प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ५ वें.
असुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.

हिटाइट आणि असुरियन लोकांचा संबंध. - इजिप्तनंतर हिटाइट लोकांचा ख्रि. पू. १११० पासून ७१७ पर्यंत असुरियन राष्ट्रांशीं संबंध आला. त्यांतील महत्त्वाच्या गोष्टी येणेंप्रमाणें:-ख्रि. पू. १११० हिटाइट उर्फ खट्टी या लोकांचा पहिला तिग्लथपिलेसर याने पराभव केला. ख्रि. पू. ८७२ त हिटाइट लोकांनीं तिसरा अशुर नझिरपाल याला खंडणी दिली. कारण त्यानें हिटाइट लोकांचे कांहीं राजपुरुष कैद करून  नेले होते. ख्रि. पू.? ८७६ त हिटाइट लोकांच्या एकेकाळी राजधानी असलेल्या कर्चेमिश शहरांत अशुरनझिरपाल यानें प्रवेश केला. ख्रि. पू. ८५४ हिटाईट लोकांची दमास्कसचा दुसरा बन-हदाद याचे बरोबर दोस्तीचा तह केला. त्यांचा कारकार येथें पराभव झाला आणि हिटाइट लोकांचीं बरीच लहान लहान संस्थानें असुरियन लोकांनीं आपल्या राज्याला जोडलीं. ख्रि. पू. ७१७ त हिटाइट लोकांच्या साम्राज्यापैकीं संगर हें एकच संस्थान स्वतंत्र स्थितींत उरलें होतें. या संस्थानचा राजा पिसिरिक यानें मोश्चिच्या मिटाबरोबर सख्य करून असुरियाला खंडणी देण्याचें नाकारिलें त्यामुळे असुरियन राजा दुसरा सार्गन यानें संगरावर स्वारी केली. व त्यांच्या कोर्चेमिश या राजधानींतील लोकांनां असुरियांत नेऊन त्या शहरांत असुरियन लोकांची वसाहत करविली याप्रमाणें असुरियन लोकांनीं हिटाइय लोकांचें शेवटचे संस्थान पूर्णपणें हस्तगत केल्यापासून हिटाइट साम्राज्याचा अंत झाला. ज्या असुरियन लेखावरून वरील ऐतिहासिक माहिती उपलब्ध होते त्यावरून हिटाइट लोकांचें राष्ट्र बरेच सुधारलेले होतें, आणि ख्रि. पू. १३व्या १४व्या शतकांत तें फारच भरभराटींत होतें या मिसरी लेखावरून होणाऱ्या ज्ञानाला अधिक पुष्टि मिळतें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .