प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

परिशिष्ट

लाहोर.
[जबाबदार अधिकारी-कर्नल जॉन्सन]

लोकांची कृत्यें- (१) महात्मा गांधींची सुटका करण्यांत यावी अशी विनंति करण्याकरितां लोक एक जुटीनें डी. सी. कडे जाऊं लागले व त्यांनीं हरताळ पाडला.

(२) सी. आय. डी. मधील एका आफिसरावर हल्ला करण्यांत आला.
(३) सनातनधर्म कॉलेजच्या भिंतीवरील लष्करी कायद्याची नोटीस कोणीशी फाडली.

अधिकार्‍यांचीं कृत्यें.- (१) गांधींची सुटका करण्याविषयीं विनंति करण्यास जाणार्‍या लोकांवर गोळ्या झाडल्या. ३।४ लोक मेले व कित्येक जखमी झाले.

(२) बादशाही मशिदींतील सभेच्या वेळीं लष्करी लोक तेथें न आणण्याचें आश्वासन दिलें असतांहि सभा झाल्यावर लोक घरोघर परत जात असतां त्यांच्यावर पुन्हां गोळ्या झाडण्यांत आल्या. कांहीं लोक ठार झाले व बरेच जखमी झाले.
(३) लोकप्रिय पुढार्‍यांस भेटीस बोलावून कैद केलें.
(४) लोकांनां जबरदस्तीनें दुकानें उघडण्यास लावलें.
(५) दिवे लावल्यानंतर घराबाहेर न पडण्याचा बंदीचा हुकूम व तो चुकून मोडला गेला तरी त्याबद्दल जाहीर रीतीनें फटक्यांचीं शिक्षा.
(६) आठशें तांगे व हिंदी लोकांच्या मालकीच्या सर्व मोटार गाड्या लष्करी कायद्याच्या कारकिर्दींत कर्नल जॉन्सन यांनीं आपल्या ताब्यांत ठेवल्या.
(७) धान्याच्या किंमती ठरवून टाकल्या.
(८) बादशाही मशीद बंद ठेवण्याचा हुकूम सोडला.
(९) झटपट चौकशीच्या कोर्टांनीं २०१ इसमांस दोषी ठरवून तीस फटके, दोन वर्षांची कैद, हजार रुपये दंड अशा शिक्षा ठोठावल्या. ज्यास फटके मारावयाचे त्याची डॉक्टरकडून तपासणीहि होत नसे.
(१०) ज्यांची पुढें कधीं चौकशीहि केली नाहीं अशा निरपराधी माणसांस वारंट न दाखवितां गुन्हाहि न सांगता निष्कारण पकडून जवळ जवळ एक एक महिना कैदेंत ठेवलें.
(११) बायकांपोरांस सडें घराबाहेर काढून घराची झडती घेऊन घरास ताळा लावला.
(१२) घरांच्या भिंतींवर लष्करी कायद्याच्या जाहिराती डकवून घरमालकांनां त्यावर पहारा करावयास लाविलें.
(१३) असली एक जाहिरात फाडली गेल्याबद्दल सनातनधर्म कॉलेजच्या वसतिगृहांतील ५०० विद्यार्थ्यांस व प्रोफेसरांस भर उन्हांतून डोक्यावर त्यांचे बिछाने देऊन तेथून तीन मैल असलेल्या किल्ल्यावर दामटीत नेलें व तेथें दोन दिवस अटकेंत ठेवलें.

(१४) तीन कॉलेजांतील विद्यार्थ्यांस तीन आठवडेपर्यंत दिवसांतून चार वेळ हाजिरी देण्याकरितां लष्करी ठाण्यावर पायीं चालत येण्याचा हुकूम सोडला.

(१५) १०११ विद्यार्थ्यांनां कॉलेजांतून घालवून देणें, परिक्षांस बसण्याची बंदी करणें, स्कॉलरशिपा काढणें, दंड करणें, वगैरे शिक्षा करण्यांत आल्या.
(१६) एका लग्नाच्या मिरवणुकीबरोबर दहाहून अधिक माणसें होतीं म्हणून नवरदेवासुद्धां सर्वांस पकडून उपाध्याय व इतर माणसें यांस फटके मारण्यांत आले.
(१७) ट्रायब्यूनच्या संपादकांस कैदेंत टाकलें व पंजाबी व प्रताप हीं पत्रें बंद पाडलीं.
(१८) ११ प्रतिष्ठित पुढार्‍यांवर खटले केले. चौकशीच्या अवाढव्य खर्चापायीं यांपैकीं कांहीं भिकेस लागले.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .