प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण २ रें.
राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण.

परिशिष्ट.
संघाचे उत्पादक सभासद.
शांततातहावर सही दिलेलीं संस्थानें.

अमेरिकेंतील / संयुक्त-संस्थानें  क्यूबा  लायबेरिया
बेल्जम चेकोस्लोवाकिया निकाराग्वा
बोलिविया इक्वेडोर पनामा
ब्रेझिल फ्रान्स पेरु
ब्रिटिश-साम्राज्य ग्रीस पोलंड
कानडा, ग्वाटेमाला, पोर्तुगाल
आस्ट्रेलिया हैटि रुमानिया
दक्षिण आफ्रिका, हेजाझ, सर्विया
न्युझीलंड, हाँड्यूरास, सयाम
हिंदुस्थान, इटली, युरुग्वे
चीन, जपान.
संघ-करारपत्राला मान्यता देण्यासाठीं निमंत्रित असलेलीं संस्थानें
आर्जेन्टिया, नार्वे स्वीडन
चिली, पाराग्वे, स्वित्सर्लेड
कोलम्बिया, इराण, वेनेझुएला
डेन्मार्क साल्वेदोर,
नेदर्लंड, स्पेन.

 


   संघाध्यक्ष, माँ.पिशां.
   सर-चिटनवीस, सर एरिक् ड्रुमंड.

राष्ट्र-संघाचीं हीं सूत्रें किती लवचिक आहेत हें तीं वाचल्यानेंच स्पष्ट होतें.  असल्याच सूत्रांची अवश्यकता या वेळेस होती.  राष्ट्र-संघ तयाल व्हावा ही इच्छा इंग्रज आणि फ्रेंच मुत्सद्यांची मनापासून होती अगर नव्हती, याबद्दल शंका आहे.  इंग्लंडांतील मुत्सद्यांनीं असें भय व्यक्त केलें होतें कीं डॉ. विल्सन हा कोणी व्यवहारशून्य तत्त्ववेत्ता असावा. प्रत्यक्ष परिचयानें ही कल्पना चुकीची ठरली.  तात्कालिक प्रश्नापेक्षां फार दूरच्या प्रश्नाकडे लक्ष पोंचविणारा आणि त्यावरून तात्कालिक कार्य काय करावें हें ठरविणारा हा मुत्सद्दी होय यांत शंका नाहीं. जगाच्या इतिहासांत सर्व जगास एकत्र जोडणारी ही संस्था प्रथमच निर्माण झाली आहे, आणि सूक्ष्म रीतीनें विचार करणार्‍यास या संस्थेचीं तत्त्वें आज लवचिक व म्हणून बलवान् राष्ट्रांस केव्हांहि मोडतां येतील अशीं दिसलीं तरी तीं अत्यंत व्यापक आहेत आणि बंधनयंत्रापेक्षां देखील अधिक बलवान् आहेत, असें पुढें दिसून येईल.  जगामधील राष्ट्रांनीं एकमेकांनीं एकमेकांस दबवण्यासाठीं मित्रसंघ निर्माण करून एकमेकांस भिववून शांतता राखावी हें ध्येय आज शंभर दीडशें वर्षें जगांत चालू आहे.  युरोपांतील निरनिराळीं राष्ट्रें एका साम्राज्याखालीं आणावयाचीं ही कल्पना नेपोलियनच्या पाडावाबरोबर लयास गेली तरी राष्ट्रांची साम्राज्यतृष्णा लयास गेली नाही. उलट प्रत्येक राष्ट्रामध्यें ती वाढतच गेली.  प्रो. राईंच म्हणतो कीं * विसाव्या शतकांतील राजकारणविषयक मुख्य फरक म्हणजे राष्ट्रीयत्वस्थापनेसाठीं होणार्‍या प्रयत्‍नाऐवजीं राष्ट्रांचीं साम्राज्यें करण्यासाठीं प्रयत्‍न होऊं लागला हा होय. नेपोलियनच्या पाडावानंतर, साम्राज्यसंवर्धनाच्या प्रयत्‍नाचें क्षेत्र यूरोप हें नाहीं हें कायमचें ठरलें, आणि जगांतील दुर्बल प्रदेशांकडे सर्व राष्ट्रांचा मोर्चा वळला. इटलीसारख्या दास्यांतून नुकत्याच सुटलेल्या राष्ट्रासहि साम्राज्य-संवर्धनाची इच्छा होऊन त्यानें तुर्कस्थानच्या प्रदेशाचे लचके तोडले. साम्राज्यविषयक भावना वाढत जाऊन त्याच युद्धास कारण झाल्या आणि दुर्बलांचे प्रदेश हाच भांडणाचा विषय झाला.  मित्रसंघ करून राष्ट्रशक्तींचा समतोलपणा सिद्ध करणें हें युद्धास संयामक होत नाहीं, दुर्बलव्याप्‍तप्रदेश घेण्याचा मोह सर्व जिवंत राष्ट्रांस भांडावयास लावून जगाची शांतता बिघडवील या गोष्टीची जाणीव उत्पन्न होऊन राष्ट्रसंघाची स्थापना करण्याचें श्रेय डॉ. विल्सन या थोर तत्त्ववेत्त्यास आहे.  डॉ. विल्सन यांनीं हा राष्ट्रसंघ घडवून आणला तो राष्ट्रांचें निर्दोष संयुक्तीकरण कसें करावें या दृष्टीनें घडवून आणला नाहीं. युध्यमान मित्रसंघ कायमचा करून त्यांत संधि केलेल्या राष्ट्रांस स्थान देऊन हा राष्ट्रसंघ त्यांनीं घडवून आणला.  मित्रराष्ट्रसंघ करून आपलें हित करण्याचें पूर्वींचें तत्त्व, आणि जगास एक घटना द्यावयाची हें नवें तत्त्व, या दोहोंचे मिश्रण प्रस्तुत राष्ट्रसंघघटनेंत आहे.  पूर्वीं अनेक मुत्सद्यांनीं असें म्हटलेंच होतें कीं सार्वराष्ट्रीय धर्मशास्त्राची दृढ स्थापना जगांतील सर्व राष्ट्रें युद्ध करून तह करतील तेव्हांच होईल. हें भविष्य बरेंच खरें झालें आहे.

पुढे वाचा

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .