प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.

राष्ट्रीयत्वाची तृष्णा व तिचें मूळ.- राष्ट्रीयत्वाची तृष्णा जीं राष्ट्रें परकीय सत्तेखालीं असतात त्यांच्यामध्यें असते. ही तृष्णा उत्पन्न होण्याचीं व्यावहारिक कारणें कोणतीं आहेत हें पाहूं हीं कारणें येणेंप्रमाणें दिसतात.

(१)शासकवर्गाची सामाजिक उच्चता.
(२) जनतेंतील लोकांस शासकवर्गांतील लोकांपेक्षां जीवनकलहांत शासकवर्गाकडून कमी साहाय्य मिळतें.
(३) सामाजिक सुखें शासकवर्गास जितकीं मिळतात तितकीं जनतेस मिळत नाहींत.
(४) राष्ट्रस्वातंत्र्यामुळें राष्ट्रांतील उच्चवर्गास दुसर्‍या राष्ट्राच्या उच्चवर्गाशीं बरोबरीच्या नात्यानें वागण्याची जी संधि मिळते ती जित राष्ट्रांतील उच्चवर्गास मिळत नाहीं.
(५) जित राष्ट्रांस सामुच्चयिक इतिहासच नसतो.
(६) स्वकीय उच्चवर्गाच्या आश्रयानें स्वतंत्र राष्ट्रांतील वाङ्मयास जें स्वरूप येतें तें जित राष्ट्रांच्या वाङ्मयास येत नाहीं.

या सर्व प्रकारच्या विचारांचा आज सुशिक्षित भारतीय जनतेवर परिणाम होत आहे; आणि जोंपर्यंत स्वतंत्र आणि जित असा भेद समाजांत आहे, तोंपर्यंत चालू सामाजिक घटना अस्थिर आहे असें समजावें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .