प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.

''देव'', पूर्वदेव, मूरदेव, शिश्नदेव, पंचजन, शूर-देव, यातुधान, विश्वदेव, समुद्र, कोटि:- दिव्, देव्, देव (द्यव-द्याव, द्यु, द्यो, द्यौ, द्या-द्य) ही रुपें वैदिक असून दय्व् हें वैदिक कालापूर्वीचें आहे. थिओ, झेउ ही ग्रीक, देउ हें लॅटिन व दएव हें अवेस्तिक रुप आहे. सरमासूक्तांत दैव्य किंवा दैव असा शब्द आलेला आहे; त्याचा अर्थ साधारणपणें देव किंवा देवांसंबंधी असा आहे. दय्व् याचा मूळचा अर्थ देणगीचा मालक म्हणजे धनी व दास याचा अर्थ देणारा म्हणजे गुलाम असा असूं शकेल काय? ''असुरांचा आम्हां देवांकडून पराभर होवो'' (१०.१३,४). या वाक्यावरुन असें वाटतें कीं, वरील वाक्य उच्चारणारा देवांपैकीच होता. यावरुन असुर या शब्दाप्रमाणें, देव हा शब्द मनुष्यजातीच्या विभागाचा दर्शक आहे. अग्नीच्या मदतीमुळें दस्युंचे देवांपुढे कांहीएक चाललें नाही (३.२९,९). दस्यु हे मनुष्य प्राणी होते असें त्यांचे वर्णन आहे; देवांनी त्यांचा पराभव केला, यावरुन देवहि मनुष्य असावे असें वाटतें. हे देव अग्निपूजक होते. दस्यूंशी लढण्यासाठी मनुमनु जातीचा पुरुरवस् याची देवांनी मदत मागितली (१०.९५,८). ज्या अर्थी देवांनी पुरुरवस् याची मदत घेतली त्याअथी तेहि मनुष्यच असले पाहिजेत. पंचजना: हें नांव मनुष्यजातीला दिलेले आहे. व्रात (टोळी), सद्दं (रुप, रंग), मानुष् (मनुष्य) वगैरे शब्द वेदामध्यें आढळतात. मनुष्यप्राण्याच्या देशाला दिव् असें म्हणत: व पंचनामा: याबद्ल पंचदेवा: असेंहि म्हणत असत (१०.५५,३). पंचजना: याचा अर्थ एके काळी 'सर्व मनुष्य जात' असा समजला जाई. मनुष्यजातीचे एकंदर पांच विभाग होते. देवांच्या तीन जाती संहितेमध्यें येतात. खरे देव या तीन जातीबरोबर एकसारखे लढत असत. अशा एकंदर देवांच्या चार जाती झाल्या; शुरदेव या नांवाची एक पांचवी जात होती; त्यांचा एक स्वतंत्र इन्द्र होता (.७०,१५). हे ख-या देवांशीं मिसळून गेले. देवांच्या पहिल्या जातीस मूरदेव असें म्हणत. ''हे इन्द्रा, यातुधान लोकांचे गळे कापून तूं त्यांना मारुन टाक; मूर-देव मरुन जावोत'' (.१०४,२४). मूरदेव व यातुधान हे मनुष्यप्राणी होते असें या वर्णनावरुन समजतें. यातुधान हे मनुष्याचें व घोडयाचें मांस खात असत (१०.८७,१६). मूर-देवांनां जाळून टाकण्यास अग्नीस सांगितलेलें आहे (१०.८७,१४). उर्वशीनें पुरुरवस् याला मूर असें म्हटलें आहे (१०.९५,१३). मूरदेवांपैकीच मनु-मनु जात असावी असें समजून या जातीचा आपल्याशी कांही संबंध नाही असें देवांस वाटलें असेल. अथवा या वेळी मूर-देव हा शब्द बराच प्रचारांत आला असावा. देवांच्या दुस-या जातीस शिश्नदेव असें म्हणत. ''शतदुर शहर लुटून त्यानें शिश्नदेवांचा पराभव केला'' (१०.९९,३). तिस-या जातीस पूर्व-देव असें नांव होतें. पूर्व-देवा: म्हणजे असुरा: (.२१,७) असें प्रसिद्ध टीकाकाराचेंहि मत आहे. अमरकोशामध्येंहि पूर्वदेव व असुर हे शब्द एकाच अर्थाचे आहेत असें म्हटलें आहे. पूर्वदेव म्हणजे श्रेष्ठ देव किंवा पूर्वेकडील देव. पहिला अर्थ घेतला तर, असुरांपासून देव वेगळे निघाले असें म्हणावें लागतें. दुसरा अर्थ घेतला तर असुरांच्या देशाच्या. पश्चिमेकडे देवांचा देश असावा असें मानणें भाग आहे. ज्या ॠचेंत पश्चिमेकडील शत्रू जाळून टाकण्याबद्ल (.१८,१) अग्नीची प्रार्थना केली आहे, ती ॠचा एका पूर्वेकडील देवानें लिहिली आहे. पूर्वदेव व प्रत्यक् देव हे एकच भाषा बोलत होते किंवा काय हा एक प्रश्न उपस्थित होतो. एका ब्राह्मण ग्रंथावरुन पतंजलीचें असें मत झालें आहे कीं असुरांची भाषा देवांच्या भाषेपासून निघालेली असावी. अवेस्तिक लोकांत प्रसिद्ध असलेले वरेनियन् देव हें नांव कदाचित् पाश्चात्य देवांचें असेल, किंवा त्यांचा पोटभाग असेल, अगर वरेनियन् देव हे देवांच्या इतर तीन जातींपैकी असतील. वरेण्य होतृ (१.२६,२) हे वरेण्य देवांचे होतृ असावेत. दुस-या होतृचें नांव पूर्व्य म्हणजे पूर्वेकडील किंवा जुना (.२६,५) असे होते. वैदिक वाङमयांत देवांच्या दोन होतृंनां 'आप्री' सूक्तांत जांगा दिलेली आहे. विश्वदेव म्हणजे सर्व देव अगर फक्त पश्चिमेकडील देव? वैदिक वाङमयांत वसु, रुद्र व आदित्य असे देवांचे तीन विभाग केलेले आहेत (७.१०,४); व प्रत्येक भागांत अनुकमें, ८,१ व १२ अशा पोटजाती (कोटी) आहेत मराठी 'कुळी' हा शब्द व संस्कृतांतील 'कोटी' हा शब्द हे दोन्ही एकच आहेत. बृहस्पति हा बत्तीसाव्या जातीतला असून, इन्द्र व त्याचे मरुत् हे तेतीसाव्या जातीतील होते (.९६,७). या भागांत व पोटभागांत फक्त अस्सल देवांचा समावेश होई. पूर्वदेव किंवा असुर यांचा समावेश यांत होत नसे. देवांच्या देशास दिवू असें नांव होतें. ''हे इन्द्र, कोणत्या तरी मिषानें देवांच्या देशांत जाऊं इच्छिणा-या दस्यूंचा तूं पाडाव केलास'' (.१४,१४). दस्यु हे मानव असून दिव् प्रांतांत जाण्याची त्यांची इच्छा होती, यावरुन तो देश देव व त्यांचे इन्द्र यांचा होता असें म्हणण्यास हरकत नाही. दिव्चे तीन प्रांत केलेले हाते; दिव् जवळच 'भूमि' देश होता त्याचेहि तीन भाग होते. पृथ्वीच्या तीन विभागांपैकीं, एकाचें प्राचीन नांव भूमि असें होतें. हे पृथ्वीचे तीन विभाग व तीन दिव् मिळून सहा प्रदिश होतात. या सहा प्रदिशांच्या सहा उर्वी होतात. उर्वी हें नांव ॠग्वेद संहितेतहि आढळतें (.४७,३). उर्वीबद्दल कधी कधी विष्टिर हेंहि नांव आढळतें (.१३,१०). अथर्व संहितेंत दैवी म्हणजे देवांच्या असा अर्थ दिसतो. परंतु अलिकडच्या वाङमयांत पृथ्वी, भूमि व उर्वी हे शब्द एकाच अर्थाचे समजले जाऊन त्यांचा अर्थ पृथ्वी असा आहे. दिव्च्या तीन विभागांना दिर्घप्रसद्मन् रोचन, व समुद्र अशी नांवे आहेत (.१०,१). दुस-या एका ठिकाणीं दीर्घपसद्मन् यास प्रस्त्रवण, व रोवन यासं स्वर्णर (.६५,२) अशी नांवे आहेत. समुद्र हा देश सुंदर स्त्रियांविषयी प्रसिद्ध होता (.७८,३). एक अंगिरस (अध्रिगु) स्वर्णरास कंपायमान करित असतां, इन्द्रानें त्यास ठार मारिलें (.१२,२) व समुद्राचेंहि संरक्षण केले. स्वर्णर, रुशम, श्यावक आणि कृप (.३,१२) या सर्वांचे इन्द्रानें रक्षण केलें. रुशमाचा ॠणंचय या नांवाच्या राजाचाहि उल्लेख केला आहे (.३०,१४). कार्पण व कृप हे एकच असावेत. अरब व तुर्क लोकांपासून आशिया मायनरास रौम हें नांव मिळाले. रोम हें शहर वरील ठिकाणांपासून फारच दूर आहे. म्हणून आठव्या मंडलांतील चौथ्या सूक्तांत असलेलें रुम हें अगदी निराळें आहे. या रुमदेशांतील कांही लोक आल्बा लोगा येथें जाऊन राहिले असावे; व त्यांच्या वंशजांनी तैबर जवळ वसाहत केली असावी व या नवीन वसाहतीस रुम-रोम हें नांव मिळालें असेल. वेन जातीतील नाक (.८५, १०-११) हें दिव् मधील एका पर्वताचें नांव असावें (.१०३,२). प्रस्त्रवण, रोचन, समुद्र न नाक ही नांवे संहितेत कोठें कोठें आढळतात; व ती दिव्चे विभाग दर्शवितात, 'त्रिदश' म्हणजे देव व 'त्रिदिव' म्हणजे त्यांचा देश ही नांवे या अर्थानें आढळतात. त्रिदश म्हणजे तीस हा ठोकळ आंकडा एकतीस देवांचा वाचक आहे. एक प्रांत आठ वसूंनीं, दुसरा अकरा रुद्रांनी व बाकीचा बारा आदित्यांनी व्यापून टाकिला असावा. कदाचित् प्रत्येक प्रांतांत अकरा जाती रहात असाव्या. कारण 'त्रिभि: एकादशै:' (.३५,३) असें म्हटलें आहे.

रसा या नदीस पायउतार होत नसे; व म्हणूनच पणीनां आश्चर्च वाटत असें. रसा हें नांव नद्यांच्या सूक्तांत आलें आहे (१०.७५,६). रसेच्या एका बाजूला विष्टप (.४१,६) किंवा विष्टय् (.३४,१३). या नांवाचा देश होता. त्रिविष्टप व त्रिदिव ही नांवे एकाच अर्थाचीं असून, विष्टप हें दिव् यांचे दुसरें नांव असावें. अर्बुदाचा एक (.३२,३) विष्टप व ब्रघ्नाचा दुसरा विष्टप असल्यामुळें, विष्टप व दिव् यांचा गोंधळ उडून गेला. हे देश जवळ जवळ असावेत. रसा, अंशुमती व सरस्वति या निरनिराळया नद्या असाव्या. देव व पणी यांच्या देशांच्या मध्यें रसा ही नदी आहे. अंशुमतीच्या एका बाजूला (.९६,१३-१६) काळे लोक रहात असत. व सरस्वतीच्या दोन्ही बाजूला पूरु लोक रहात असत (.९६,२). एलाम किंवा इराणचें तद्देशीय नांव अंशन् असें होतें. जिच्या कांठीं सुस हें राजधानीचें शहर होतें त्याच नदीचें नांव अंशुमती होतें, किंवा एलामची पूर्व सीमा असलेलीं तैग्रिस नदी हिचें नांव अंशुमती होतें, हें अनिश्चित आहे. रसा व सिंधु या निरनिराळया नद्या होत्या (.४३,६).

या सूक्तावरुन असें सिद्ध होते की, पणि हे देवांशी लढत असत. फोनी किंवा पुनी या शब्दापासून पणि हा शब्द निघाला असावा, फोनी किंवा पुनी हे खलाशी व व्यापारी असून दूरच्या प्रदेशांतहि ते व्यापार करीत असत. संस्कृतांत पण् या धातूचा अर्थ व्यापार करणें असा आहे. तांब्याच्या एका नाण्याचें नांव 'पण' असें होतें. वणिग्-वणिक् हे पणिस् - पणिश्चें रुपांतर नसून 'पणि' चें रुपांतर आहे. वंकु (.४५,६) नांवाच्या वणिकाला पुरीष प्रांत (.२१,३) मिळाला. सर्व पणीशीं इन्द्राचें वैमनस्य होतें असें नाहीं, कांही पणि त्याच्यासाठीं सोम तयार करित असत, व कांही त्याला खंडणी देत असत; अशा लोकांशी तो सलोख्यानें वागे; परंतु बाकीच्यांशी त्याचें फार वांकडे होतें (.२५,७). बृवु या नांवाच्या एका पणीची औदार्याबद्ल स्तुती केलेली आहे (.४५,३१-३३). दुसरा एक पणि ॠषि होता (.६१,८) आपापल्या गर्भाशयांत समान ओझें (.१,६) वहाणा-या अशा सात सुंदर स्त्रियांशीं साम्य असणा-या अशा सात वाणी आहेत. वाणी हा शब्द, प्रार्थना, सूक्त (.७,१) या अर्थानेंहि वापरला आहे. उत्तरकालीन वैदिक वाङमयांत पणि हा शब्द कृपण या अर्थानें आलेला आहे (.५३,३).

सोम, ग्रावाण व ॠषी हे विप्र होते. ग्रावण हें योद्धयांचे नांव होतें. त्यांच्या टोळया फोडणें हें दगडासारखें कठीण असेल, किंवा शत्रूंवर दगडांचा मारा करण्यासाठीं हे लोक आपल्याबरोबर यंत्रें नेत असतील, म्हणून ग्रावण हें नांव त्यांस पडलें असावें. हे काळया जातीचे लोक असावे असें ग्रावणसूक्तांत (१०.९४) सांगितलें आहे, द्यव, दिव प्रांतांतील आखर लोकांपैकी हे लोक असून हे इन्द्राचे संरक्षक होते व यांच्या पराक्रमामुळें इन्द्राची भरभराट झाली. ''ग्रावण व अदिति यांना इंद्रानें (.३१,५) दस्यूंशी सामना करण्यासाठीं पाठविलें होते; हे अश्व रथ वगैरे कांही एक न घेतां पायींच गेले.''

अंगिरस हे दिवस्पुत्रा: (.२,१५) म्हणजे दिव् ची मुलें किंवा देवपुत्रा ॠषय: म्हणजे ॠषिदेवांची मुले म्हणून प्रसिद्ध आहेत (१०.६२,४). मानवांनी 'नाभा' च्या मध्यस्थीनें अंगिरसांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. विरुप हा अंगिरसांचा एक पोटभाग होता व या पोटभागांतील नवग्व व दशग्व हे फार प्रसिद्ध होते.''

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .