प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

चालू श्रौतधर्मः- आजच्या कालांत वेद आणि श्रौतधर्म हा केवळ ब्राह्मणांच्या नामधारी शाखाभेदानें राहिला आहे असें नाहीं. वैदिक कर्में थोडींबहुत अजूनहि होतात. वैदिक धर्माविषयीं आणि यज्ञसंस्थेविषयीं थोडीशी जिज्ञासा आतां वाढूं लागली आहे आणि खुद्द पुण्यांत आतां दोन अग्निहोत्रें स्थापन झालीं आहेत.

सध्यां श्रौतधर्म चालू आहे म्हणजे वर्षादोन वर्षांनीं एखादा याग कोठें तरी ऐकूं येतो. कधीं कधीं पांच पर्षात एकहि याग महाराष्ट्रांत होत नाहीं. अलीकडे कोणते याग होतात आणि कोणते होत नाहींत याचें कोष्टक येणेंप्रमाणें.-

होतातः- दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, निरुढपशु, सौत्रामणी, (कौकिल) अग्निष्टोम, सर्वपृष्ठाऽप्तोर्याम, वाजपेय, * अतिरात्र, साद्यस्क्र, * नक्षत्रसत्र, स्वर्गसत्र, अग्निहोत्र, सौत्रामणी, (चरक) विश्वजित्, (अतिरात्र) * अत्यग्निष्टोम, अग्निचयन, पंचकाठक.

होत नाहींतः- दाक्षायण, पौंडरीक, महाव्रत, द्वादशाह, व्दिरात्र, त्रिरात्र, चतुरात्र, व्युष्टिव्दिरात्र, गर्गत्रिरात्र, जामदग्न, चतुरात्र, पंचरात्र, षड्रात्र, सप्तरात्र, अष्टरात्र, नवरात्र उर्फ शललीपिशंग, दशरात्र, एकादशरात्र, त्रयोदशरात्र, चतुर्दशरात्र, पंचदशरात्र, सप्तदशरात्र, विंशतिरात्र, चतुर्विंशतिरात्र, त्रिशँद्रात्र, द्वात्रिशँद्रात्र, त्रयस्त्रिशँद्रात्र, षट्त्रिशँद्रात्र, एकोनपंचाशद्रात्र, संवत्सरसत्र, गवामयन, साकंप्रस्थायी, इन्द्रतुरीय, अश्वमेध, राजसूय, बृहस्पतिसव, वैश्यसव, ब्राह्मणसव, सोमसव, पृथिसव, गोसव, ओदनसव, पंचशारदीय, अग्निष्टुत्, इन्द्रस्तुत्, विघन, सर्वतोमुख, लोष्टचिति इ.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .