प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण २ रें.
वेदप्रवेश– ऋग्वेद.

ऋग्वेदसूक्तांचा काल भाषाविषयक पुरावा.– सामान्यतः कोणतीं सूक्तें प्राचीन व कोणतीं अर्वाचीन याचा निर्णय करण्याचें काम कठिण आहे. ही गोष्ट मुख्यतः भाषेवरून ठरवावी लागेत व एखाद्या सूक्ताची भाषा, केवळ कालावर अवलंबून नसून त्याचा प्रसंग, त्याचा हेतु, व त्या सूक्ताचा संबंध ब्राह्मणी विधिमार्गाशीं जास्त आहे कीं, सामान्यजनधर्माशीं आहे, इत्यादि गोष्टींवर अवलंबून असते. सोम अथवा इंद्र यांच्या स्तुतिपर जीं सूक्तें आहेत त्यांची भाषा प्रार्थनापर वगैरे सूक्तांहून भिन्न दिसून येते परंतु तेवढ्यावरून एक पूर्वींचें व एक नंतरचें असा निश्चय करतां येत नाहीं. * तथापि भाषेच्या दृष्टीनें प्राचीन सूक्तें कोणतीं, व अर्वाचीन कोणतीं याचा विचार करतांना एवढें सांगितलें म्हणजे पुरे आहे कीं, ऋग्वेदोत्तर भारतीय वाङ्मयांत आढळून येणार्‍या अनेक समाजविषयक गोष्टी ऋग्वेद रचणा-यांस विदित नव्हत्या व ऋग्वेदोत्तर वाङ्मयाच्या सर्व उत्पादकांस ऋग्वेदकालीन भारतीय धर्म पूर्ण परिचित होता. * या दोन गोष्टींवरून ऋग्वेदांतील अगदीं अर्वाचीन भागाची रचना देखील अतिप्राचीन कालीं झाली असा जो सामान्य समज आहे तो अगदीं यथार्थ आहे हें निर्विवादपणें ठरतें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .