प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण ७ वें.
विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय                                        
 
ख्रिस्तोफर कोलंबस व मध्ययुगाचा अंत.- लिओनार्डोचे शोध इतक्या महत्त्वाचे असूनहि ते त्याच्या पूर्वी होऊन गेलेल्या बेकनच्या शोधांप्रमाणें वांझच राहिले, ही गोष्ट कबूल करणें भाग आहे. शास्त्रीय प्रगतीस चालना देणारें कार्य, या पिढीत ख्रिस्तोफर कोलंबस नांवाच्या एका शास्त्रानभिज्ञ माणसानेंच केलेलें आहे. त्याच्या कामगिरीची सविस्तर हकीकत देण्यास येथें अवकाश नाहीं. इतकें सांगितलें असतां पुरें होईल कीं, बहुतेक आधुनिक लेखक पृथ्वी वाटोळी आहे हें प्रत्यक्ष सिद्ध करणारें त्याचें जलपर्यटन शास्त्रेतिहासांत नवयुगाचें प्रारंभक आहे असें समजतात. त्यानें ज्या वर्षी हें जलपर्यटन केलें तें वर्ष जवळ जवळ मध्ययुगाच्या अखेरचेंच मानण्यांत येते. त्याच्या शोधाबरोबर तत्कालीन विद्वत्तेंत एकाएकीं मोठा फरक घडून आला, असा याचा अर्थ नाही, पुढील काळांतील मोठमोठ्या शोधांची पूर्वतयारी अगोदरच झाली होती; इ. स. १४९२ त कोलंबसानें आपले सुप्रसिद्ध समुद्रपर्यटन केलें तेव्हां मागील हजारांहूनही अधिक वर्षांत न मिळालेली अशी शास्त्रीय ज्ञानाच्या क्षेत्रांत जीवनशक्ति ओतणारी कल्पना पुढें मांडणारा पुरुष अगोदरच जन्मास आला होता. या प्रख्यात पुरुषाचें नांव कोपर्निकस हें होय.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .