्यें कोरलेल्या वगैरे बऱ्याच सांपडतात, त्यांवरून हें स्पष्ट दिसतें कीं ह्या अर्धवट सुधारलेल्या राष्ट्रांत कलाकौशल्याच्या बाबतींत स्वतंत्र पद्धतीचे कौशल्य प्रगट करण्याचें बुद्धिसामर्थ्य नव्हतें. त्याचप्रमाणें राजकीय बाबतींत इजिप्त आणि असुरिया यांचें वर्चस्व झुगारून देऊन स्वतंत्र राष्ट्र राखण्याचेंहि सामर्थ्य नव्हतें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .