प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.

क्रिया, कला व शास्त्र यांचा अन्योन्यसंबंध:- शास्त्र म्हणजे व्यवस्थित अभ्यास आणि कला म्हणजे क्रिया. जेव्हां क्रियामध्यें व्यापकता उत्पन्न होते तेव्हां तो क्रियासमुच्चय कलारूप पावतो आणि शास्त्रीय अभ्यासाचें साहित्य होतो. जुनें वाङ्मय, भिक्षुकी खटपटी, गाणीं व तीं म्हणण्याच्या चाली, देवकल्पना, अनेक शिल्पें यांचा संबंध यज्ञसंस्थेशीं आल्यामुळें, आणि क्रियांची व्यापकता मोठी झाल्यामुळें प्रत्येक कार्य व्यवस्थित करण्याची जरूर पडली आणि ऋत्विक्कर्मानुसार शास्त्रें तयार झालीं. होत्याचें शास्त्र, अध्वर्यूचें शास्त्र इत्यादि शास्त्रें तयार झालीं. कांहीं साहित्य शास्त्रस्वरूप लवकर पावलें, कांहीं उशिरानें पावलें. एखादें ज्ञान व्यवस्थित तर्‍हेनें मांडण्याचा प्रयत्‍न झाला म्हणजे त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या ज्ञानावर होतो. गायनशास्त्र उर्फ सामवेद आणि होत्यानें म्हणण्याचीं गाणीं यांनां वृत्तें होतीं व इतर नियम होते. ज्या वेळेस होते आणि उद्गाते आपआपल्या ज्ञानाचे संच पाडूं लागले तेव्हां त्यांनी वापरलेल्या वाङ्मयास एकाच तर्‍हेनें नियमबद्धता आली असें नाहीं. व्याकरण, निरूक्त, छंद इत्यादि दृष्टींनी त्या काळीं देखील अभ्यास चालूच होता. त्या त्या अभ्यासाच्या वाहक, विशिष्ट वर्ग पडलेल्या व्यक्ती नव्हत्या एवढेंच. श्रौतकर्मविकास नें एकंदर कार्यकलापास नियमबद्धता प्राप्त झाली एवढेंच नव्हे तर संहितीकरणहि नेटानें झालें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .