प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
 
 कर्मकांङ व ज्ञानकांङ.- वरील क्रिया कर्मकांङामुळें झाल्या. कर्मकांङ आणि ज्ञानकांङ हें प्राचीन ज्ञानाचें प्राचीन वर्गीकरण होय.

जेव्हां हे मंत्र, क्रिया आणि विचार तयार झाले, तेव्हां त्यांचे एकीकरण करण्याच्या प्रयत्नामुळें वेद व उपनिषदें हीं तयार झालीं.

जेव्हां काव्यें करणारा वर्ग, तसाच विचार करणारा वर्ग तयार होतो  तेव्हां त्याच्या परिश्रमाचें फल  एकत्रित करणें प्राप्त होतें. ते एकत्रित झाल्यानंतर पुढचा प्रयत्न म्हणजे त्याचा अधिक अभ्यास.

मंत्रब्राह्मणयुक्त वाङ्मयावर प्रथमत: जो परिश्रम झाला तो हा कीं, त्या वाङ्मयाचा मुख्य हेतु जो यज्ञ तो साध्य करण्यासाठीं पूर्वीचें ज्ञान इतस्तत:  पसरलेलें होतें तें निवडून पद्धतशीर मांङले गेलें. या रीतीनें वेदाच्या संहितीकरणाचा प्रमुख हेतु जो यज्ञ तो साधण्यासाठी श्रौतसूत्रें तयार झाली. गृहयसूत्रें हीं अथर्ववेद्यांचे ज्ञान पद्धतशीर मांङतांना तयार झालीं.

उपनिषदें ही एक प्रकारची संहिताच आहे. कां कीं, ती यज्ञप्रसंगी व इतरत्र उत्पन्न झालेले ब्रह्मवाद, त्याचप्रमाणे ऋत्विग्वर्गाबाहेर राहिलेला विचारी वर्ग व सूतसंस्कृतींतील विचारी वर्ग यांची विद्या, हीं सर्व एकत्र करुनच बनलेलीं आहेत. उपनिषदांपासून झालेल्र्या शास्त्रांचा प्रारंभ संहितीकरणापासूनच झाला असें म्हणण्यास हरकत नाही. उपनिषदांतील ज्ञान व्यवस्थित रीतीनें मांङण्यासाठी कांही सूत्रें तयार झालीं असलीं पाहिजेत. बादरायणाची सूत्रें त्यांचेंच उत्तरकालीन स्वरुप होत. सांख्यसूत्रें हींहि उपनिषदांतील कांही विचार मांङण्यासाठींच तयार झाली असावींत.

यज्ञ करण्यासाठी अनेक कला लागत व अनेक शास्त्रे लागत. त्यांचे मुख्य वाङ्मय मंत्र व ब्राह्मणें. उपनिषदवाङ्मय म्हणजे खरोखर यज्ञसंस्थेबाहेरचें  वाङ्मय. आपस्तंबानें ‘ मंत्र ब्राह्मणयोर्वेदनामधेयन् ’ अशी वेदाची व्याख्या केली आहे. वैदिक बाङ्मयामध्यें उपनिषदांचा अंतर्भाव करण्याची चाल आहे एवढेंच.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .